Vihir Anudan Yojana Maharashtra 2025: शेतकऱ्यांनो, सरकार देत आहे ₹5 लाखापर्यंत मदत! विहीर अनुदान योजनेची संधी सोडू नका

Vihir Anudan Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Vihir Anudan Yojana Maharashtra 2025: मित्रांनो आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती हा व्यवसाय करतात. शेतीला सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी असते. पाण्याशिवाय शेतीची कल्पना सुद्धा करता येत नाही. पावसाचे पाणी हे शेतीला फक्त पावसाळ्यातच मिळते, परंतु वर्षभर पाणी शेतीला पुरवण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणी साठवण्यासाठी आवश्यक साधने असणे आवश्यक आहे. याच सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने विहीर अनुदान योजना सुरु केली आहे.

Mofat Pithachi Girni Yojana 2025: लाडक्या बहिणींना मिळणार मोफत पिठाची गिरणी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Vihir Anudan Yojana म्हणजे काय? बघा सविस्तर माहिती

Vihir Anudan Yojana Maharashtra

या योजनेला मागेल त्याला विहीर योजना सुद्धा म्हटल्या जाते. या योजनेतून लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना स्वतःची विहीर खोदण्यासाठी ५ लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पिकांना पाणी देता येते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुद्धा वाढते.

तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र शेतकरी असाल आणि विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे नियोजन करत असाल तर हा लेख तुमच्या साठी आहे. चला तर जाणून घेऊ योजनेचा लाभ कसा घेता येईल म्हणजे अर्ज कसा करायचा आणि कोणत्या अस्व्ह्यक कागदपत्रांची आवश्यकता लागेल याची संपूर्ण माहिती.

विहीर अनुदान योजनेचा मुख्य उद्देश

Vihir Anudan Yojana सुरु करण्याचा मुख्य उद्देश आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी सहज आणि कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे. कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करण्यासाठी विहीर, बोअरवेल किंवा जलतले हे उपयुक्त असतात. यासाठी सुद्धा सरकारच्या योजना सुरु आहेत. परंतु काही ठिकाणी विहीर खोदणे हा योग्य पर्याय असतो.

पाण्याची साठवण शेतकऱ्यांकडे असली तर त्याला पावसाच्या पाण्यावर किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही. पिकांना योग्य वेळी पाणी मिळते आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ होते.

योजनेचे लाभ

या योजनेतून लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना स्वतःची विहीर खोदण्यासाठी किंवा जुनी विहीर दुरुस्तीसाठी सरकार कडून अनुदानावर आर्थिक मदत केली जाते. नवीन विहीर खोदण्यासाठी राज्य सरकार कडून ५ लाख रुपये पर्यंत मदत मिळते. ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या जमिनीचा आकार, विहीरीचा प्रकार आणि त्या परिसरातील पाण्याची उपलब्धता व जलसंधारण स्थिती यावर अवलंबून ठरवली जाते.

योजनेसाठी पात्रता निकष

हि योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जरी असली तरी शासनाने काही पात्रता जाहीर केल्या आहे. Maharashtra Vihir Anudan Yojana हि योजना केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू असल्यामुळे, अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजेच, त्याचे वास्तव्य व शेती या राज्यात असणे गरजेचे आहे, तेव्हाच तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

तसेच जमीन शेतकऱ्याच्या नावावर असणे सुद्धा आवश्यक आहे. अर्जदार लघु किंवा सीमान्त शेतकरी असेल तर त्याला प्राधान्य दिल्या जाणार आहे. ज्या शेतात विहीर खोदायची आहे, त्या जमिनीची स्थिती योग्य असणे आवश्यक आहे. म्हणजेच, त्या ठिकाणी विहीर खोदकाम तांत्रिकदृष्ट्या शक्य असावे आणि पाण्याचा स्रोत उपलब्ध होण्याची शक्यता जास्त असावी.

Bandhkam Kamgar Death Benefits 2025: कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसाला सरकार देणार 5 लाख रुपये, हा फॉर्म भरा

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • राशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • मेल आयडी
  • रहिवासी पुरावा
  • शेतीचा सात बारा, आठ-अ

या शेतकऱ्यांना योजनेत प्राधान्य मिळते

  • लघु व सीमान्त शेतकरी – ज्यांच्याकडे कमी क्षेत्रफळाची शेती आहे.
  • अनुसूचित जाती व जमातीतील शेतकरी – सामाजिकदृष्ट्या मागास गटातील शेतकरी.
  • महिला शेतकरी – शेतीचे हक्क स्वतःच्या नावावर असलेल्या महिला.
  • दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईग्रस्त भागातील शेतकरी – ज्या भागात पाणी कमी उपलब्ध आहे किंवा दुष्काळ पडतो.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

Vihir Anudan Yojana Online Registration 2025 करण्यासाठी तुम्हाला एक अँप डाउनलोड करावे लागते. यासाठी सरकरने पोर्टल बनवले नाही त्यामुळे अँपच्या माध्यमातून अर्ज केला जाऊ शकतो.

सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर मधून MAHA-EGS Horticulture हे अँप डाउनलोड करायचं आहे. अँप डाउनलोड झाल्यावर त्याला उघडा त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील – लाभार्थी लॉगिन आणि विभागाचे लॉगिन. यापैकी तुम्हाला लाभार्थी लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर, तुम्हाला “विहिरीचा अर्ज” असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक अर्ज फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये तुमची सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरावी लागेल. माहिती भरून झाल्यावर “पुढे जा” या बटणावर क्लिक करा.

तुमचा फॉर्म आता सबमिट होईल. पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्ही आपल्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अशा प्रकारे, तुम्ही विहीर अनुदान योजनेसाठी अत्यंत सोप्या आणि जलद पद्धतीने अर्ज करू शकता.

निष्कर्ष

Vihir Anudan Yojana Maharashtra हि योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अतिशय लाभदायक आहे. राज्यात ज्या क्षेत्रात पावसाचे पाणी कमी पडतात अश्या ठिकाणी हि योजना शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. योग्य माहिती व वेळेत अर्ज केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा पूर्ण लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने या योजनेचा फायदा नक्की घ्यावा.

FAQ

1) अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असते?

अर्ज सबमिट झाल्यानंतर पंचायत समितीतील संबंधित अधिकारी अर्ज तपासतात आणि पात्र ठरल्यास अनुदान मंजूर करतात.

2) Vihir Anudan Yojana अनुदानाची रक्कम कशी मिळते?

मंजुरीनंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *