Annasaheb Patil Krj Yojana: सध्याच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो आहे, बेरोजगारीचा. बेरोजगारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना र राबवत आहेच त्यातीलच आता अतिशय मोठी योजना Annasaheb Patil Krj Yojana हि आहे. या योजनेच्या माध्यमातून नवीन उद्योजक निर्माण करण्याचे धोरण आखलेले आहेत. याचा लाभ घेऊन बिनव्याजी कर्ज मिळवून तरुण स्वतःच कोरिया उद्योग क्षेत्रामध्ये बनवू शकणार आहेत.
Also Read: Mahila StartUp Yojana: महिलांना उद्योगासाठी मिळणार 1 लाख ते 25 लाख पर्यंत आर्थिक मदत, असा करा अर्ज
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे उद्देश
महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करून तरुणांना व्यवसायामध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये नवीन संधी उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागात नवीन रोजगार निर्मिती करणे. तसेच मराठा आणि OBC प्रवर्गातील आर्थिक मागास असलेल्या घटकांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या विकासाचा मार्ग निर्माण करणे.
योजनेचे फायदे
राज्यातील इच्छुक तरुणाला उद्योग सुरु करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी 10-50 लाखाचे ठरविलं काळापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. अर्जदार जर शेतकरी असेल, मजूर असेल, तरुण स्वयंरोजगार कारण असेल, महिला गट असेल तरी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळतो. तसेच राष्ट्रीयकृत दर्जाच्या बँकेमार्फत Annasaheb Patil Krj Yojana चा लाभ जमा केला जातो.
योजनेचे पात्रता निकष
या कर्ज योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. अन्नसाहब पाटील योजनेचा लाभ हा 18 ते 45 याच वयोगटातील अर्जदारांना देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे. अर्जदाराने या पूर्वी किथल्याही कर्ज योजनेचा जरी लाभ घेतला असला तर ते कर्ज पूर्ण पणे निल झालेले असावे.
लाभासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट फोटो
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Annasaheb Patil Krj Yojana साठी अर्ज करणे एकदम सोपी आहे, त्यासाठी तुम्हाला गूगल वर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असे सर्च करावे लागेल. एक नंबरच्या साईट ला ओपन करून कर्ज योजना या विभागात जाऊन अर्ज करा यावर क्लीक करून सव्र्ह माहिती भरायची आहे. आपण कर्जासाठी सांगितले ते कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिटकरा. तसेच नंतर जो तुम्हाला अर्ज क्रमांक येईल त्याचा फोटो काढून घ्या.
| अण्णासाहेब पाटील योजना | Apply Now |
निष्कर्ष
आधी तर हि योजना फक्त मराठा बांधवांसाठी राबवण्यात येत होती. मात्र आता OBC सोबत इत्तर मागास घटकांसाठी सुद्धा हि योजना खुली करण्यात आली आहे. त्यामुळे बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार बनवण्याची एक मोठी संधी चालून आलेली आहे. याचा लाभ घेऊन उद्योजक बनायचे कि नाही हे तुमच्या हाती असेल, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.
ghatgeavinash102@gmail.com