Pandit Dindayal Swayam Yojana: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने आणखी एक शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. जे विद्यार्थी गरीब आहेत आणि शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नाही. अशा विद्यार्थ्यांना Pandit Dindayal Swayam Yojana अंतर्गत 60 हजार स्कॉलरशिप, शासन देणार आहे. ज्यामुळे त्यांचा राहण्याचा, खाण्याचा आणि शैक्षणिकी साहित्याचा सम्पुर्ण खर्च निघेल.
Pandit Dindayal Swayam Yojana काय आहे?
विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खास योजना आलेली आहे, जी कि Pandit Dindayal Swayam Yojana म्हणून ओळखली जाते. परंतु या योजनेला अधिकृत पणे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योज़ना आहे. या योजनेच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक मागास असलेल्या दहावी पास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी 60 हजार स्कॉलरशिप प्रति वर्ष अनुदान स्वरूपात मिळणार आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनाच नंबर हा शासकीय वसतिगृहामध्ये लागला नाही त्यांना हि मदत मिळणार आहे.
योजनेचे उद्देश
राज्यातील गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करून चांगले शिक्षण घेण्यास प्रोत्सहीत करणे. सोबतच खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था हवावी यासाठी सुद्धा भत्ता देणे. जेणेकरून उच्च शिक्षण घेताना कुठल्याही अडचणी विद्यार्थ्याला येऊनये.
योजनेचा अर्ज कोण करू शकतो?
महाराष्ट्र राज्यातील स्थानिकांच्या रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. मात्र तो विद्यार्थी हा SC,ST,OBC जात प्रवरांगातील असणे आवश्यक आहे. दहावी नंतर विद्यार्थ्याने कुठल्याही शाखेचे प्रवेश घेताला असला तरी या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु जर शासकीय वसतिगृहामध्ये त्याला प्रवेश मिळाला असेल तर 60 हजार स्कॉलरशिप Pandit Dindayal Swayam Yojana मार्फत मिळणार नाही. सोबतच जर अर्जदार हा 28 पेक्षा जास्त वयाचा असेल आणि त्याचे उत्पन्न 2.5 ते 8 लाखाच्या दरम्यान नसून अधिक असेल तर त्याला अपात्र केले जाणार आहे.
असा मिळणार लाभ
पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याचे भाडे, खाण्याचा खर्च आणि इतर शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी Pandit Dindayal Swayam Yojana मार्फ़त 60 हजार स्कॉलरशिप शासन देत आहे. हा मिळणार लाभ जिल्हा, तालुका आणि महानगरपालिकेनुसार कमी जास्त असणार आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- मागील परीक्षेचे मार्कशीट
- बोनाफाईड/प्रवेश पावती
- बँकेचे पासबुक
असा करा ऑनलाईन अर्ज
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर गूगल वर swayam.mahaonline.gov.in सर्च करा. नंतर तुम्ही अधिकृत पोर्टल जाल. तिथे New Registration असा एक पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लीक करा. आता तिथे Pandit Dindayal Swayam Yojana चा अर्ज येईल त्यात विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती आणि कागदपत्रे अपलोड करून घ्या. आता खालील सबमिट बटनावर क्लिक करूनअर्ज सबमिट करा आणि प्रिंट काढून तुमच्या कॉलेज किंवा संबंधित विभागात जाऊन सबमिट करा.
पंडित दीनदयाल उपाध्याय योजना स्कॉलरशिप अर्ज | येथे क्लीक करा |
निष्कर्ष
मित्रांनो अनुसूचित जाती आणि जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच नंबर जर शासकीय वसतिगृहात नाही लागला किंवा स्वाधार, आधार, सारथी योजनेमधून लाभ नाही मिळाला. तर ते विद्यार्थी या योजनेअंतर्गत लाभ घेऊन सुद्धा शिक्षण पूर्ण करू शकता. हि योजना गरीब आणि गरजू उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वरदान म्हणून काम पडत आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.