लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये प्रतिमाह मिळवण्यासाठी CM Ladki Bahin eKYC करणे सर्व पात्र महिलांसाठी आवश्यक आहे. अन्यथा योजनेचे हफ्ते येण्यास बंद होईल. ज्या लाडक्या बहिणींनी ekyc प्रक्रिया पूर्ण केली त्याना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये एकत्र मिळणार अशी घोषणा अदिती तटकरे यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) महिलांना आर्थिक आधार देणारी महत्वाची योजना आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 म्हणजेच वर्षाला ₹18,000 थेट बँक खात्यात जमा होतात. मात्र काही अपात्र व्यक्तींनी लाभ घेतल्याचे आढळल्याने आता e-KYC अनिवार्य करण्यात आले आहे.
CM Ladki Bahin eKYC साठी आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महिलांनी पुढील कागदपत्रे तयार ठेवावीत.
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी पुरावा (15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड / मतदान ओळखपत्र / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
- उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी)
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास गरज नाही
- पांढरे रेशन कार्ड असल्यास आवश्यक
- बँक खात्याची माहिती (Aadhaar linked असणे बंधनकारक)
- विवाह प्रमाणपत्र (नवविवाहित महिलांसाठी)
- हमीपत्र (Affirmation Letter)
CM Ladki Bahin eKYC करण्याची प्रक्रिया
ऑनलाइन (Online)
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या ladakibahin.maharashtra.gov.in ‘e-KYC’ वर क्लिक करा
- आधार क्रमांक टाका व OTP द्वारे सत्यापन करा
- वैयक्तिक माहिती व कागदपत्रे भरा व अपलोड करा
- फॉर्म सबमिट करा
ऑफलाईन (Offline)
जवळच्या ई-महासेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन प्रक्रिया पूर्ण करा.
e-KYC ची मुदत आणि नवीन नियम
- सर्व महिलांसाठी e-KYC करणे बंधनकारक आहे.
- दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
- प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून e-KYC पुन्हा करावी लागेल.
- उद्देश – फक्त पात्र महिलांनाच योजनेचा थेट लाभ मिळावा.
लाडकी बहीण योजनेत बिनव्याजी कर्ज
या योजनेतून महिलांना आर्थिक मदतीबरोबरच व्यवसायासाठी ₹1 लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने मिळणार आहे.
- सुरुवात – सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये
- अंमलबजावणी – लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात
निष्कर्ष
महिलांनी वेळेत e-KYC पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे दरमहा मिळणारा ₹1,500 चा थेट लाभ सुरू राहील आणि पुढे मिळणाऱ्या ₹1 लाखापर्यंतच्या बिनव्याजी कर्जाचा फायदा घेणे सोपे होईल. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोपी आहे, परंतु अडचण आल्यास महिलांनी जवळच्या सेवा केंद्रात जाऊन मदत घ्यावी.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!
Yes