Ladki Bahin Yojana Update: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फायदा अनेक गरीब व मध्यमवर्गीय महिलांना झाला. मात्र, या योजनेत बोगस लाभार्थ्यांची संख्या वाढल्याने सरकारवर मोठा आर्थिक भार पडू लागला. त्यामुळे राज्य सरकारने आता बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
उत्पन्न तपासणी अधिक काटेकोर
पूर्वी फक्त लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न पाहिले जात होते. बहुतांश महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याने त्या पात्र ठरत होत्या. पण आता नवा नियम लागू करण्यात आला आहे. विवाहित महिलांसाठी पतीचे वार्षिक उत्पन्न तपासले जाईल. तसेच अविवाहित महिलांसाठी वडिलांचे उत्पन्न तपासले जाईल. जर पती किंवा वडिलांचे उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर संबंधित महिला या योजनेसाठी अपात्र ठरेल.
पती किंवा वडिलांची ई-केवायसी अनिवार्य
या योजनेतील मोठा बदल म्हणजे पती किंवा वडिलांची ई-केवायसी प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबाचे एकूण उत्पन्न तपासता येईल आणि पात्रतेनुसारच महिलांना मदत मिळेल.
ई-केवायसी प्रक्रिया कशी कराल?
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेला स्वतःबरोबरच पती किंवा वडिलांची ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील प्रक्रिया करावी:
- अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या 👉 ladakibahin.maharashtra.gov.in
- मुख्यपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक करा.
- उघडलेल्या फॉर्ममध्ये लाभार्थीचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून Send OTP वर क्लिक करा.
- आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करा.
- आधी KYC पूर्ण असेल तर संदेश दिसेल.
- नसेल तर पुढील प्रक्रिया सुरू होईल.
- आता पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरून Send OTP करा. आलेला OTP टाकून Submit करा.
- नंतर जात प्रवर्ग निवडा आणि दिलेल्या अटींना संमती देऊन Submit करा.
- शेवटी “Success तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
महत्त्वाच्या अटी
ई-केवायसी प्रक्रियेत खालील अटी मान्य करणे आवश्यक आहे:
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत किंवा निवृत्तीवेतनधारक नसावा.
एका कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना आहे. पण बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार लक्षात घेता सरकारने कठोर पावले उचलली आहेत. आता पती किंवा वडिलांची ई-केवायसी अनिवार्य असल्यामुळे खऱ्या पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!