Bal Sangopan Yojana: मित्रांनो, राज्यातील निराधार बालकांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हि योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून बालकांना जीवन जगात असतांना कोणाच्या भरोशावर राहण्याची गरज पडणार नाही स्वतःचा खर्च योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभातून पूर्ण करून स्वावलंबी बनतील.
मित्रांनो, शासन हे निवडणुकीच्या काळामध्ये अनेक नवीन योजना राबवत असत. हल्ली लाडकी बहीण योजना तर जणू जगप्रसिद्धच झालेली आहे. परंतु खरे कौतुक शासनाचे Bal Sangopan Yojana राबवण्याबाबत होणे आवश्यक आहे. कारण इकडच्या महिला ह्या स्वतः कमी करून जीवन जगू शकतात. पण छोटे बालक जे नियाराधर आहेत त्यांना उदर्निर्वाह करण्यासाठी आर्थिक मदत या योजनेचा माध्यमातून करते, या पेक्षा मोठी गोष्टी कुठलीच असू शकत नाही. म्हणून सर्व बालकांना या योजनेचं लाभ घेता यावा यासाठी आपण या आर्टिकल मध्ये योजनेची पात्रता, उद्देश, लाभ आणि अर्ज प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती घेत आहो.
Also Read: Shravan Bal Yojana Online Apply: या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार 1500 रुपये महिना
Bal Sangopan Yojana म्हणजे काय?
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाळ संगोपन योजनालाच शॉर्ट कट Bal Sangopan Yojana म्हणून ओळखले जाते. योजनेचे नाव जरी सावित्रीबाईंच्या नावाने असले तरी मात्र हि योजना महिलांसाठी नसून अठरा वर्ष आतील बालकांसाठी सूरु करण्यात आलेली आहे.
या योजनेच्या माध्यमातून बालकांना सुरुवातीला फक्त 425/- रुपयेच दिले जायचे. तेव्हा महागाई एवढी नसल्यामुळे हीच रक्कम फार मोठी वाटायची. नंतर हळू हळू दिवस बदलत गेले आणि लाभाच्या रकमेला वाढवून 1125/-रुपये करण्यात आले. सध्या जी महागाई देशभर पसालारली आहे त्यामुळे या रकमेतसुद्धा बालकांना महिना निघणे मुश्किल आहे, म्हणूनच लवकरच शासन Bal Sangopan Yojana अंतर्गत 2550/- प्रति माह देण्याची तयारी करत आहे.
बाल संगोपन योजनेचे उद्देश
राज्यातील ज्या बालकांना आईवडील नाहीत, जे बालक अनाथ आहेत अशा बालकांच्या सर्व आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी आणि योग्य हि योजना शासन राबवत आहे. ज्यामुळे बालकांना शिक्षण घेण्यासाठी सुद्धा एक आधार मिळू शकेल.
योजनेचे पात्रता अटी
ज्या मुलाचे वय हे 0-18 वर्षाच्या दरम्यान असेल, त्याच बालकांना योजनेचा लाभ मिळणार. तसेच मुलगा हा निराधार अर्थात अनाथ किंवा घटस्फोटित या वडिलांचा असावा. जो व्यक्ती त्या अनाथ बालकाची जबाबदारी घेत असेल, याचे वार्षिक उत्पन्न जर एक लाखापेक्षा जास्त असेल तर या योजनेसाठी अपात्र केले जाणार. तसेच जो अर्जदार व्यक्ती असेल किंवा बालक असेल तो मूळचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
असा मिळणार लाभ
प्रत्येक अनाथ बालकाला राज्यसरकार 2550/- रुपये प्रति माह देणार आहे. मिळणार लाभ हा संगोपन करणाऱ्या व्यक्तीच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला जमा केला जातो.
अर्जसाठी लागणारी कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मुलाचे जन्म प्रमाणपत्र
- मृत्यू प्रमाणपत्र (पालकांचा मृत्यू झाला असल्यास)
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट फोटो
योजनेचा अर्ज कसा करावा?
Bal Sangopan Yojana साठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला व बालविकास कार्यालयामध्ये संपर्क करावा लागेल. तेथूनच योजनेचा अर्ज घेऊन कागतपात्रतांसह सबमिट करतायेणार आहे. जिल्ह्यानुसार अर्जाची पद्धत वेगळी असू शकते.
निष्कर्ष
राज्यातील बालकांना एक आधार म्हणून हि योजना महाराष्ट्र शासन राबवत असते. जर तुमच्या परिवारात किंवा परिसरात जर कोणी निराधार बालक असेल तर योजनेचा लाभ घेऊन त्यांचे जीवन बदलण्याची हि मोठी संधी असणार आहे. म्हणून गरजू बालकांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी बालसंगोपण योजना जास्तीत जास्त शेयर करा.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.