PM Vishwakarma Yojana Tool Kit 2025: केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असतात. पारंपरिक कारीगर आणि शिल्पकारांसाठी एक महत्वाची योजना सरकारने सुरू केली आहे. पीएम विश्वकर्मा योजना ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू केली. या योजनेतून लाभार्थी पात्र नागरिकांना ₹15,000 चे मोफत टूलकिट प्रदान केली जाते. योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कारीगरांना आर्थिक आणि तांत्रिक मदत देऊन त्यांचे उत्पन्न वाढवणे आहे.
Drone Yojana Maharashtra: ड्रोन खरेदी साठी महिलांना मिळणार 5 लाखाचे अनुदान, असा करा अर्ज.
PM Vishwakarma Yojana Tool Kit म्हणजे काय?
हि योजना संपूर्ण भारतात सुरु करण्यात आली आहे. कुटीर उद्योग, शिल्पकार, कारागीर आणि हस्तकला करणाऱ्यांना मदत करण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत ₹15,000 किंमतीचे मोफत टूलकिट (औजार संच) दिले जाते. यामुळे कारीगरांना त्यांच्या कामात सुधारणा करता येते. तसेच या योजनेतून सरकार प्रशिक्षण, कर्ज सुविधा आणि व्याजदरात सूट देखील देते.
टूलकिटमध्ये काय मिळेल?
व्यवसाय | साधने / उपकरणे |
---|---|
सुतार (Carpenter) | हात आरी, टेप, हातोडा, छेनी, इलेक्ट्रिक ड्रिल |
दर्जी (Tailor) | शिवण मशीन, कात्री, सुई-धागा |
सोनार (Gold/Silver) | पेंचकस, मेटल फाइल, हातोडा |
मूर्तिकार (Sculptor) | छेनी, हातोडा, पॉलिशिंग टूल्स |
कुम्हार (Potter) | मातीची शिल्पकला उपकरणे |
पीएम विश्वकर्मा टूलकिट कसे मिळवावे?
पीएम विश्वकर्मा टूलकिट मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. pmvishwakarma.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर भरून नोंदणी करा. तुम्हाला ₹15,000 चे ई-वाउचर मिळेल. या वाउचरद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायानुसार टूलकिट ऑर्डर करू शकता. वेबसाइटवर ऑर्डरची स्थिती (ट्रॅकिंग) पाहण्याची सुविधाही उपलब्ध आहे. टूलकिट तुमच्या अर्जातील पत्त्यावर थेट पाठवले जाईल.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाइल नंबर
- रेशन कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- बँक पासबुक किंवा स्टेटमेंट
- पासपोर्ट साइज फोटो
- पत्त्याचा पुरावा
पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे
PM Vishwakarma Yojana Tool Kit या योजनेतून सरकारकडून ₹15,000 किंमतीचे मोफत टूलकिट दिले जाते, ज्यामुळे कामासाठी आवश्यक सर्व औजारे सहज मिळतात. प्रशिक्षणाच्या काळात ₹500 प्रतिदिन भत्ता देखील मिळतो, म्हणजेच शिकतानाच उत्पन्न मिळते. याशिवाय, बिनहमीन कर्ज स्वरूपात पहिल्या टप्प्यात ₹1 लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ₹2 लाखांपर्यंत कर्ज मिळते. या कर्जावर 5% व्याजदरात सूट दिली जाते, त्यामुळे परतफेड करणे सोपे होते. तसेच, सरकारकडून डिजिटल मार्केटिंग आणि विक्रीसाठी मदत मिळते, ज्यामुळे कारीगर आपले उत्पादन ऑनलाइन विकू शकतात. योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला ‘विश्वकर्मा आयडी’ दिला जातो, जो त्यांच्या अधिकृत ओळखीचा पुरावा असतो.
निष्कर्ष
PM Vishwakarma Yojana Tool Kit 2025 हि योजना पारंपरिक कारीगरांसाठी मोठा आधार आहे. या योजनेमुळे लाखो कुटुंबांना स्वावलंबी होण्याची आणि रोजगार निर्माण करण्याची संधी मिळत आहे. सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत, मोफत टूलकिट आणि प्रशिक्षण यामुळे भारतातील हस्तकला आणि स्थानिक उद्योगांना नवी ओळख मिळत आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!