Bhausaheb Fundkar Falbag Yojana: बहुसंख्य शेतकरी हे सोयाबीन आणि तूरीचेच उत्पादन घेत असतात. त्यामुळे त्यांना अधिक उत्पादन होत नाही आणि अतिवृष्टी झाली तर मात्र संपूर्णच पीक या वर्षीप्रमाणे वाहून जाते. आणि जर स्वखरचटून फळबाग लागवड करण्याच्या विचार जरी केला तरी शेतकऱ्यांच्या अंगावरती काटा उभा होतो. कारण त्याचसाठी खर्च हा नेहमीच्या पिकांच्या किती तरी पट जास्त येतोय. परंतु जर उत्पादन वाढवायचे असेल तर फळबाग लागवडीशिवाय पर्याय नाही. म्हणून शासनाने खास Bhausaheb Fundkar Falbag Yojana सुरू केले आहे. याच्या मार्फत शेतकऱ्यांना फ्लाबगीच्या लागवडीकरीता मोठे अनुदान शासन देत आहे.
Also Read: Vihir Durusti Anudan: शेतकऱ्यांना खुशखबर..। जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळणार 1 लाखाचे अनुदान
योजनेचे उद्देश
राज्यातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्धी जीवनासाठी पारंपरिक पिके सोडून फळबाग लागवड करून अधिक उत्पादन घ्यावे. कारण या महागाईच्या काळात जर शेतकऱ्यांना टिकायचे असेल तर स्वतःचे उत्पादन कुठल्यातरी वेगळ्या पद्धतीने घेणे आवश्यक असेल.
योजनेचे फायदे
पात्र शेतकऱ्यांना एक स्थिर आणि नेहमीच्या पिकांपेक्षा अधिक उत्पन्न तसेच मोफत ठिंबक सिंचन मिळते. शेतकऱ्यांच्या शेती करण्याचा काळ आधुनिक शेतीकडे वळेल आणि नवीन रोजगार निर्मिती होतील. ज्यामुळे ग्रामीण भागाचा सुद्धा विकास होईल.
पात्रता अटी
महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आणि फळबाग लागवडीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी ज्या शेतात फफळबाग लावायची आहे, त्या शेताचा सातबारा हा अर्जदाराच्या नावाने असणे आवश्यक आहे. किंवा त्या सातबारामध्ये इत्तर सदस्यांची नवे असतील तर त्यांची ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. खासगी कंपनी किंवा संस्थांसाठी हि योजना उपयोगाची नाही कारण याचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा, 8-अ
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- लागवडीचा आराखडा
- पासपोर्ट फोटो आणि सही
कोणत्या पिकांसाठी मिळणार अनुदान?
महाराष्ट्रातील प्रमुख 16 पिकांसाठी राज्यसरकार Bhausaheb Fundkar Falbag Yojana अंतर्गत अनुदान देत आहे. ज्यामंध्ये आंबा, द्राक्ष, पेरू, केळी,मोसंबी, संत्रा, डाळिंब,आवळा, काजू, चिकू,सीताफळ, कोकम, नारळ,लिंबू ,पपई अननस आणि सफरचंद इतयादी फळांचा समावेश आहे. या पिकांच्या फळबागांसाठी साधारणता 40,000 ते 60,000 हजार रुपयांपर्यंत अनुदान हा पिकानुसार दिले जाते.
Also Read: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! सरकार देत आहे 90% सबसिडीवर सोलर पंप | Solar Pump Subsidy Yojana अर्ज सुरू
योजनेसाठी असा करा अर्ज
शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का Bhausaheb Fundkar Falbag Yojana योजनेचा लाभ घेऊन तूमच्या शेतात फळबागेची लागवड करून घ्यायची असेल तर सर्वप्रथम MahaDBT पोर्टलवर जावे लागणार आहे. नंतर Agriculture Department Schmes वरती जाऊन भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना हा पर्याय निवडून तुमच्या पुढे आलेला अर्ज भरा आणि काही कागदपत्रे उपलोड करून अर्ज सबमिट करा. नंतर कृषी अधिकारी तुमच्या शेतीही आणि अर्जाची पाहणी करून अनुदानाची रक्कम डायरेक्ट तुमच्या बँकेत जमा करतील.
निष्कर्ष
फळबाग लागवड हा उत्पन्न वाढवण्याचा मोठा सोर्स तर बनूच शकतो परंतु सुरुवातीचे काही दवस मात्र आपल्याला मुलाप्रमाणे याची जपवणूक करावी लागेल. त्या नंतर एकदा का ते मोठे झाले त्या नंतर दार वर्षी अधिक खर्च न लावता तुमचा फळाचे उत्पादन वर्षानुवर्षे मिळत राहणार आहे. हि एक मोठी संधी शेतकऱयांना महाराष्ट्र शासन या योजनेच्या माध्यमातून देत आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी Whats App करा.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.