Mahila Samman Yojana 2025: पोस्ट ऑफिस ची महिलांसाठी एक भन्नाट योजना तुम्हाला माहित आहे का? कदाचित नसेलच, कारण जर असती तर त्या योजनेचा लाभ घेऊन आज तुम्ही सुद्धा न काही करता लाखोंची कमाई केली असती. हो कारण केंद्र सरकारच्या Mahila Samman Yojana 2025 अंतर्गत तुम्ही पोस्टमध्ये निवेश केलेल्या रकमेवरती 7.5% व्याजदर दिला जाणार आहे. तसेच मिळणाऱ्या व्याजाचे सुद्धा व्याज तुम्हाला या योजने मार्फत मिळते. जे कि कुठलीही बँक देत नाही.तर चालला बघूया काय आहे हि महिला संम्मान योजना.
Aslo Read: फक्त ₹50,000 वार्षिक बचत करून मुलीला मिळू शकतात तब्बल ₹23 लाख | Sukanya Samriddhi Yojana
Mahila Samman Yojana काय आहे?
महिला भगिनींनो, हि योज़ना केंद्र सरकार पोस्ट ऑफिस अंतर्गत 1 एप्रिल 2023 पासून राबवत आहे. जी कि खास महिलांसाठीच असणार आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये फिक्स स्वरूपात दोन वर्षासाठी जमा ठेवलेल्या रकमेवरील व्याज दर वर्षी तुमच्या खात्यात जमा केले जाईल. महिलांना जास्तीत जास्त 2,00,000 लाख रुपयाची रक्कम पोस्टात जमा करता येईल आणि किमान रक्कम हि 1000 सुद्धा जमा करू शकता. जर तुम्ही दोन वर्षाकरिता 2,00,000 रुपये निवेश केले तर तुम्हाला 7.5% व्याजदराने त्याचे व्याजच 30 हजार रुपये मिळणार आहे. ते सुद्धा न काही करता.
योजनेचे उद्देश
आजकाल शेयर मार्केट माहे गुंतवणूक करणे म्हणजे फार मोठी रिस्क परंत्तू महिलांना कुठलीही रिस्क न घेता त्यांना त्यांच्या पैशावर पक्के व्याजदर देणे हाच या योजनेला राबवण्यामागील उद्देश आहे.
योजनेची पात्रता
भारताची रहिवासी असलेली महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकते. तसेच महिलेचे वय हे 18 ते 60 दरम्यान असेल तर या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेची किम उत्पन्न हे तीन लाख तरी असावे.
योजनेचे वैशिष्ट्य
| महत्वाची माहिती | विवरण |
|---|---|
| किमान ठेव | 1000 रुपये |
| कमाल ठेव | 2,00,000 रुपये |
| कालावधी | 2 वर्ष |
| व्याजदर | 7.5% व्याजदर |
| रक्कम काढण्याची परवानगी | एका वर्षानंतर 40% रक्कम काढण्याची परवानगी |
| खाते | पोस्ट ऑफिस मध्ये किंवा राष्ट्रीय कृत बँकेत |
योजनेची अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अर्ज भरावा लागेल.सोबत काही कागदपत्रे जोडावे लागतील. नंतर तुम्हाला निवेश करण्याची रक्कम सुद्धा जमा करावी लागेल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पासबुक मिळेल आणि तेव्हापासून तुमच्या खात्यात व्याज जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
निष्कर्ष
शेयर मार्केट मध्ये निवेश करून डुबण्यापेक्षा , सरकारी योजनेत निवेश करा आणि खात्रीने नफा कमवा. जर तुम्ही या योजनेअंतर जवळपास सहा वर्ष जर गुंतणूक केली तर लाखो रुपयांचा नाफा तुम्हाला झाल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळं वाट बघू एका आणि लवकर पोस्टात जा. तसेच इत्तर परिवाराच्या सदस्यांना सुद्धा हि माहिती पाठवा,धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.