PM Kisan Yojana 21st Kist: देशातील लाखो शेतकरी पीएम किसान योजना 21वी किस्त ची वाट पाहत आहे. अनेकदा असे दिसून आले कि तारीख सुद्धा जाहीर झाली आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. रिपोर्टनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात २० ऑक्टोबर पर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
PM Kisan Yojana 21st Kist कधी येणार?
शेतकरी बांधवांनो वाट पाहण्याची वेळ संपली लवकरच दिवाळी अगोदर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हफ्ता येण्यास सुरुवात होईल. रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार 21वा हप्ता 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवू शकते. यावेळी दिवाळीचा सण 21 ऑक्टोबरला असल्यामुळे सरकार शेतकऱ्यांना सणापूर्वी आर्थिक मदत देण्याच्या तयारीत आहे. मागील 20 वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यात आला होता. प्रत्येक चार महिन्यांच्या अंतराने हप्ते दिले जातात, त्यामुळे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील हप्ता येण्याची शक्यता जास्त आहे.
या राज्यांतील शेतकऱ्यांना आधीच मिळाली रक्कम
या वेळी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यांतील शेतकऱ्यांना 21वा हप्ता सप्टेंबर महिन्यातच मिळाला आहे. या राज्यांमध्ये पुर, भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे केंद्र सरकारने या राज्यांना अवकाळी मदत म्हणून आधीच रक्कम दिली. बाकी राज्यांतील शेतकऱ्यांना ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात हप्ता मिळेल अशी शक्यता आहे.
आपल्या हप्त्याची स्थिती कशी तपासाल?
शेतकरी बंधू तुम्ही आता घरबसल्या आपल्या मोबाईलवरूनच आपला पीएम किसान योजनेचा हप्ता सहज तपासू शकता. यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in उघडा. त्यानंतर होमपेजवरील ‘Farmers Corner’ या विभागात जा आणि तिथे दिसणाऱ्या ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा. पुढे नवीन पेज उघडेल, त्यात आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि ‘Get Data’ या बटणावर क्लिक करा. आता तुमच्या स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिसेल. या प्रक्रियेद्वारे तुम्ही मागील हप्त्याची तारीख तसेच पुढील हप्त्याची स्थितीही पाहू शकता.
तुमचा हप्ता का थांबू शकतो?
अनेक वेळा काही शेतकऱ्यांचा पीएम किसान योजनेचा हप्ता विविध कारणांमुळे थांबतो. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की, ज्यांचे सर्व दस्तऐवज योग्य आणि अद्ययावत आहेत त्यांनाच हप्त्याचा लाभ मिळेल. जर काही त्रुटी आढळल्या, तर हप्ता तात्पुरता थांबवला जातो.
सर्वप्रथम, ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न केल्यास तुमचा हप्ता थांबू शकतो, कारण आता ही प्रक्रिया सर्व लाभार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. दुसरे म्हणजे, जमिनीची पडताळणी प्रक्रिया (Land Verification) प्रलंबित असल्यास राज्य सरकारकडून तुमचे नाव यादीत रोखले जाऊ शकते.
तसेच, बँक तपशील चुकीचा असल्यास, जसे की IFSC कोड किंवा खाते क्रमांकात चूक असल्यास, रक्कम खात्यात जमा होऊ शकत नाही. याशिवाय, आधार कार्डवरील नाव आणि अर्जातील नाव यामध्ये फरक असल्यास देखील तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे हे सर्व तपशील वेळेवर दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून पुढील हप्ते वेळेवर मिळू शकतील.
निष्कर्ष | दिवाळीपूर्वी मिळेल सरकारकडून गोड बातमी
सध्या सर्वांचे लक्ष 20 ऑक्टोबर 2025 या तारखेकडे लागले आहे. त्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 ची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा आणि आनंदाची बातमी ठरेल.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!