मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार; जाणूनघ्या संपूर्ण प्रक्रिया Free Gas Cylinder

Free Gas Cylinder
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Free Gas Cylinder: सध्या गॅस सिलेंडरचे भाव हजार रुपयांपर्यंत येऊन टेकले आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका या वाढत्या महागाईमुळे बसत आहे. केंद्रसरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना मोफत गॅस सिलेंडर तर दिले मात्र आटा त्याच महिला या महागाईमध्ये गॅस भरून घेऊ शकत नाहीत. कदाचित आपण सुद्धा याची जाण ठेऊनच असाल.

मित्रांनो, सर्वसामान्यानाचा आधार म्हण्टले जाणारे आपल्या महाराष्ट्रातही हे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे यावर एक उत्तम उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत वर्षाला 3 Free Gas Cylinder देण्याचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली होती. या योजनेचा लाभ घेऊन आज राज्यातील हजारो महिलां महागाईच्या तावडीतून सुटल्या असे म्हणायला काहीच हरकत नाही. ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळत असल्याने ज्यांना खरी गरज आहे त्यांच्या पर्यंत शासन लाभ पोहोचवण्यात यशस्वी झाले आहे, असे आपण समजू शकतो.

Also Read: Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींना आता eKYC करणे आवश्यक अन्यथा लाभ रोखला जाईल

काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना?

शासनाने महिलांचा त्रास कमी होण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी महिलांना मोफत गॅस दिलेत. परंतु जर महागाईमुळे ते मिळालेल्या गॅस सिलेंडर ला सुद्धा भरून घेणे हे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शक्य होत नाही. म्हणून राज्यसरकारने या वर तोडगा काढण्यासाटःई आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून फक्त पात्र महिलांनाच वर्षाला 3 Free Gas Cylinder दिले जाते. तसेच इतर जे गॅस सिलेंडर मिळतात त्यावर सुद्धा अनुदान थेट बँकेत जमा केले जाते.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

जर तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही खालील योजनांचे लाभार्थी असणे बंधनकारक आहे.

  • प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 3 Free Gas Cylinder दिले जाणार.
  • त्याच प्रकारे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल.
  • ज्या महिला रेशनकार्ड धारक असतील किंवा दारिद्र्यरेषेखालील असतील ते सुद्धा या अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असणार आहेत.

अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे

या अन्नपूर्ण योजनेसाठी कुठलीही वेगळी अर्ज प्रक्रिया नाही आहे. फक्त तुमच्या जवळील गॅस एजेन्सी मध्ये जाऊन वेळेवर Ekyc करावी. तसेच सर्वप्रथ तुम्हाला लागेल तेवढे वारशाला गॅस सिलेंडर हे स्वतःच्या पैशाने घ्यावे लागतील. त्यानंतर शासन तुमच्या बँक खात्यामध्ये सबसिडीच्या रूपात रक्कम जमा करणार आहे. या लाभासाठी फक्त तुमच्याकडे काही महत्वाचे कागदपत्रे लागतील ते खालीलप्रमाणे.

  • आधार कार्ड
  • उज्वला योजनेच्या लाभाचा कनेक्शन नंबर
  • बँकेचे खातेबुक
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • लाडकी बहीण योजनेमधील नोंदणीचा पुरावा

निष्कर्ष

महाराष्ट्र सरकार हरया अर्थाने गरीब आणि गरजू कुटुंबाना मदत हि या योजनेच्या माध्यमातून करत आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत परंतु पैसे खात्यामध्ये जमा होत नाहि आहेत. तर तुमच्या जवळील एजेन्सी मध्ये जाऊन तक्रार करून Ekyc प्रक्रिया अपूर्ण करून घ्या. या योजनेमुळे तुमच्या कुटुंबाचा आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *