Aadhar Yojana Scholarship: मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आधार स्कॉलरशिप योजना म्हणजेच ज्ञानजोती सावित्रिबाबाई फुले आधार योजना होय. हि योजना महाराष्ट्रातील युवतींसाठी सावित्रीबाईंचे वरदानच बनलेली योजना आहे. हि योजना फक्त महाराष्ट्रातील गरजू मुलींना त्यांश्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करते, ज्यामुळे मुली सुद्धा मोठे मोठे पद मिळवण्यात यशस्वी होत आहेत.
मैत्रिणींनो, या योजनेच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. ज्याप्रकारे अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असते, त्याच प्रमाणे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.
Also Read: Azim Premji Scholarship 2025 : उच्च शिक्षणासाठी मुलींना थेट खात्यात मिळणार ₹30,000, ऑनलाईन अर्ज सुरू
Savitribai Phule Aadhar Yojana Scholarship काय आहे? (थोडक्यात)
राज्यातील ओबीसी समाजातील आर्थिक बाबतीत दुर्बल असलेल्या विद्यर्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत Dnyanjyoti Savitribai Phule Yojanaच्या माध्यमातून शासन देणार आहे. जे मूळ गाव सोडून बाहेर ठिकाणे आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी जातात आणि शासकीय वसतिगृहामध्ये त्यांचा नंबर लागत नाही, त्यांना त्यांच्या राहण्याचा, जेवण्याचा आणि इतर खर्चासाठी 60 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत भत्त्याच्या दिली जाते.
ज्यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण सोडून देणाऱ्या विद्याथ्यांचे प्रमाणात मोठी घट झाली आहे. अधिकृत माहितीनुसर एका जिल्ह्यातील किमान 600 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दरवर्षी दिला जात असतो.
योजनेचे उद्देश
राज्यासह देशामध्ये सुद्धा बहुसंख्य असलेला समाज हा ओबीसी आहे. परंतु अजून सुद्धा आर्थिक आणि सामाजिक बाबतीने त्यांना मागास म्हणूनच गणले जाते. त्यांचा सुद्धा सर्वागीण विकास आणि त्यांच्या नवीन पिढ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी राज्यशासनाने Savitribai Phule Aadhar Yojana Scholarship सुरु केलीली आहे. ज्यामुळं या महागाईच्या युगात शिक्षण घेतांना अधिक संघर्ष हा विद्यार्थ्यांना करावा लागू नये आणि नवीन पिढी शिक्षण घेण्यास प्रेरित होईल.
योजनेचे पात्रता निकष
योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील OBC प्रवर्गातीलच विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. जर अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक लाखापेक्षा जास्त असेल तर या योजनेमध्ये अपात्र केले जाईल. अर्जदार विद्यार्थी हा किमान बारावी उत्तीर्ण केलेला असावा आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
बाहेर ठिकाणी राहत असलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या खासगी वसतिगृह किंवा रूम मालकाचे लाईट बिल आणि राहण्याचे संपातीपत्र असे आवश्यक असेल. अर्जदार विद्यार्थी अनाथ असेल तर त्याला अनाथाचे प्रमाणपत्र लागेल. त्याचप्रमाणे अपंग असल्यास अपंगत्वाचे सुद्धा प्रमाणपत्र या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा नंबर शासकीय वसतिगृहामध्ये लागला नसेल त्यांनाच या योजनेच्या माध्यमातुन 60,000 हजाराचे अनुदान मिळेल.
लाभाची रक्कम
पुणे, मुंबई आणि इतर महानगर | 60,000 हजार |
महापालिका क्षेत्र | 51,000 हजार |
जिल्हा व तालुक्याचे ठिकाण | 43,000 हजार |
अर्ज पद्धती
विद्यार्थी मित्रांनो, Savitribai Phule Aadhar Yojana Scholarship करता तुम्हला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. परंतु अधिकतर विद्यार्थी हे ऑफलाईनच अर्ज करत असतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हयाचा समाजकल्याण विभागामध्ये जावे लागेल. तेथील OBC शिष्यवृत्ती कार्यालयामध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडून योजनेचा अर्ज मिळवावा लागणार आहे. नंतर त्यामध्ये जी कागदपत्रे मागितली ती गोळा करा, सर्व माहिती न चुकता भरा आणि कागदपत्रांसह समाजकल्याण कार्यालयातील अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
निष्कर्ष
बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना या योजनेविषयी माहिती नसल्यामुळे बरेच OBC प्रवर्गातील विद्यार्थी हे पैसे जास्त लागतात म्हणून शिक्षणच सोडून देतात. म्हणून जास्तीत जास्त हि योजना समाजातील प्रत्येक घकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमचा एक शेयर या योजनेच्या माध्यमातून कोणाचे तरी करियर आणि भविष्य उज्वल बनवूं शकते, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.