Krushi Utpann Bajar Samiti Bharti 2025: मित्रांनो तुम्ही सरकारी नौकरीच्या शोकात आहात का? जर तुमचे उत्तर “हो” असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अनेक पदांसाठी जागा निघाल्या आहे. उपसचिव, निरीक्षक, सुपरवायझर, कनिष्ठ लिपिक, शिपाई, पहारेकरी, माळी आणि कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
या भरतीची अधिकृत जाहिरात समितीकडून जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात नीट वाचावी. खाली PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक दिलेली आहे.
BMC Bharti 2025: बृहमुंबई महानगरपालिकेत परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी
Krushi Utpann Bajar Samiti Bharti 2025 नवीन जाहिरात
कृषी उत्पन्न बाजार समितीने भरतीसाठी अधिकृत PDF जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी 10वी, 12वी उत्तीर्ण तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे.) निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. PDF जाहिरात, ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली दिली आहे.
परीक्षा शुल्क
राखीव – 472 रुपये
अराखीव – 708 रूपये
वयोमर्यादा
- अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे असावे.
- मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देऊन ती 43 वर्षे ठेवण्यात आली आहे.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख
मित्रांनो तुम्ही या नौकरी साठी १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकता. नौकरीची साठी पात्रता लक्षात घेऊन लगेच अर्ज करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.
शैक्षणिक पात्रता आणि प्रत्येक पदासाठी वेतनमान
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता | वेतनश्रेणी |
---|---|---|
उपसचिव | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT (कृषी पदवी प्राधान्य) | एस-10 (₹35,400 – ₹1,32,000) |
निरीक्षक | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT | एस-8 (₹25,500 – ₹81,100) |
सुपरवायझर | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT | एस-8 (₹25,500 – ₹81,100) |
कनिष्ठ लिपिक | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT. टंकलेखन (मराठी 30 प्रति/इंग्रजी 40 प्रति). प्रमाणपत्र नसल्यास दोन वर्षांत सादर करता येईल. | एस-6 (₹19,900 – ₹63,200) |
शिपाई | एस.एस.सी. (10वी उत्तीर्ण) | एस-1 (₹15,000 – ₹47,600) |
पहारेकरी | एस.एस.सी. (10वी उत्तीर्ण) | एस-1 (₹15,000 – ₹47,600) |
माळी | एस.एस.सी. (10वी उत्तीर्ण) | एस-1 (₹15,000 – ₹47,600) |
कनिष्ठ अभियंता | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी अनिवार्य | एस-8 (₹25,500 – ₹81,100) |
Krushi Utpann Bajar Samiti Bharti 2025 अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्जाची लिंक उपलब्ध होईल.
- उमेदवाराने फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
निष्कर्ष
कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 ही ग्रामीण व शहरी भागातील तरुणांसाठी उत्तम रोजगाराची संधी आहे. या नोकरीमध्ये तुम्हाला आकर्षक पगार, स्थिर नोकरी आणि शेतकऱ्यांशी थेट काम करण्याचा अनुभव मिळणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी यासाठी लगेच अर्ज करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!