ST Bus New Rate 2025: दिवाळीचा सण जवळ येत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (MSRTC) प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आली आहे. एसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हि आनंदाची बातमी आहे. एसटी बस प्रवाशांना आता मोठा दिलासा देण्यात आला असून, बस तिकिटांच्या दरात तब्बल २५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ही सवलत ‘आवडेल तेथे प्रवास योजना’ अंतर्गत लागू करण्यात आली असून, प्रवाशांना आता अधिक परवडणाऱ्या दरात प्रवास करता येणार आहे.
PM Wi-Fi योजना 2025: मोफत इंटरनेटसाठी सरकारची मोठी संधी। PM Wi-Fi Yojana 2025
दिवाळीपूर्वी MSRTC कडून मोठी भेट
सणासुदीच्या काळात लाखो प्रवाशांना एसटी बसचा वापर करावा लागतो. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तिकिटदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण ते शहरी भागात प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
२५% दरकपातीचा थेट फायदा प्रवाशांना | ST Bus New Rate
महामंडळाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एसटी बस तिकिटांच्या दरात २५% पर्यंत कपात करण्यात आली आहे. ही सवलत साप्ताहिक, मासिक आणि दिवाळी पास धारकांना लागू राहणार आहे. म्हणजेच, प्रवाशांना आता कमी खर्चात जास्त प्रवास करता येणार आहे.
PM Shram Yogi Yojana 2025: कामगारांना मिळणार 3,000 रुपये मासिक पेन्शन, बघा संपूर्ण माहिती.
सवलतीचा पास कसा मिळवायचा?
- आवडेल तेथे प्रवास पास मिळवण्यासाठी प्रवाशांनी जवळच्या एसटी डेपोमध्ये अर्ज करावा लागतो.
- ओळखपत्र आणि दोन छायाचित्रे द्यावी लागतात.
- डेपोमध्ये पास तयार करून दिला जातो.
- तसेच MSRTC च्या अधिकृत वेबसाइटवर www.msrtc.gov.in
- ऑनलाइन पास बुक करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
पास घेतल्यानंतर प्रवाशांना दररोज कितीही वेळा प्रवास करता येणार आहे.
नवे पास दर (२५% सवलतीनंतर)
कालावधी | नवा दर |
---|---|
९ दिवसांचा पास | ₹१५९२ |
१५ दिवसांचा पास | ₹१९८५ |
३० दिवसांचा पास | ₹२३२८ |
४५ दिवसांचा पास | ₹३१४९ |
दिवाळीत प्रवास अधिक सोयीचा
दिवाळी काळात प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना तिकिटांसाठी त्रास न होता आणि अतिरिक्त खर्चाशिवाय सहज प्रवास करता येईल.
आवडेल तेथे प्रवास योजना म्हणजे काय?
आवडेल तेथे प्रवास योजना ही प्रवाशांसाठी सुरू केलेली एक विशेष योजना आहे.
या योजनेअंतर्गत प्रवाशांना ठराविक कालावधीसाठी पास दिला जातो आणि त्या पासद्वारे राज्यातील कोणत्याही मार्गावर बसने प्रवास करता येतो. ही योजना विशेषतः सामान्य प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार, वरिष्ठ नागरिक या सर्वांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
निष्कर्ष
आवडेल तेथे प्रवास योजना आणि २५% दरकपात (ST Bus New Rate) या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना दिवाळीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार असून, एसटी प्रवास आता आणखी स्वस्त आणि सोयीस्कर झाला आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!