7 वी आणि 10 वी पास विद्यार्थ्यांना वीना परीक्षा बडोदा बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी: Bank Of Baroda Bharti

Bank Of Baroda Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bank Of Baroda Bharti: दरवर्षी प्रत्येक महिन्याला बँकेच्या क्षेत्रामध्ये कुठल्याना कुठल्या जागांची भरती सुरूच असते. कधी अधिकारी पदासाठी तर कधी चपराशी पदासाठी. मित्रान्नो, अनेक मुलांना असे वाटते कि बँक मध्ये नोकरी करण्यासाठी डीग्रीचे शिक्षण घेणेच आवश्यक आहे किंवा कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाच बँकेत जॉब मिळू शकतो.

त्यासाठी ज्या बँकेमध्ये अधिकारी पदासाठी भरती होते त्यांनाच डिग्रीचे शिक्षण आवश्यक असते. त्याव्यतिरिक्त अशा अनेक भारतीय बँक मध्ये होतात कि, ज्याचा अर्ज 7 वी आणि 10 वी पास आणि बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांना सुद्धा भरता येतो. अशीच एक भरती Bank Of Baroda Bharti सधया सुरु झाली आहे. या भरतीतील पाडण्यासाठी 7 वी आणि 10 वी पास विद्यार्थ्यांना बडोदा बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

Also Read: सरकारी नौकरी BMC Bharti 2025: बृहमुंबई महानगरपालिकेत परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी, अर्ज सुरु

विभाग आणि पदाचे विश्लेषण

विद्यार्थी मित्रांनो, हि भरती बरोडा स्वरोजगार विकास संस्थान अंतरंगात प्रसिद्ध करण्यात आली असून हि भरती Bank Of Baroda मध्ये दोन पदांकरता घेतली जाणार आहे. या भारतीद्वारे जे पद भरले जाणार आहेत, ते कंत्राटी पद्धतीने असणार आहेत. पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्याला 3 वर्षाकरिता कॉन्ट्रॅक्ट बेस वर रुजू करून घेतले जाईल. बँकेमध्ये ऑफिस अटेण्डर आणि वाचमन/ गार्डनर पदाची हि जाहिरात आहे.

पात्रता

  • अर्जदार हा वाचमन पदासाठी किमान 7 वि आणि ऑफिस अटेण्डर या पदासाठी किमान 10 वि उत्तीर्ण असायला हवा.
  • अर्जदाराचे वय किमान 22 ते कमाल 40 असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराला मराठी वाचता आणि लिहिता येईल तरच त्याला पात्र करण्यात येईल,
  • अनुभव असलेल्या अर्जदारास Bank Of Baroda Bharti मध्ये विशेष पराधान्य देण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण आणि वेतन

Bank Of Baroda Bharti हि पुण्यातील थेऊर येथील बँकेतील ऑफिस अटेण्डर चे एक पद आणि वाचमन चे एका पदाकरिता घेण्यात येणार आहे. या भरतीमध्ये उमेदराची निवड हि त्याच्या शिक्षणावर आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. तसेच जर उमेदवाराची निवड हि ऑफिस अटेण्डर या पदासाठी होत असेल, तर त्याला 14,000 हजार रुपये पगार मिळेल. त्याच प्रकारे जर उमेदवाराची निवड वाचमन किंवा गार्डनर म्हणून झाली असेल तर त्याला प्रति माह 12,000 हजार रुएए पगार दिला जाणार आहे.

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु: 20 आगस्ट 2025
  • अंतिम तारीख: 4 सप्टेम्बर 2025

अर्जाचा पत्ता आणि अर्ज प्रक्रिया

Bank Of Baroda Bharti ची जी दोन पदासाठी जाहिरात आली आहे त्याचे अर्ज हे ऑफलाईन स्वरूपात संबंधित संस्थेच्या पत्त्यावर जाऊन करावे लागेल. अर्ज करतांना अर्जासोबत तुमचा बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि तुमचे इतर शैक्षणिक प्रमाणपत्र घेऊन जावे लागतील. अर्ज करण्याचा पत्ता हा पुण्यामधील बरोडा स्वरोजगार विकास संस्थान थेऊर फाटा- पुणे हा आहे. जो कि सोलापूर हायवे, पो. कुंजीरवाडी आणि तालुका हवेली जिल्हा पुणे मध्ये येतो. पिन कॉड- 412201 तर मोबाईल नंबर 9460627939

निष्कर्ष

ज्यांचे वय हे वाढत चाललेले आहे आणि अजूनही बेरोजगारच आहत तर अशा मुलांसाठी बँकेत नोकरीची एक उत्तम साधी हि आहे. या भरतीमध्ये शिक्षणसुद्धा जास्त लागत नाही त्यामुळे दहावी पास असले तरी सुद्धा चांगला पगार तुम्ही मिळवू शकणार आहेत. भारताविषयी अधिक माहितीसाठी जो मोबाईल नंबर दिलाय त्यावर संपर्क साठी शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *