PM Awas Yojana Gramin Registration 2025: गरीबांसाठी आनंदाची बातमी सरकार देणार मोफत घर, अर्ज करण्याची संधी गमावू नका

PM Awas Yojana Gramin Registration
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PM Awas Yojana Gramin Registration 2025: भारत सरकारची “प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)” ही देशातील सर्वात लोकप्रिय योजना असून गरीबांसाठी अतिशय उपयुक्त योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो बेघर कुटुंबांना पक्के घर मिळण्याची संधी मिळाली आहे. आता 2025 मध्ये पुन्हा एकदा या योजनेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. ग्रामीण भागातील पात्र नागरिक आता अर्ज करून आपले पक्के घराचे स्वप्न साकार करू शकतात.

ग्रामीण भागातील गरीब, बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे हे या योजनेचा उद्देश आहे. सरकारकडून प्रत्येक पात्र कुटुंबाला घर बांधण्यासाठी ₹1.20 लाख ते ₹1.30 लाख इतकी आर्थिक मदत दिली जाते. डोंगराळ भागांसाठी ही मदत थोडी जास्त असते.

Mofat Bhandi Yojana 2025: सरकार देणार ₹३०,००० किमतीचा भांडी संच मोफत, अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू

आर्थिक मदत किती मिळते?

क्षेत्रमदतीची रक्कम
सामान्य क्षेत्र₹1.20 लाख
डोंगराळ क्षेत्र₹1.30 लाख
मनरेगा मजदुरी सहाय्य₹90.95 प्रति दिवस (सध्याच्या दरानुसार)
शौचालय बांधणीसाठी अतिरिक्त मदत₹12,000

कोण अर्ज करू शकतो? (पात्रता निकष)

हि योजना देशातील गरीब व गरजू कुटुंबासाठी राबवली जात आहे. PM Awas Yojana Gramin Registration करण्यासाठी आवेदक भारतीय नागरिक असून ग्रामीण भागातील असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्जदाराकडे कच्चे किंवा अर्धपक्के घर असावे किंवा तो बेघर असावा. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नौकरी वर नसावी. पूर्वी सरकारकडून घर मिळालेले नसावे अशा पात्र कुटुंबाना या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे.

Smart Roof Top Solar Yojana: शासनाची नवीन योजना, 1000 रु. मध्ये मिळेल घरावरील सोलर पॅनल। मिळणार 95% अनुदान

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • बँक पासबुक
  • मोबाइल नंबर
  • जमिनीचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

पीएम आवास योजना ग्रामीण अर्ज प्रक्रिया | PM Awas Yojana Gramin Registration

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://pmayg.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या “Data Entry” या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर “PMAY-G Registration” हा पर्याय निवडा.

यानंतर लॉगिन करण्यासाठी तुमच्या राज्यातील पंचायत कार्यालय किंवा BDO कार्यालयातून लॉगिन आयडी मिळवा. लॉगिन झाल्यावर अर्ज फॉर्ममध्ये आपले नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, उत्पन्न, आधार क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा. त्यानंतर विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

तुम्ही दिलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या आणि अर्ज सबमिट करा. अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक Acknowledgment Number मिळेल तो भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.

संपर्क माहिती

PM Awas Yojana Gramin Registration Online करण्यासाठी काही अडचणी येत असेल किंवा काही तुमच्या समस्या असेल तर खाली दिलेल्या हेल्पलाईन नंबर वर तुम्ही संपर्क करू शकता.

🌐 अधिकृत वेबसाइट: https://pmayg.nic.in
📞 हेल्पलाइन नंबर: 1800-11-6446
📧 ईमेल: pmayg-nic@gov.in

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *