Azim Premji Scholarship 2025 : मुलगा असो किंवा मुलगी आजच्या युगात शिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे. गरीब परिस्तिथी मुळे अनेक परिवारातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी थांबवले जाते, परंतु मुलींनो आता तुम्हाला उच्च शिक्षण घेण्यापासून तुमची परिस्तिथी थांबणार नाही. अझीम प्रेमजी फाऊंडेशनतर्फे Azim Premji Scholarship 2025 ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी 30 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. जर तुम्हीही 10वी आणि 12वी उत्तीर्ण असून पुढील शिक्षणासाठी स्कॉलरशिप शोधत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम आहे.
Azim Premji Scholarship काय आहे?
अझीम प्रेमजी हे एक फौंडेशन आहे ज्याचा मार्फत देशातील लाभार्थी पात्र मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहायता केली जाते. या फौंडेशन नि सुरु केलेली योजना हि मुलींच्या उच्च शिक्षणासाठी अतिशय लाभदायक ठरत आहे. 10 वि आणि 12 वि च्या पुढे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी हि योजना सुरु करण्यात अली आहे. तुम्ही सुद्धा योजनेसाठी पात्र असाल तर 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकता.
घटक | माहिती |
---|---|
लेखाचे नाव | Azim Premji Scholarship 2025 |
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | 10 सप्टेंबर 2025 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2025 |
लाभ | 30,000 रुपये शिष्यवृत्ती |
लाभार्थी | 10वी व 12वी उत्तीर्ण मुली |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाइट | https://azimpremjifoundation.org/ |
Shravan Bal Yojana Online Apply: या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार 1500 रुपये महिना
पात्रता (Eligibility)
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- अर्जदार फक्त मुलगी असावी.
- भारतीय नागरिक असणे आवश्यक.
- किमान 10वी आणि 12वी उत्तीर्ण असावी.
- कोणत्याही डिग्री किंवा डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेतलेला असावा.
आवश्यक कागदपत्रे (Documents)
ऑनलाईन अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल.
- आधार कार्ड
- राहत्या पत्त्याचा पुरावा
- 10वी व 12वीची मार्कशीट
- प्रवेशाचा पुरावा (कॉलेज/कोर्स अॅडमिशन लेटर किंवा फी रिसीट)
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुकची प्रत
- ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
Azim Premji Scholarship ऑनलाईन अर्ज कसा करावा? (Online Apply Process)
- अधिकृत वेबसाइट https://azimpremjifoundation.org/ ला भेट द्या.
- होमपेजवर “Register (नवीन अर्जदारांसाठी)” या पर्यायावर क्लिक करा.
- पुढील पेजवर Check Eligibility वर क्लिक करून आपली पात्रता तपासा.
- तुमचा मोबाईल नंबर टाकून Send OTP करा आणि मिळालेल्या OTP ने मोबाईल नंबरची पडताळणी करा.
- पडताळणीनंतर New Registration Form उघडेल. आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
- रजिस्ट्रेशन झाल्यावर मिळालेल्या Login Details च्या सहाय्याने पुन्हा होमपेजवर जाऊन लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर Application Form भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- शेवटी Submit वर क्लिक करून अर्जाची पावती डाउनलोड करून ठेवा.
निष्कर्ष
Azim Premji Scholarship 2025 ही योजना उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या 10वी व 12वी उत्तीर्ण मुलींसाठी मोठा आधार ठरू शकते. पात्र विद्यार्थिनींनी 10 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करून 30,000 रुपयांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील उपयुक्त ठरू शकते, त्यामुळे ती नक्की शेअर करा.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!