Amaravti News: देशातील सर्वात स्वच्छ हवेचे शहर बनले अमरावती, मिळाले 75 लाखाचे पारितोषिक.

Amaravti News
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Amaravti News: मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रातील अमरावती शहरातील रहिवासी असाल तर तुम्च्य्तासाठी खुश खबर. हो देशातील सर्वात स्वच्छ हवेचे शहर बनले अमरावती, त्यामुळे तुम्ही जो श्वास घेणार आहे ते इतर शहरच्या तुलनेने सर्वात चांगली ऑक्सिजन असणार आहे. मागील काही वर्षांमध्ये देशातील सर्वात प्रदूषित हवा असलेले शहर दिल्ली म्हणून फार चर्चेत होते, तर सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपल्याच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे हे सुद्धा आपण ऐकले असेल.

परंतु सरावात स्वच्छ हवा असणारे शहर हे अमरावती बनलेले आहे. त्यामुळे हि न्युज एकूण अमरावतीकर नक्कीच आनंदी झाले असतील. कारण मानवाला प्रत्येक क्षणाला ऑक्सिजन ची आवश्यकता असते आणि ते आपण हवेच्या माध्यमातून घेत असतो. परंतु जर ऑक्सिजन हेच दूषित मिळत असेल तर मात्र अनेक मोठ्या बिमाऱ्याचा सामान करावा लागू शकतो याची जाण आपल्याला नक्कीच असेल.

Also Read: Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव

अमरावती शहराला मिळाले 75 लाखाचे पारितोषिक

अमरावती शहराला मिळाले 75 लाखाचे पारितोषिक

अमरावती, महाराष्ट्रातील विदर्भामधील प्रदेशातील नागपूर नंतर सर्वात मोठे आणि विकसित शहर आहे. या शहरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा सारखे जगविख्यात संत होऊन गेले आहेत. ज्यांनी संपूर्ण देशाला स्वच्छता ठेवण्याचा मोठा संदेश दिला होता. आणि हे धरती आणि हा निसर्गाचं आपले माय बाप असल्याचे सांगितले होते.

तेव्हपासूनच अमरावतीकर हे स्वच्छता आणि निटनिटकेपणासाठी ओळखले जातात. भलेही अमरावती हे एक विकसित शहर आहे परंतु विकासासोबतच पर्यावरणाला जपण्याचे काम सुद्धा या शहरातच करण्यात आले आहेत. बांबू गार्डन हे एक उत्तम उदाहरण आहे. तसेच पंचवटी सारख्या ठिकाणी सुद्धा पर्यावरणाची निघा राखली जाते आणि नवीन नवीन झाडांचे संतुलन कायम ठेवले जाते. रस्त्यांच्या काठेला मोठे मोठे निंबाचे जसे हे हवेला अधिकच स्वच करण्याचे काम करतात आणि वाहनाच्या माध्यमातून जो कार्बन डे ऑक्साइड बाहेर येतो त्याला शोषून घेण्याचे काम करतात.

त्यामुळं अमरावतीकर रोज स्वच ऑक्सिजन घेऊ शकतात. त्यातच आता भारत सरकारने अमरावतीला सर्वात स्वच हवेचे शहर म्हणून प्रमाणपत्राचा दिले आहे. तसेच त्या प्रमाणपत्रासोबत जे पतितोषिक स्वरूपात रक्कम दिली गेली आहे त्या रकमेच्या माध्यमातुन शहर प्रशासन शहराला अधिक नैसर्गिक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करू शकणार आहे . अजूनसुद्धा मिळालेला रकमेचा उपयोग करून शहराला आणि शहरातील वातावरणाला वनस्पतींनी नटवण्याचे काम केली जाऊ शकते.

इंदौर होते स्वच्छ हवेच शहर

मागील वर्षी देशातील सर्वात स्वच्छ हवेचे शहर म्हणून मध्यप्रदेश मधील इंदौर या शहराला घोषित केले गेले होते. तसेच स्वच्छ हवेच्या आणि ऑक्सिजनच्या यादी मध्ये महाराष्ट्रातील अमरावती या शहराचे नाव हे दूर दूर पर्यंत सुद्धा नव्हते. मात्र मागील काही महिन्यांमध्ये अमरावतीच्या नागरिकांनी जी स्वच्छता मोहीम आणि झाडे लावा झाडे जगवा मोहीम हाती घेतली तेव्हा कुठे आपल्याला देशात सर्वात स्वच्छ हवेचे शहर अमरावतीला बनवता आले आहे.

तसे बघितले तर अमरावतीला विदर्भामधील शिक्षणाचे माहेरघर म्हणून सुद्धा संपूर्ण देशभर ओळखले जाते. इतिहासातील पंजाबराव देशमुख आणि प्रतिभाताई पाटील सारखया राजकीय नेत्यांनीसुद्धा आपल्या अमरावतीचे नाव देश पातळीवर पोहोचवले आहेत. तसेच आत्ता आणखी एक विक्रम या शहराच्या नावाने नोंदवला गेला आहे.

निष्कर्ष

प्रत्येक गावातील आणि शहरातील प्रत्येक नागरिकाला वाटत असते आपल्याला कुठली बिमारी होऊनये. अधिकतर बिमारया ह्या सध्या श्वसनाच्याच आढळून येत आहेत. त्यामुळे मानवाला स्वच्छ हवा किती महत्वाची असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणून या बातमीमुळे कदाचित अमरावती शहराची लोकसंखया सुद्धा वाढू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *