Matru Vandana Yojana In Marathi 2025: भारत सरकारने महिलांच्या आरोग्य आणि पोषणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामधील एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana – PMMVY). या योजनेचा उद्देश गर्भवती आणि स्तनदा महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा लाभ महिलांना कसा मिळेल, पात्रता काय असणार आणि अन्य सविस्तर माहिती.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana – PMMVY म्हणजे काय?
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे, जी 2017 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत पहिल्यांदा गरोदर असलेल्या महिलांना गर्भव्यस्थेत आणि बाळ जन्मानंतर योग्य काळजी घेण्यासाठी ₹5,000 पर्यंतची आर्थिक मदत सरकार कडून दिली जाते.
या योजनेत मिळणारे लाभ
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण ₹5,000 ची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. पहिला हप्ता गर्भधारणेची नोंदणी झाल्यानंतर दिला जातो, तर दुसरा हप्ता किमान एका गर्भपूर्व तपासणीनंतर मिळतो. तिसरा आणि शेवटचा हप्ता बाळ जन्मानंतर व पहिली लसीकरण सेवा पूर्ण झाल्यानंतर दिला जातो. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये राज्य सरकारकडून किंवा जननी सुरक्षा योजनेतून अतिरिक्त ₹1,000 ची मदत मिळू शकते, ज्यामुळे एकूण आर्थिक सहाय्य आणखी वाढते.
पात्रता (Eligibility)
Matru Vandana Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी घोषित केल्या आहेत. अर्जदार महिला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे आणि ती पहिल्यांदाच गर्भवती असावी. तसेच, सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. ही योजना फक्त पहिल्या जिवंत बाळाच्या जन्मासाठी लागू आहे, त्यामुळे दुसऱ्या किंवा पुढील बाळासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
खाद्यतेल झाले स्वस्त! जाणून घ्या 15 लिटर डब्याचे आजचे ताजे दर | Edible Oil Price 2025
PMMVy साठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- गर्भधारणेची नोंद असलेले हेल्थ कार्ड
- ओळखपत्र (मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड इ.)
- पतीचा ओळख पुरावा (जर आवश्यक असेल तर)
- अर्ज फॉर्म (ऑफलाइन किंवा ऑनलाइन उपलब्ध)
अर्ज कसा करावा?
Matru Vandana Yojana अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते. योजनेसाठी पात्रता निश्चित करून अर्ज प्रक्रिया करावी तसेच अर्ज करण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
ऑफलाइन पद्धत
जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) जाऊन अर्ज भरता येतो.
ऑनलाइन पद्धत
मातृ वंदना योजना फॉर्म Online भरण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://pmmvy.nic.in ला भेट द्यावी. त्यानंतर “Beneficiary Registration” या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी आणि लागणारी कागदपत्रे अपलोड करावीत. सर्व तपशील भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज सादर झाल्यानंतर मिळालेला अर्ज क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी नोंदवून ठेवणे आवश्यक आहे.
जुन्या PMMVY CAS योजने अंतर्गत देण्यात आलेल्या लाभाचे टप्पे
लाभ द्यावयाचे टप्पे | लाभाचे निकष |
१ ला हप्ता रु.१०००/- | मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भ धारणा नोंदणी केल्यानंतर प्राप्त होतो. |
२ रा हप्ता रु.२०००/- | किमान एकदा प्रसुतिपूर्व तपासणी केल्यास गर्भ धारणाचे ६ महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या जमा केला जातो. |
३ रा हप्ता रु.२०००/- | प्रसुतिनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी,ओपीव्हीझीरो,तसेच पेन्टाव्हॅलेन्ट व ओपीव्ही चे ३ मात्रा अथवा समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता लाभार्थ्याच्या जमा केला जातो. |
निष्कर्ष
Matru Vandana Yojana ही महिलांसाठी आरोग्यदायी मातृत्व आणि सुरक्षित बाळ जन्मासाठी सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे. योग्य वेळी अर्ज करून प्रत्येक पात्र महिलेनं या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेबद्दल संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला मराठी भाषेत सांगितली आहे, अश्याच योजनांची माहितीसाठी आमच्या व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन करा. धन्यवाद!
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!