MBOCWW योजनेखाली कामगारांना दरमहिना मिळणार अनुदान, महाराष्ट्र सरकारची हि संस्था या नागरिकांना देत आहे अनेक सुविधा

MBOCWW
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MBOCWW म्हणजे Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board (महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ) होय. पंजीकृत सर्व कामगारांना हि संस्था अनेक योजनांचा व सुविधांचा लाभ प्रदान करते. राज्यातील बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबांसाठी राज्य सरकार या संस्थेतून अनेक योजना राबवतात. काही योजना अश्या आहेत ज्या लाभार्थी पात्र नागरिकांना दरमहिन्याला अनुदान देतात तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी योजना राबवण्यात येतात.

योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हि प्रक्रिया लवकर करा, चुकीचा मोबाईल नंबर असल्यास बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळणार नाही | HIKIT Mahabocw Appointment सुरू!

MBOCWW म्हणजे काय?

MBOCWW यालाच मराठी मध्ये “महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ” असे म्हणतात. हे एक राज्यातील बांधकाम कामगारणासाठी राज्य सरकारने निर्माण केलेलं पोर्टल आहे. यावर अनेक प्रकारच्या सुविधा व योजना बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध आहे. या मंडळाचे उद्दिष्ट म्हणजे बांधकाम मजुरांचे आर्थिक, सामाजिक आणि वैद्यकीय कल्याण सुनिश्चित करणे.

MBOCWW Portal

मंडळाचे उद्देश

MBOCWW मंडळाचे मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना मदत करणे हा आहे. या मंडळामार्फत कामगारांची नोंदणी करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि राहण्यासाठी लागणारी मदत दिली जाते. काम करताना अपघात झाल्यास, मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास सरकारकडून आर्थिक मदत मिळते. कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते, जेणेकरून त्यांचे शिक्षण थांबू नये. तसेच महिला कामगारांना प्रसूतीसाठी आणि आरोग्यासाठी विशेष मदत दिली जाते. या मंडळाचा उद्देश म्हणजे कामगारांचे जीवनमान सुधारावे आणि त्यांना सुरक्षित व स्थिर जीवन मिळावे.

कोण नोंदणी करू शकतो?

MahaBOCW मंडळात नोंदणी करण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि त्याचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे. गेल्या १२ महिन्यांपैकी किमान ९० दिवस अर्जदाराने बांधकाम क्षेत्रात काम केलेले असणे गरजेचे आहे. अर्जदार कोणत्याही बांधकामाशी संबंधित कामात कार्यरत असावा, जसे की सुतार, मिस्त्री, सिमेंट कामगार, पेंटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर किंवा इतर बांधकामाशी निगडित व्यवसाय. या अटी पूर्ण केल्यासच कामगार मंडळात नोंदणी करून विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो.

Mofat Bhandi Yojana 2025: सरकार देणार ₹३०,००० किमतीचा भांडी संच मोफत, अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू

बांधकाम कामगारांसाठी मिळणारे लाभ

  • शैक्षणिक सहाय्य – मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
  • वैद्यकीय सहाय्य – आजारपण किंवा अपघात झाल्यास उपचारासाठी मदत
  • मृत्यू सहाय्य – कामगाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत
  • अपंगत्व सहाय्य – काम करताना झालेल्या अपघातामुळे अपंगत्व आल्यास मदत
  • मातृत्व लाभ योजना – महिला कामगारांसाठी गर्भधारणा व प्रसूतीसाठी आर्थिक मदत
  • घर बांधणी योजना – स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य
  • विवाह सहाय्य योजना – कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी मदत
  • साहित्य वितरण – सायकल, शालेय साहित्य, सुरक्षा साहित्य वितरण

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पत्ता पुरावा (रहिवासी दाखला)
  • वयाचा पुरावा (जन्म दाखला / शाळेचा दाखला)
  • रोजगाराचा पुरावा (कंत्राटदाराकडून प्रमाणपत्र / कामाचा दाखला)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खाते पासबुकची प्रत

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

MBOCWW मध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. सर्वप्रथम अर्जदाराने अधिकृत वेबसाइट https://mahabocw.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर “Worker Registration” या पर्यायावर क्लिक करावे. पुढे तुमचे नाव, पत्ता, व्यवसाय आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि मिळालेला नोंदणी क्रमांक सुरक्षित ठेवावा. हा क्रमांक पुढील सर्व व्यवहारांसाठी उपयोगी ठरतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून गरीब विद्यार्थ्यांसाठी ₹51,000 मोठी शिष्यवृत्ती मदत | Swadhar Yojana

नोंदणी शुल्क

प्रथम नोंदणी करताना₹25
त्यानंतर दरवर्षी₹60 नूतनीकरण शुल्क भरावे लागते

निष्कर्ष

MBOCWW मंडळ हे बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी अतिशय महत्वाचे पोर्टल आहे. या योजनेमुळे हजारो कामगारांना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक मदतीचे विविध लाभ मिळत आहेत. म्हणूनच, जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात काम करत असाल तर तात्काळ नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्या आणि तुमचे व तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *