Bandhkam Kamgar Death Benefits 2025: कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला सरकार देणार 5 लाख रुपये, हा फॉर्म भरा

Bandhkam Kamgar Death Benefits
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhkam Kamgar Death Benefits 2025: बांधकाम क्षेत्रात राज्यातील अनेक गरीब कुटुंबातील नागरिक काम करतात. त्यांचे काम अत्यंत जोखमीचं असतं. उंचावर काम करणे, जड सामान उचलणे, धोकादायक यंत्रसामग्री वापरणे अशा कारणांमुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. दुर्दैवाने कधी कधी मोठा अपघात होतो आणि कामगारांचा मृत्यू होतो. कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा मृत्यू नंतर पूर्ण कुटुंब आर्थिक अडचणीत येते. त्यामुळे राज्य सरकारने बांधकाम कामगार मृत्यू लाभ योजना सुरु केली आहे.

या योजनेतून राज्य सरकार मृत्यू झालेल्या कामगाराच्या परिवाराला ५ लाख रुपयांची आर्थिक सहायता करते. ही मदत मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आणि त्यांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते.

Bandhkam Kamgar Silai Machine Yojana 2025: आता बांधकाम महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, असा करा अर्ज

Bandhkam Kamgar Death Benefits म्हणजे काय?

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राज्य शासनाकडून Bandhkam Kamgar Death Benefits हि योजना राबवण्यात येत आहे. याच योजनेला मराठी मध्ये बांधकाम कामगार मृत्यू लाभ योजना असे म्हटले जाते. राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहे, त्यामधून एक हि योजना सुद्धा आहे. राज्य सरकारची ही योजना बांधकाम कामगारांच्या कुटुंबासाठी खूपच फायदेशीर आहे.

गरीब परिवारात कमावणारा मुख्य व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्या परिवाराला सांभाळला आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कोणी नसते त्यामुळे सरकार ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करते. त्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत बांधकाम असणे आवश्यक आहे.

बांधकाम कामगार मृत्यू लाभ योजनेचा मुख्य उद्देश

बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचा दुर्दैवाने अपघात होऊन मृत्यू झाला तर त्यांच्या परिवारातील वारसदाराला आर्थिक सहायता मिळावी तसेच गरीब आणि मजुरीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाची उपजीविका सुरु राहावी हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्या कुटुंबातील नागरिकांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी या योजनेतून ५ लाख रुपयांची सहायता सरकार करते.

Bandhkam Kamgar Death Benefits 2025 योजनेत दिली जाणारी आर्थिक मदत

या योजनेअंतर्गत दोन प्रकारे आर्थिक मदत दिली जाते. जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला, जसे की आजारपण किंवा वृद्धपणामुळे झाला असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ₹2,00,000 (२ लाख) पर्यंतची आर्थिक मदत मिळते. पण जर कामगाराचा मृत्यू अपघातामुळे झाला असेल, मग तो अपघात कामाच्या ठिकाणी असो किंवा इतर, अशा वेळी कुटुंबाला ₹5,00,000 (५ लाख) पर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

योजनेचे फायदे

कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाल्यास, राज्य सरकार त्यांच्या कुटुंबाच्या बँक खात्यात ५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जमा करते. Bandhkam Kamgar Death Benefits या योजनेमुळे गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळतो आणि तात्काळ खर्च भागवण्यासाठी मदत होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी वेळ मिळतो. सरकारकडून मजुरांसाठी राबवलेली ही योजना ही सामाजिक सुरक्षिततेचे उत्तम उदाहरण आहे.

योजनेसाठी पात्रता

बांधकाम कामगार मृत्यू लाभ योजनेचा फायदा घेण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या अति पूर्ण करणे आवश्यक आहे. मृत व्यक्ती महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा आणि मृत्यूच्या वेळी त्याचे नोंदणी प्रमाणपत्र वैध असावे. अर्ज करणारा व्यक्ती हा मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस असावा, जसे की पत्नी, पती, मुले किंवा आई-वडील. तसेच नोंदणीसाठी लागणारी सर्व फी व हप्ते भरलेले असणे आवश्यक आहे.

Bandhkam Kamgar Gharkul Yojana Maharashtra 2025: बांधकाम कामगारांसाठी खुशखबर, मिळवा 2.50 लाखांची मदत

आवश्यक कागदपत्रे

  • मृत्यू प्रमाणपत्र
  • बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र
  • मृत्यूच्या वेळी वैध असलेला ओळखपत्राचा पुरावा
  • ओळख पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
  • नाते दाखवणारा पुरावा (उदा. विवाह प्रमाणपत्र, जन्म दाखला इ.)
  • मृत्यू जर अपघातामुळे झाला असेल तर पोलीस अहवाल
  • अर्जदाराचा बँक पासबुकची प्रत

अर्ज कसा करावा?

Bandhkam Kamgar Death Benefits या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया हि दोन्ही प्रकारे करता येते, जसे ऑनलाइन आणि ऑफलाईन. मृत्यू लाभासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

ओंलीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahabocw.in) जाऊन “मृत्यू लाभ योजना” हा पर्याय निवडावा लागेल, त्यानंतर एक फॉर्म उघडेल त्यामध्ये आवश्यक माहिती भरावी आणि सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत आणि फॉर्म सबमिट करावा.

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी, जवळच्या जिल्हा बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जाऊन अर्ज फॉर्म घ्यावा. त्या फॉर्ममध्ये संपूर्ण आवश्यक माहिती भरून, लागणारी कागदपत्रे जोडून Bandhkam Kamgar Death Yojana Form सादर करावा.

महत्वाच्या सूचना

  • मृत्यू झाल्यानंतर शक्य होईल तितक्या लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. साधारणतः ६ महिन्याच्या आत करावा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण आणि बरोबर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
  • अर्ज करताना सर्व माहिती स्पष्ट आणि खरी असावी.

निष्कर्ष

Bandhkam Kamgar Death Benefits Yojana राज्यातील बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबासाठी अतिशय लाभदायक योजना ठरते. बांधकाम क्षेत्रातील मजूर हे आपल्या राज्याच्या प्रगतीचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या कष्टामुळे आपल्या डोक्यावर छप्पर, रस्ते, इमारती, पूल आणि कारखाने उभे राहतात. पण त्यांच्या जीवनात असलेला धोका आणि असुरक्षितता कमी करण्यासाठी सरकार अशा योजनांद्वारे आधार देते.

FAQ

1) मृत्यू नंतर अर्ज करण्यासाठी वेळ मर्यादा आहे का?

होय, मृत्यू झाल्यानंतर साधारणतः 6 महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

2) Bandhkam Kamgar Death Benefits ही योजना फक्त कामाच्या ठिकाणी झालेल्या मृत्यूसाठी आहे का?

नाही, ही योजना नैसर्गिक मृत्यू आणि इतर ठिकाणी झालेल्या अपघाती मृत्यूसाठी देखील लागू आहे, फक्त मृत व्यक्ती नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *