Silver Rate Today Maharashtra: नमस्कार मंडळी, आपण बघतोच आहे चांदी आणि सोन्याचे दर दररोज वाढताना दिसत आहे परंतु अचानक चांदीच्या दरामध्ये घसरण दिसून आली आहे. गुरुवारच्या तुलनेत आज म्हणजेच 17 ऑक्टोबर 2025 रोजी चांदीचे दर तब्बल ₹4,000 प्रति किलोने कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेली चांदी आज अचानक स्वस्त झाली असून, गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. धनतेरस आणि दिवाळीच्या अगोदरच चांदीच्या बाजारात मोठं करेक्शन पाहायला मिळालं आहे.
आजचे चांदीचे दर (Silver Rate Today Maharashtra)
शहर | आजचा दर (₹ प्रति किलो) | कालचा दर (₹ प्रति किलो) | फरक |
---|---|---|---|
मुंबई | ₹1,85,000 | ₹1,89,000 | ₹4,000↓ |
पुणे | ₹1,85,200 | ₹1,89,200 | ₹4,000↓ |
नागपूर | ₹1,84,900 | ₹1,88,900 | ₹4,000↓ |
नाशिक | ₹1,85,100 | ₹1,89,100 | ₹4,000↓ |
औरंगाबाद | ₹1,85,000 | ₹1,89,000 | ₹4,000↓ |
धनतेरसपूर्वी बाजारात करेक्शन
धनतेरस आणि दिवाळीपूर्वी सोन्या चांदीच्या दरात थोडं करेक्शन झालं आहे. ज्वेलर्सच्या मते, सणासुदीच्या खरेदीपूर्वी दर कमी झाल्याने ग्राहकांची खरेदी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही वेळ चांदीची भांडी, नाणी किंवा मूर्ती घेण्यासाठी अतिशय चांगली मानली जाते. तुम्ही सुद्धा चांदी खरेदीचे नियोजन करत असाल तर हि वेळ उत्तम ठरू शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची वाढती मागणी
जागतिक पातळीवर सध्या चांदीची मागणी झपाट्याने वाढत आहे. विशेषकरून इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यात आणि सोलर पॅनल्स बनवण्यात चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर उच्च स्तरावर टिकून आहेत. सध्या अंदाजे 60% ते 70% चांदीचा वापर उद्योग क्षेत्रात होतो. म्हणूनच स्थानिक बाजारात दर थोडे कमी झाले असले तरी दीर्घकाळासाठी चांदीचा ट्रेंड मजबूत राहण्याची शक्यता आहे.
दिल्ली आणि चेन्नईतील दर
शहर | दर (₹ प्रति किलो) |
---|---|
दिल्ली | ₹1,85,000 |
चेन्नई | ₹2,03,000 |
निष्कर्ष
जर तुम्ही या सणासुदीत चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर आजचा दिवस अगदी योग्य आहे. चांदीच्या भावात झालेली ही घसरण तात्पुरती असू शकते, आणि बाजार पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही एक सुवर्णसंधी म्हणायला हरकत नाही.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!