Ladki Bahin Diwali Bonas: राज्यातील या लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 2,000 बोनस, 40 कोटींचा निधी मंजूर.

Ladki Bahin Diwali Bonas
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Diwali Bonas: राज्यातील महिलांना आणखी एक खुशखबर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात आली आहे. आता दिवाळीला फक्त दहा दिवस बाकी राहिलेले आहेत. म्हणून दिवाळी अतिशय आनंदाने साजरी होण्यासाठी राज्यातील काही लाडक्या बहिणींना 2,000 बोनस म्हणून देण्याचे नियोजनच महाराष्ट्र शासनाने केले आहे. एवढेच नाही तर 40 कोटींचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला असून लवकरच बोनस मिळवण्यासाठी पात्र असलेल्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये बोनस जमा केला जाणार आहे. तर चला बघूया कोण असेल या दिवाळी बोनसचा लाभ घेण्यासाठी पात्र.

Also Read: Ladki Bahin Yojana EKYC Process Link: लाडक्या बहिणींनो सावधान। या अधिकृत वेबसाईटवरच करा Ekyc

कोणत्या महिलांना मिळणार दिवाळी बोनस?

ज्या महिला समाजातील सर्वच जाती धर्माच्या पालकांचा दिवसभर सांभाळ करता असतात. त्यान्ना चांगले भोजन शासनाने पुरवलेल्या अन्नातून बनवून देत असतात. अशा महिलांना महाराष्ट्र शासन दिवाळी आधी दिवाळी बोनस 2,000 रुपये देत आहे. अर्थातच राज्यातील ज्या महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत, त्यांनाच महिला व बालविकास विभागांतर्गत हा बोनस दिला जाणार आहे. ज्यामुळे या लाडक्या बहिणींना पगारा अतिरिक्त 2,000 रुपये बोनस मिळत असल्याने त्यांची दिवाळी अतिशय णानदी आणि उत्साही बनणार आहे. हि रक्कम भाऊबीजेच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आलस्यामुळे याला Ladki Bahin Diwali Bonas असे नाव देण्यात आले आहे.

महिलांच्या सन्मानार्थ बोनस मिळणार

मित्रांनो, अंगणवाडी सेविका असो किंवा अंगणवाडी मदतनीस असो. यांना जरी अजून कायमस्वरूपी शासकीय सेवेत शासनाने घेतले नसले तरी त्या आपले काम अतिशय प्रामाणिक पणे करत असतात. ज्या परीवाराची परिस्थिती मुलांना खासगी शाळांमध्ये टाकण्याची नसते ते गावातीलच अंगणवाडी केंद्रांमध्ये टाकत असतात. आणि तिथेच दिवसभर चांगले संस्कार देण्याचे काम हे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करत असतात. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे भविष्याचा पाय हा सर्वप्रथ गावातील अंगणवाडीमध्ये पक्का केला जातो. आणि यांच्या या मेहनतीला समूहांना देण्यासाठी शासन त्यांना बहीण मानून दिवाळीला 2,000 बोनस देत आहे.

अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोतसाहन

Diwali Bonas हा अंगणवाडी सेविकांना आणि राज्यातील अंगणवाडी मदतनिसांना बाऊबीजेला मिळणार आहे. हे त्यांच्या कार्याचा सन्मानार्थ तर असेलच सोबत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीही देण्यात येत आहे. मित्रांनो, साध्याच लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरच्या हप्ता सर्व महिलांच्या खात्यात जमा केला गेला, ज्यामुळे सर्व महिलेला आनंदी तर आहे आणि अशातच भाऊबीजेला येणाऱ्या बोनसने पात्र महिलांचा आनंद दुप्पट झाला आहे. ज्यामुळे पुढे सुद्धा असेच बाळांचे भविष्य घडवण्यासाठी त्यांना प्रोत्सान मिळत राहील.

निष्कर्ष

हि योजना फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करता असणार आहे. त्यामुळे इतर महिलांना या बोनसच कुठलाही लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी. कारण ह्या लाडक्या बहीण भविष्याचा आणि विकासाचा आधारस्तंभ आहे असे सरकारचे म्हणणे आहे. म्हणून जेवढे यांना मजबूत केले जाईल तेव्हडा अधिक महाराष्ट्र विकास होईल आणि बालकांचा विकास होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 thoughts on “Ladki Bahin Diwali Bonas: राज्यातील या लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 2,000 बोनस, 40 कोटींचा निधी मंजूर.”