Mofat Gas Cylinder Yojana 2025: महाराष्ट्र राज्य सरकारचा माध्यमातून हि योजना चालवण्यात येत आहे. या योजनेतून गरीब कुटूंबातील महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिल्या जाते. राज्य शासनाने हि योजना 2024 मधे सुरू केली होती. मोफत गॅस सिलेंडर योजना हि प्रधानमंत्री उज्वला योजनेचा एक भाग आहे.
ग्रामीण भागात अजूनही चुलीवर स्वयंपाक केल्या जातो त्यामुळे महिलांची व कुटुंबातील लहान मुलांची आरोग्य बिघडण्याची शक्यता असते| या योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे कि महिलांना चुलीपासून निघणाऱ्या धुरा पासून दूर करणे आणि स्वच्छ इंधन पुरवठा करणे आहे.
🔶 Sakhi One Stop Centre Yojana Maharashtra 2025: महिलांचं आयुष्य बदलणार सखी वन स्टॉप सेंटर योजना
Mofat Gas Cylinder Yojana 2025 म्हणजे काय?
Mofat Gas Cylinder Yojana 2025 या योजनेची सुरुवात सर्वप्रथम 28 जून 2024 ला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. राज्यातील ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचा लाभ मिळाला नाही, परंतु त्या महिला पात्र असून सुद्धा त्यांना लाभ मिळाला नाही अशा महिलांना मोफास गॅस सिलेंडर योजनेचा मार्फत या योजनेचा लाभ उपलब्ध करून देणार आहे.
आपण सगळ्यांना माहिती च आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून गरिबांसाठी नवीन नवीन योजना राबवत च असतात, जस कि महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आहे त्याच प्रमाणे महिलांना गॅस सिलेंडर चा सुद्धा लाभ दिल्या जाणार आहे.
योजनेचा मुख्य उद्देश काय?
Mofat Gas Cylinder Yojana चा मुख्य उद्देश आहे चुलीमधून होणार धूर आणि आरोग्यविषयक त्रास कमी करणे, हा खूप मोठा सरकार चा उद्देश आहे. तसेच आणखी पण उद्देश आहे जसे, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील गरीब परिवारातील महिलांना गॅस सिलेंडर उपलब्ध करणे, पर्यावरण संरक्षण करण्यास मदत करणे, महिलांना होणं त्रास कमी करणे इत्यादी.
राज्य सरकारनी घेतलेला खूप चांगला निर्णय आहे, यामुळे प्रदूषण सुद्धा कमी होईल आणि चुलीमधून निघणाऱ्या धुरा पासून महिलांना मुक्ती मिळेल. त्याचप्रमाणे या योजनेतून मिळणारे लाभ काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ.
मोफत गॅस सिलेंडर योजना चे लाभ
- योजनेचा लाभ महिलांना काय काय मिळणार ते जाणून घेऊ.
- महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन उपलब्ध होणार.
- वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार.
- नवीन कनेक्शन सोबत रेग्युलेटर आणि स्टोव्ह सुद्धा मिळणार.
- महिलांना घरघुती वापरासाठी सुरक्षित इंधनाची सोया होईल.
🔶 Kitchen Kit Yojana Maharashtra 2025: राज्यातील बांधकाम कामगारांच्या महिलांसाठी मोफत किचन किट
योजनेसाठी पात्रता
- Mofat Gas Cylinder Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त महिला पात्र असणार आहेत. (पुरुष अर्ज करू शकणार नाही)
- अर्जदार महिला हि महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- एका रेशन कार्ड वर कुटूंबातील एकच महिला लाभ घेऊ शकते.
- अर्जदार महिलेचे नाव बीपीएल यादीत किंवा SECC-2011 यादीत असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यासाठी महिलेचे वय 18 पेक्षा जास्त असायला पाहिजे.
- अर्जदाराकडे आधीपासून एलपीजी कनेक्शन नसावे, नाहीतर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- SC/ST, OBC, अंत्योदय अन्न योजना, अल्पसंख्याक, इतर मागास वर्गातील महिला या योजनेस पात्र आहेत.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पॅन कार्ड
- बँकेचे खातेबुक
- गॅसचे पुस्तक
- रहिवासी दाखला
- उतपन्नाचा दाखला
- दोन पासपोर्ट फोटो
मोफत गॅस सिलेंडर साठी अर्ज कसा करावा?
अर्ज हा दोन प्रकारे केल्या जाऊ शकतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन तर दोन्ही पद्धती आम्ही तुमचा साठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. खालीलप्रमाणे दोन्ही पद्धती वाचा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज पद्धत
- सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जवळचा गॅस एजन्सीमध्ये जा लागेल. (HP, Bharat Gas, किंवा Indane)
- उज्वल योजनांचा अर्ज फॉर्म प्राप्त करा.
- सर्व माहिती नीट भरून आवश्यक सगळे कागजपत्र जोडा.
- त्याच गॅस एजन्सीमध्ये फॉर्म ला जमा करा.
- तुमचे अर्ज स्वीकारल्या नंतर कंपनीकडून गॅस कनेक्शन दिले जातील.
ऑनलाइन अर्ज पद्धत
- उज्वला योजनेचा अधिकृत वेबसाइट वर जावं लागेल. (www.pmuy.gov.in)
- वेबसाइट च होमी पेज उघडेल.
- येथे “Apply for New Connection” वर क्लिक करा.
- HP, Bharat Gas किंवा Indane मधून कोणत्याही एक गॅस कंपनी ची निवड करा.
- नंतर एक फॉर्म दिसेल, त्या फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म सबमिट झाल्या नंतर कंपनी कडून तुम्हाला संपर्क केल्या जाईल.
संपर्क आणि हेल्पलाईन नंबर
Mofat Gas Cylinder Yojana मध्ये अर्ज करताना किंवा अन्य काही अडचणी आल्या तर हेल्पलाईन नंबर वर तुमि संपर्क करू शकता आणि तुमचा अडचणी दूर करू शकता. योजना संबंधित अन्य माहिती साठी तुम्ही अधिकृत वेबसाइट वर भेट देऊ शकता.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हेल्पलाईन क्रमांक: 1800-266-6696
अधिकृत वेबसाइट: www.pmuy.gov.in
निष्कर्ष
Mofat Gas Cylinder Yojana, महाराष्ट्र राज्या मध्ये राज्य सरकारने सुरु केलेली मोफत गॅस सिलेंडर योजना हि महिलांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. आजही जर तुमच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन नसेल, तर ही संधी तुमचा साठी आहे वाया जाऊ देऊ नका. पात्रतेनुसार अर्ज करा आणि स्वच्छ इंधन, सुरक्षित आरोग्य याचा लाभ घ्या.
FAQ
1) मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब कुटुंबातील महिलांना फक्त या योजनेचा लाभ मिळणार.
2) Mofat Gas Cylinder Yojana साठी पुरुष अर्ज करू शकतो का?
नाही, फक्त महिलांना लाभ दिल्या जाणार आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!