PM Wani Yojana: मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा बघितले असेल कि अगदीं मोफत वायफाय बसवला असल्याचा दावा केला जातो. तर ते याच योजनेच्या माध्यमातून मिळालेले असते. आपल्या देशात डिजिटल इंडिया अभियान सुरु आहे याचाच एक भाग PM Wani Yojana हि सुद्धा आहे. प्रत्येक गावातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना सुरळीत इंटरनेट सेवा मिळावी. हेच ध्येय सामोरं ठेऊन शासनाने हि योजना सुरु केलेलं आहे.
आज इंटरनेटचे जाळे तर फार मोठे झालेले आहेच, परंतु अजूनही ग्रामीण भागामध्ये नेट्ववर्क साठी नेट साठी वाट बघावी लागते. आज संपूर्ण कामे हि आपण आपल्या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे इंटरनेट किती आवश्यकता असते हे आपल्याला भलेभती ठाऊक असेलच. परंतु ज्या नागरिकांकडे स्वतःच्या पैशाने महागडे WiFi घेण्याची परिस्थिती नाही त्यांना सुद्धा PM Wani Yojana च्या माध्यमातून मोफत WiFi कनेक्शन मिळणारं आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा वाणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील प्रक्रिया नक्की बघा.
Also Read: 10th पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप, येथे करा अर्ज। Zp Mofat Laptop Yojana
PM Wani Yojana म्हणजे काय?
हि योजना देशातील प्रत्येक नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. अर्थात या योजनेचा लाभ सुद्धा हवे त्याला मिळणार आहे. या योजनेअंतरागत WiFi मिळवण्यासाठी कोणत्याही अर्ज शुल्काची आवश्यकता नसणार. सर्व प्रक्रिया हि ऑनलाईन असल्यामुळे कुठल्याही एजेंटचे सुद्धा इथे काम नाही आहे. या योजनेमध्ये मुख्य तीन भाग पडतात, ते खालीलप्रमाणे
- PDO(Public Deta Office): PDO हे एक अशे ठिकाण असते जिथून ग्राहकांपर्यंत सुद्धा हि इंटरनेट सेवा पोहोचवली जाऊ शकते. जसे कि एखादे किराणा दुकान, कॅफे, सायबर कॅफे, ऑफिस किंवा तुमचे घर सुद्धा.
- PDOA(Public Deta Office Agreater): ह्या संस्था किंवा कंपनी असणार आहेत ज्या अनेक PDO ला जोडतील आणि त्यांचे व्यवस्थापन करतील.
- Ad Provider/ Center Registree: हे उपयोगाकऱ्यांसाठी एप्प तयार करतील आणि त्यातून ग्राहक WiFi घेऊ शकतील. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना किंवा तुम्ही तुमचं दुकान चालवत असाल तर तिथे PDO म्हणून स्वतःची WiFi सेवा सुरु करू शकता.
PM Wani Yojana-उद्देश
ज्या व्यक्तीला स्वतःच्या दुकाना मध्ये किंवा घरी WiFi ची गरज आहे मात्र त्यांच्या कडे महागडे WiFi कनेक्शन लावण्यासाठी पैसे नाहीत अशा गरजू व्यक्तींना केंद्र सरकारच्या PM Wani Yojana अंतर्गत अगदी मोफत WiFi कनेक्शन दिले जाणार आहे. मित्रांनो, प्रत्येक गावातील गरजू व्यक्तीं पर्यंत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आभासामध्ये मदत करण्यासाठी राबवण्याचे उद्देश शासनाचे आहे.
योजनेचे फायदे
शाळा, कॉलेज किंवा गावपातळीवर या PM Wani Yojana चा मोठा फायदा होणार आहे. नवीन स्टार्टअप्स आणि रोजगारासाठी या योजनेच्या माध्यमातून नवीन नवीन रोजगार संधी निर्माण करता येतील. युवक आपला स्वतः PDO व्यवसाय सुरु करून उद्योग सुरु करू शकतात. बऱ्याच ठिकाणी मोफत इंटरनेट सुद्धा दिले जाणार आहेत.
योजनेची अर्जप्रक्रिया
मोफत सरकारी योजनेअंतर्गत WiFi मिळवण्यासाठी केंद्रसरकारने एक अधिकृत पोर्टल सुरु केले आहे. त्यासाठी तुम्हाला pmwani.gov.in या अधिकृत वेबसाइट्वर्ति जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला नवीन PDO रजिस्ट्रेशन करा ज्यामध्ये आवश्यक असलेली माहिती भरा. नेटवर्क उपकरणे टाका आणि सबमीट करा.
निष्कर्ष
तुम्हाला तुमच्या घरासाठी, शाळेसाठी किंवा उद्योगासाठी जर WiFi हवे असेल आणि विकत घेण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण केंद्रसरकार वाणी योजनेअंतर्गत मोफत WiFi तर देणारच आहे सोबत मोफत इंटरनेट सुद्धा देत आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघितली आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.