Aai Karj Yojana 2025 महाराष्ट्र राज्यात राज्य सरकार कडून सुरु करण्यात आलेली हि योजना आहे. पर्यटन संचालयाकडून हि योजना राबवण्यात येत असून या योजनेतून महिलांना ₹15 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्या जाते. आई कर्ज योजना हि राज्यातील महिलांना पर्यटन स्थळी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत करते. जर तुम्ही सुद्धा व्यवसाय करण्यासाठी नियोजन करत असाल तर शाशनाकडून तुम्हाला मदत मिळू शकते.
या योजनेतून मिळणारे कर्ज हे पूर्णपणे व्याजमुक्त आहे, कर्जाची रक्कम फक्त तुम्हाला भरायची आहे बाकी व्याज हे सरकार देणार असून या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. तर काय आहे पात्रता हा प्रश्न तुम्हाला आला असेल. घाबरू नका आम्ही तुम्हाला योजनेबद्दल संपूर्ण माहिती Aai Karj Yojana in Marathi मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
Aai Karj Yojana नेमकी काय आहे ?
आई कर्ज योजना फक्त महाराष्ट्र राज्यात पर्यटन विभागाकडून 19 जून 2023 रोजी सुरु करण्यात आली होती. हि योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश आहे पर्यटन स्थळी व्यवसाय करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करणे आणि व्यवसाय करण्यासाठी स्वावलंबी बनवणे आहे. Maharashtra Aai Karj yojana महिलांना पर्यटन स्थळी व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करते.
या योजनेचा लाभ घेऊन महिला अनेक प्रकार चे उद्योग सुरु करू शकतात. जसे ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल, होमीस्टे, कृषी पर्यटन, रेस्टॉरंट, गाइडिंग सारखे अनेक व्यवसाय सुरु करण्याची महिलांसाठी चांगली संधी आहे.
योजनेचा मुख्य उद्देश काय?
आई कर्ज योजनेचा मुख्य उद्देश आहे पर्यटन स्थळी महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी मदत करणे तसेच या योजनेतून दिले जाणारे कर्ज हे व्याजमुक्त राहणार आहे. सरकारकडून ४.५० लाख रुपये पर्यंतच्या व्याजाची रक्कम भरली जाणार आहे, त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर वेळ न घालवता लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या आणि स्वतःचा उद्योग सुरू करून आत्मनिर्भर बना. परंतु, त्यासाठी काही अटी व पात्रता सरकारने जाहीर केल्या आहे त्या तुम्हाला या लेखामध्ये खाली पाहायला मिळतील.
योजनेसाठी अटी व व्याजदर
Aai Karj Yojna Maharashtra या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मान्यता प्राप्त बँकांमार्फत दिले जाणार आहे. ही योजना व्याजमुक्त कर्ज योजना म्हणून ओळखली जाते कारण या योजनेतुन लाभार्थी महिलांना 4.50 लाख रुपयांपर्यंतचे व्याज राज्य सरकारकडून भरले जाते. ही योजना सात वर्षांच्या कालावधीपर्यंत राबवली जाते, आणि या कालावधीत किंवा संपूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल त्यानुसार लाभ दिला जातो. त्यामुळे महिलांनी या संधीचा फायदा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.
बँक खात्यात दर महिन्याला व्याजाची रक्कम जमा केली जाते. ही रक्कम किती काळ मिळेल हे तीन गोष्टींवर अवलंबून असते. कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत, किंवा ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत, किंवा एकूण व्याजाची रक्कम 4.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचेपर्यंत, या तीनपैकी जे आधी होईल, तोपर्यंतच लाभार्थीच्या खात्यात दर महिन्याला व्याज जमा केलं जातं.
आई कर्ज योजना साठी पात्रता
Aai Karj Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला पर्यटन विभागाकडून पर्यटन व्यवसायात नोंदणीकृत (पंजीकृत) असणे आवश्यक आहे. महिला जे कोणतेही व्यवसाय चालवत असतील, तो व्यवसाय महिलेच्याच नावावर नोंदलेला असावा, तसेच त्या व्यवसायात किमान ५० टक्के महिला कर्मचारी असणे बंधनकारक आहे.
अर्ज करताना महिलांकडे व्यवसायाशी संबंधित सर्व आवश्यक परवाने व कागदपत्रे उपलब्ध असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच मिळणार असून इतर राज्यातील महिलांना या योजनेसाठी पात्रता नाही. त्यामुळे पात्र महिलांनी सर्व अटी पूर्ण करून योग्य कागदपत्रांसह लवकर अर्ज करावा.
कोणते व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळते?
निवास व भोजन सुविधा
- होम स्टे
- लॉज
- रिसॉर्ट
- निवास व न्याहारी सुविधा
खाद्यसेवा व्यवसाय
- हॉटेल
- उपहारगृह
- फास्ट फूड सेंटर
- बेकरी
- महिला कॉमन किचन
पर्यटन सेवा व व्यवस्थापन
- टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी
- ट्रान्सपोर्ट सेवा
- मार्गदर्शक (गाईडिंग) सेवा
- क्रूझ सेवा
साहसी पर्यटन
- जलक्रीडा
- थरारक साहसी उपक्रम
- गिरिभ्रमण (ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग)
विशेष प्रकारचे पर्यटन
- आदिवासी पर्यटन प्रकल्प
- निसर्ग पर्यटन
- कृषी पर्यटन
आरोग्य व वेलनेस सेवा
- आयुर्वेदावर आधारित वेलनेस सेंटर
- योग केंद्र
हस्तकला व स्मरणिका व्यवसाय
- स्थानिक हस्तकला विक्री केंद्र
- स्मरणिका दुकानं (Souvenir Shops)
नवीन प्रवास सुविधा
- कॅरव्हॅन
- हाऊस बोट
- टेंट
- ट्री हाऊस
- पॉड्स
महिलांसाठी विशेष उपक्रम
- महिलांच्या नेतृत्वाखालील कॅफे
- पर्यटन माहिती केंद्रे
- टुरिस्ट हेल्प डेस्क
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- बँक खातेबुक
- प्रकल्प अहवाल
- GST नंबर
- FSSAI परवाना
- प्रतिज्ञापत्र
योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
महिलांनी पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. Aai Karj Yojana Apply Online केल्यानंतर पात्रतेची तपासणी केली जाते. योजनेसाठी पात्र असलेल्या महिलेला LOI (Letter of Intent) म्हणजेच उद्देशपत्र दिल्या जाते. हे पत्र मिळाल्यानंतर, त्याच्या आधारे संबंधित बँकेतून कर्जाची प्रक्रिया पुढे राबवता येते.
Tar Kumpan Yojana Maharashtra 2025: शेतकऱ्यांना तार कुंपणावर मिळणार 90 टक्के अनुदान
निष्कर्ष
Aai Karj Yojana Maharashtra राज्यातील पर्यटन स्थळी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी खूप लाभदायक योजना आहे. याया योजनेच्या माध्यमातून महिला आपला चालू असलेला व्यवसाय अधिक वाढवू शकतात, तसेच ज्या महिला नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठीही ही योजना एक उत्तम संधी आहे. जर तुम्ही सुद्धा योजनेसाठी पात्र महिला असाल तर लगेच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.
FAQ
1) आई कर्ज योजनेतून किती कर्ज मिळू शकते?
महिलांना ₹15 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. तसेच या कर्जावर होणाऱ्या व्याजाचा परतावा सरकारकडून 7 वर्षांपर्यंत किंवा ₹4.5 लाखांपर्यंत केला जातो.
2) परतफेड कालावधी किती आहे?
कर्जाची परतफेड 1 ते 7 वर्षांपर्यंत केली जाऊ शकते. ही मुदत व्यवसायाच्या स्वरूपावर आणि कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते.
3) Aai Karj Yojana फक्त ग्रामीण महिलांसाठी आहे का?
नाही, Aai Karj Yojana शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील महिलांसाठी उपलब्ध आहे, जोपर्यंत त्या पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू करतात.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!
I want to make buisness in food market so pls help me
Hello, I am Ayesha Shaikh, today I am working in my self grossry shop