PM Ujjwala Yojana: मित्रांनो आणि भगिनींनो, प्रधानमंत्री उज्वला योजना तुमच्या नक्कीच परिचयाची असणार आहे. जी भारत सरकारने गरजू आणि गरीब कुटुंबातील महिलांची व्यथा जाणून घेऊन ते कमी करण्याचा प्रयत्न हि योजना राबवून केला आहे. भलेही गॅस सिलेंडरचे भाव महागले असले तर मात्र गॅस कनेक्शन सरकार अगदी मोफत देणार आहे.
आजच्या काळात होणारे वायू प्रदूषण आपल्याला माहीतच आहे, त्यातच वेगळ्या वेगळ्या बिमार्यासुद्धा आपल्या देशात अधून मधून भेटीला येत असतात. अशातच महिलांचे आरोग्य बिघडले तर संपूर्ण एका परीवाला धोका होऊ शकतो. म्हणून शासनाने PM Ujjwala Yojana 2025 मध्ये परत नवीन उपडेट सह दिवाळीच्या आधी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून सणासुदीच्या काळात महिलांना चुलीवर स्वतःची प्रकृती बिघाड पर्यंत परिश्रम करण्याची गरज पडणार नाही.
Also Read: Aadhar Yojana Scholarship| राज्यातील मुलींना शिक्षणासाठी मिळणार 60,000 हजाराचे अनुदान.
PM Ujjwala Yojana 2.0 म्हणजे काय?
प्रधानमंत्री उज्वला योजना 1 मे 2016 पासून देशभर राबवण्यात आलेली होती, तेव्हापासून आत्तासुद्धा हि योजना यशस्वीरीत्या राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना मोफत गॅस कनेक्शन सोबत मोफत गॅस दिलेण्डर सुद्धा दिले जाते. जेणेकरून गरजू आणि गरीब महिलांचे आरोग्य चांगले राहील. या पूर्वी गॅस कनेक्शन घेण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती, त्यामुळे भरायचं महिला ते घेऊ शकत नव्हत्या म्हणून चुलीवरच लाकडे आणि इतर इनधन जाळून स्वयंपाक करत होत्या. ज्यामुळे त्यांच्या डोळ्यासह आरोग्यावर मोठा परिणाम होत होता. तसेच पर्यावरणाला सुद्धा मोठी हानी यामुळे होत होती, म्हणून सरकारने PM Ujjwala Yojana अंतर्गत मोफत गॅस कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे.
योजनेचे उद्देश
महिलांच्या आरोग्याची रक्षण करून त्यांना धूरमुक्त आणि पर्यावरणाशी पूरक असे इंधन उपलब्ध करून देणे. प्रदूषण कमी करून देशातील वातावरण स्वच्छ ठेवणे, जेणेकरून श्वसनाच्या बिमाऱ्या उद्भवू नये. देशातील गरीब कुटुंबातील महिलांच्या नावं गॅस देऊन त्यांना सशक्त बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे. पारंपरिक पद्धतीचे इंधनाचा वापर कमी करण्यास आणि स्वच इंधनाचा वापर करण्यास प्रोतसाहित करणे.
योजनेची पात्रता
PM Ujjwala Yojana चा लाभ हा फक्त आणि फक्त देशातील महिलांनाच आहे मिळणार आहे. त्यामुळे अर्जदार हि महिला असणे आवश्यक असेल. त्याचप्रमाणे महिला दारिद्र्य रेषेखालील असावी आणि त्यांच्याकडे यापूर्वी कुठलेही गॅस कनेक्शन नसावे.
योजनेअंतर्गत मिळणारे फायदे
प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या माधयमातून मोफत गॅस कनेक्शन सोबत मोफतच गॅस सिलेंडर सुद्धा दिले जाते. तसेच गॅसची शेगडी हि कनेक्शनसोबतच मिळत असते. अर्थात हि योजना पूर्णपणे फ्री आहे. तसेच लाभार्थी महिलेच्या खात्यावर दर वेळेला घेतलेल्या सिलेंडरवर सबसिडी सुद्धा जमा करण्यात येणार आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहते आणि घरामध्ये धूर होत नाही. याचप्रकारे जर महिला हि महाराष्ट्रातील रहिवासी असेल तर तिला राज्यसरकार अंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर अन्नपूर्ण योजनेअंतर्गत दार वर्षी मिळणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- राशन कार्ड
- पासपोर्ट फोटो
अर्ज कसा करावा?
PM Ujjwala Yojana करता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरातील गॅस एजन्सी ला भेट द्यावी लागेल. त्यांच्याकडून अर्ज घेऊन तो तेथच भरून कागदपत्र जोडून तिथेच सबमिट करावा लागणार आहे. लक्षात ठेवा अर्जदार महिला त्यावेळी तिथे उपस्थित असणे अनिवार्य असणार आहे. तुम्हाला अर्ज पात्र झाला तर तुमच्या घरपोच तुम्हला गॅस कनेक्शन संपूर्ण वस्तूंसह बसून दिले जाणार आहे.
निष्कर्ष
देशातील सर्वात मोठा सन म्हणून समजल्या जाणाऱ्या दिवाळी ला सगळीकडे उत्स्वास साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरी नवीन काही तरी पक्वान्न बनवले जातात, पावणे येत असतात. अशा वेळेला जर तुमच्या घरामध्ये चुलीचा धूर असेल तर काय होईल. म्हणून केंद्रसरकारने दिवाळीचा उत्सव सर्वांचा चांगला होण्यासाठी PM Ujjwala Yojana अंतर्गत दिवाळीपूर्वी 25 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्धार केला आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
I want gas