Birth Certificate Online: फक्त मोबाईलवरून अर्ज करा आणि घरीच मिळवा प्रमाणपत्र, वेळ आणि त्रास वाचवा

Birth Certificate Online
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Birth Certificate Online: आजच्या डिजिटल युगात जन्माचा दाखला (Birth Certificate) हे केवळ एक कागदपत्र नसून जीवनातील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी अत्यावश्यक ओळख पुरावा आहे. शाळेत प्रवेश घेणे, पासपोर्ट मिळवणे, बँक खाते उघडणे किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी जन्माचा दाखला आवश्यक ठरतो.

पूर्वी या दाखल्यासाठी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता, मात्र आता सरकारने दिलेल्या ऑनलाइन सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद झाली आहे.

चला तर जाणून घेऊ Birth Certificate Online Apply करण्याची सोपी प्रक्रिया काय आहे तसेच यासाठी तुम्हाला कोणते आवश्यक कागदपत्रांची गरज पडणार आहे अशी संपूर्ण माहित या लेखामध्ये उपलब्ध आहे.

Ration Card New Rules 2025: गरीब व मध्यमवर्गीयांसाठी खुशखबर रेशनकार्डमध्ये मोठा बदल, महिलांसाठी खास सुविधा जाहीर

जन्म प्रमाणपत्रसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? Birth Certificate Online Apply Maharashtra

१) नोंदणी प्रक्रिया

  • सर्वप्रथम crsorgi.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • “General Public Sign Up” या पर्यायावर क्लिक करा.
  • नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, राज्य, जिल्हा आणि शहर/गाव यासह आवश्यक माहिती भरा.
  • ‘Register’ केल्यानंतर ईमेलवर आलेल्या लिंकवर क्लिक करून खाते सक्रिय करा.

२) लॉगिन करून अर्ज भरणे

  • नोंदणी पूर्ण झाल्यावर मिळालेल्या User ID आणि Password ने लॉगिन करा.
  • “Birth (Add Birth Registration)” या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज फॉर्ममध्ये खालील माहिती भरा:
  • मुलाचे/मुलीचे नाव
  • जन्म तारीख व वेळ
  • जन्म ठिकाण (रुग्णालय किंवा घर)
  • पालकांची माहिती (नाव, ओळखपत्र क्रमांक, पत्ता इ.)

३) आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे

  • पालकांचे आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र
  • रुग्णालयातील जन्मपत्र किंवा डिस्चार्ज स्लिप
  • घरगुती जन्म असल्यास शपथपत्र आणि पत्त्याचा पुरावा

फॉर्म सबमिट केल्यावर एक Application Number मिळतो, ज्याच्या मदतीने अर्जाची स्थिती (Status) तपासता येते.

Bank Of Maharashtra Loan: बँक ऑफ महाराष्ट्र त्यांच्या ग्राहकांना देत आहे 50 हजार पासून ते 10 लाखापर्यंत कर्ज

दाखला कधी मिळेल?

  • साधारणतः 7 ते 21 दिवसांत दाखला तयार होतो.
  • तुम्हाला आवश्यकता असल्यास तात्पुरता (Provisional) दाखला वेबसाइटवरून डाउनलोड करता येतो.
  • अंतिम प्रमाणित प्रत स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून मिळते.

उशिरा अर्ज केल्यास काय करावे?

  • जन्मानंतर 21 दिवसांच्या आत ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.
  • जर उशीर झाला, तर स्थानिक तहसील किंवा ग्रामपंचायत कार्यालयात ऑफलाइन अर्ज करावा लागतो.
  • यासाठी Notary कडून शपथपत्र व दोन साक्षीदारांची माहिती द्यावी लागते.

वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

जन्माचा दाखला हा भविष्यातील शैक्षणिक, सरकारी आणि आर्थिक कामांसाठी अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे नवजात बाळाच्या जन्मानंतर शक्य तितक्या लवकर ऑनलाइन अर्ज करावा. वेळेत अर्ज केल्यास प्रक्रिया सोपी होते आणि अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता राहत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *