Mahila StartUp Yojana: महिलांना उद्योगासाठी मिळणार 1 लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत, असा करा अर्ज

Mahila StartUp Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mahila StartUp Yojana: राज्यसरकार महिलांना आत्मनिरभर बनवण्यासाठी विविध योजना नेहमी वापरत असते. त्या योजनांपैकी अतिशय महत्वाकांक्षी असलेली Mahila StartUp Yojana होय. याच योजनेचे दुसरे नाव पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना हे सुद्धा आहे. राज्यातील महिलांचे जे नवीन स्टार्ट-अप असतील त्यांना अधिक मोठे करण्यासाठी किंवा ज्या महिला स्वतःचे उद्योग सुरु करण्यास इच्छुक आहेत त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी हि योजना महाराष्ट्रसरकार राज्यभर राबवत आहे.

Also Read: Aai Karj Yojana 2025: उद्योग करण्यासाठी इच्छुक महिलांना मिळणार 15 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज, असा करा अर्ज

Mahila StartUp Yojana। काय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना?

राज्यातील महिला ह्या सक्षम होण्यासाठी, युवा तरुणींनी उद्योगाकडे वळण्यासाठी हि योजना एक मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे. कारण Mahila StartUp Yojana च्या माध्यमातून राज्यसरकार नवीन उद्योग सुरु करणाऱ्या महिलांना आणि ज्यांचे आधीच स्टार्टअप आहे त्याला वाढवण्यासाठी 1 लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत देऊ करणार आहे.

त्यामुळे महिलांना उद्योग क्षेत्रामध्ये करियर बनवण्याची हि मोठी संधी शासन देत आहे. विशेषतः आर्थिक बाबतीत दुर्बल असलेल्या महिलांना आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील महिलांना एकूण उपलब्ध असलेल्या निधींपैकी 25% निधी राखीव असणार आहे. त्यामुळे या प्रवर्गातील महिला उद्योजकांनासुद्धा विशेषे एका लाखांपासून पुढे जेवढा निधी आवश्यक आहे तेवढा मिळवता येणार आहे.

योजनेचे फायदे

राज्यातील महिला उद्योजकांना आर्थिक मदत मिळवून सशक्त बनण्यासाठी अतिशय उपयुक्त हि योजना आहे. महिलांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी आणि त्याच्या विकास करण्यासाठी इतर कुठले कर्ज काढण्याची आवश्यकता महिलांना पडणार नाही. महिलांना जर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर उद्योग केल्या शिवाय पर्याय नाही म्हणून तरुणींना उद्योगाकडे एक पाऊल पुढे जाण्यासाठीचा हा मदतीचा हात आहे.

हि योजना कोणासाठी आहे?

महाराष्ट्र राज्याच्या महिला उद्यजिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच त्या महिलांचे स्टार्टअप DPIIT व MCA अंतरंगात नोंदणीकृत असायला हवे. सुरु केलेल्या छोट्या किंवा मोठ्या स्टार्टअप चे कामाला स्वामित्व अर्थातच 51% शेयरधारकत्व अर्जदार महिलेकडे असावे. त्याच प्रमाणे महिलेचे वार्षिक उत्पन्न किमान दहा लाखापेक्षा जास्त असावे आणि यापूर्वी कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊन आर्थिक मदत मिळवलेली नसावी.

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील?

  • DPIIT प्रमाणपत्र
  • MCA प्रमाणपत्र
  • ऑडिट रिपोर्ट
  • पीच डेक, उत्पाद सेवा फोटो, संस्थाहपकाचा फोटो
  • रहिवासी दाखला
  • उद्यम आधार
  • बँक पासबुक

अर्ज कसा करावा?

Mahila StartUp Yojana किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या msins.in या अधिकृत पोर्टलवरती जावे लागेल. तिथे तुमच्या स्टार्टअप ची नोंदणी करून अर्ज करता येणार आहे.

निष्कर्ष

राज्यातील अधिकतर महिलांना या योजनेविषयी माहितीच राहत नाही आणि जी माहिती मिळतेसुद्धा ते पूर्णपणे नसते. त्यामुळे महिला ह्या उवयोगी असलेल्या योजनांपासून वंचितच राहतात आणि स्वतःचे स्टार्टअप वाढवण्याने अधिक व्याजदर असलेल्या बँकेकडून कर्ज काढत असतात. ज्याचा तोटा असा होतो कि त्यांचा उद्योग विकास करतो मात्र विकास झालेला सर्व पैसे हा व्याज चुकवण्यातच जातो. त्यामुळे महिला उद्योजकांनी सरकारी योजनेचा लाभ घेऊनच उद्योग वाढवायला हवं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *