शेतकऱ्यांना पाईपलाईन खरेदीसाठी 3 लाखाचे अनुदान, 50% सबसिडी, असा करा ऑनलाईन अर्ज: Pipeline Anudan Yojana

Pipeline Anudan Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Pipeline Anudan Yojana: मित्रांनो, शेतीमध्ये जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा पाण्याची किती आवश्यकता असते याची शेतकरी बांधवांनाआहेच. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही त्यांना तर पाण्याच्या अभावामुळे हाती आलेले पीक मातीमोल होतांना स्वतःच्या डोळ्यांनी बघावे लागते. परंतु ते काहीच करू शकत नाहीत कारण वेळेच्या आधीच त्यांनी काहीच उपाययोजना केलेल्या नसतात. हि वेळ तुमच्यावर येऊ नये त्यासाठी Pipeline Anudan Yojana तुम्हला एक मोठी संधी देत आहे.

Also Read: Vihir Durusti Anudan: शेतकऱ्यांना खुशखबर..। जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळणार 1 लाखाचे अनुदान

Pipeline Anudan Yojana काय आहे?

या योजनेच्या माध्यमातून गरजू आणि पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिक्काची सिंचन व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी HDPE आणि PVC पाईप खरेदीसाठी 50% सबसिडी देत आहे. लाभार्थ्याला मिळणारे अनुदान हे त्याच्या योजनेतून मिळणाऱ्या पाईपच्या अनुसार कमाल 3 लाखाचे असेल. जो शेतकरी स्वतःजवळील लाखो रुपये खर्च न करता स्वतःच्या शेतातील सिंचानाची व्यवस्था टापटीप करण्याची इच्छा बाळगतो आणि जास्त उत्पन्न काढण्याची आशा ठेवतो, त्यांच्या साठी Pipeline Anudan Yojana कुठल्या दैवी वरदानापेक्षा कमी नाही.

पाईपलाईन अनुदान योजनेचे प्रमुख फायदे

शेतामध्ये जर सारी पडून किंवा दांड पडून पाणी वाहून नेण्याचा विचार केला तर एक ते दोन तासातच संपूर्ण विहीर/तळे मधील पाणी संपून जाईल. जेथे पाण्याची गरज नाही तिथे पाणी पाय जाईल आणि अधिकचे झुडपे तयार होतील. त्यामुळे जर पाईपलाईन असेल तर पिकांना वेळेवर आणि जेवढे हवे तेवढे पाणी वाया ना जात मिळत जाईल. पाईपलाईन मुले शेतकऱ्यांची मेहनत आणि वेळ दोन्ही वाचेल. तसेच शासनाच्या Pipeline Anudan Yojana मार्फत अर्धा खर्च तर शासनच देणार आहे. त्यामुळे कमी रकमेत शेतातील सिंचनाची समस्या मार्गी लागेल.

अनुदानाचे स्वरूप आणि दर

पाईपचे प्रकार मीटर नुसार अनुदान
HDPE पाईप 50/-रुपये प्रति मीटर
PVC पाईप 35/-रुपये प्रति मीटर
HDPE लाईन 20/-रुपये प्रति मीटर

पाईपलाईन अनुदान योजनेचे पात्रता निकष

या योजनेचं लभ फक्त महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या शेतकऱ्यालाच दिला जाणार आहे. तसेच त्या अर्जदाराच्या नावाने शेती असणे किंवा शेतीच्या सातबाऱ्यांमध्ये अर्जदाराचे नाव आसने आवश्यक असेल. अर्जदाराच्या बँक खात्याशी आधार लिंक असणे बंधनकारक आहे.एका कुटुंबातील आणि एका सातबाऱ्यावरील एकाच व्यक्तीला या Pipeline Anudan Yojana चा लाभ दिला जाईल.

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पाणीपुरवठा स्रोत असल्याच्या पुरावा(विहीर/धारण/नदी)
  • 7/12 उतारा, 8-अ

MahaDBT अर्ज कसा करावा?

आधी या योजनेचे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने पंचायत समिती मध्ये करावे लागत होते. आता मात्र इनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हला MahaDBT पोर्टल ला ओपन करावे लागणार आहे. नंतर तिथे तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या आणि नंतर परत लॉग इन करा.मेनू मध्ये जाऊन पाईपलाईन अनुदान योजना हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. विचारण्यात आलेली तुमच्या शेतीची आणि सिंचन व्यवस्थेची संपूर्ण माहिती भरा. मागण्यात आलेले तीन-चार कागदपत्र उपलोड करून टाका आणि अर्ज सबमिट करा. तुम्ही जर पाइपलाइनच्या लाभास पात्र झाले तर अनुदानाची रकम डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये MahaDBT च्या माध्यमातून जमा केली जाते.

निष्कर्ष

“जल हि जीवन है” या घोषवाक्यानुसार जर आपल्याला चांगले जीवन जगायचे असेल आणि आपल्या पिकाला योजना जल देऊन योग्य जीवन द्यायचे असेल तर पाण्याचे नियोजन अतिआवश्यक ठरणार आहे. त्यामुळे पाण्याची साठवणूक असणेही तेवढेच आवश्यक आहे. म्हणून पाणी अति प्रमाणात वाया जाऊ नये या साठी शासनाचा उपक्रम आहे ज्याचा लाभ हा शतकऱ्यांना अधिक उड़ा काढण्यासाठी तर होतोच आणि हा पाण्याचा प्रमाणात उपाय बनून जातो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *