Annasaheb Patil Yojana: राज्यातील लाखो युवक बेरोजगार आहे, त्यांच्या हाताला कुठले काम नाही. सुशिक्षित असून सुद्धा नोकरीकता बिचारे वन वन फिरताना आपण बघतो. महाराष्ट्र शासन अशाच युवकांना स्वयंरोजगार निर्माण करता यावा आणि हि तरुण नोकरीच्या मागे वेळ खर्च न करता उद्योगाकडे वळावी यासाठी अनेक कर्ज योजना, स्वयंरोजगार शासन राबवत असत. त्यापैकीच एक योजना Annasaheb Patil Yojana होय. या योजनेच्या माध्यमातून 10 लाख ते 50 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला कुठलेही वाहन खरेदीकरण्यासाठी किंवा उद्योग सुरु करण्यासाठी उपलब्ध केले जाते. कर्जावरील सर्व व्याज हे शासन भरत त्यामुळे व्याजाची काळजी लाभार्थ्याला करावी लागत नाही.
अण्णासाहेब पाटील योजना सविस्तर माहिती : Annasaheb Patil Yojana Maharashtra
राज्यातील युवक उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय वाढवता यावा किंवा जे नवीन उद्योग सुरुवातीचा प्रयत्न करत आहेत त्यांना उद्योग उभारतनिसाठी आर्थिक मदत म्हणून हि Annasaheb Patil Yojana राबविली जात आहे. जेणेकरून राज्यातील तरुण उद्योगामध्ये कमाल दाखवू शकतील आणि उंच भरारी घेतील. मित्रांनो, हो योजना एक कर्ज योजना असून जेवढे कर्ज तुम्ही काढलं तेवढेच सात वर्षाच्या कालावधीमध्ये भरावे लागेल. तुमच्या कर्जावर जेवढेही व्याज होईल ते सर्व सरकारच भरणार असल्यामुळे तुम्हाला व्याजाचा कुठलाही ताण घेण्याची आवश्यकता पडणारा नाही. मागील आर्थिक वर्षात Annasaheb Patil Yojana अंतर्गत राज्यामध्ये 64 कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले असून 1017 उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
अण्णासाहेब पाटील योजनांच्या कर्जाचे प्रकार कोणते आहेत?
- व्यक्तिगत खाजगी व्याज परतावा योजना: या प्रकारच्या माध्यमातून व्यक्तिगत कर्जासाठी किंवा खासगी कर्जासाठी कामाल 15 लाखांपर्यंतचे कर्ज आणि त्यावर 4-5 लाखांपर्यंतचे व्याज परतावा दिला जातो. हे सर्व परतावा या योजनेच्या माध्यमातून शासन प्रदान करत असत.
- गट समूह व्याज परतावा योजना: या माध्यमातून समूह मिळून उद्योग करत असाल किंवा गटमिळून खरेदी करत तर कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यावरील सर्व व्याजाचा परतावा सुद्धा शासनाचं भरणार आहे.
- शेतकरी गट समूह व्याज परतावा योजना: या योजनेच्या माध्यमातून शेतकरी गट समूह किंवा FPO कर्जासाठी अर्ज करू शकणार आहेत. याच्यामाध्यमातून शेतीसाठी ट्रॅक्टर करता किंवा शेतीशी निवडीत इतर साहित्यासाठी कर्ज दिले जाणार आहेत.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
- ज्या व्यक्तींनी या अगोदर अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेतला नाही अशांनाच आत्ता अर्ज करता येणार आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे कमाल वार्षिक उत्पन्न 8 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अठरा वर्षावारील कोणीही या योजनेसाठी अर्ज करू शकेल.
- कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या व्याजाचा परतावा हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल.
- कुटुंबातील सर्वच व्यक्ती वेगळ्या वेगळ्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतील.
- जर तुम्ही याआधी सुद्धा अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेतला असेल आणि हे मंडळाला कडाले तर घेतलेला लाभ पार्ट सुद्धा करावा लागू शकतो.
- या योजनेचा लाभ मराठा बांधवांसोबत इतरही प्रवर्गातील नागरिकांना लाभ घेता येणार आहे. फक्त त्यांच्यासाठी कुठले महामंडळ नसेल तरच.
- कर्ज मजूर झाल्यावर एका महिन्याने तुमच्या उद्योगाचा किंवा व्यवसायाचा फोटो पाठवावा लागेल.
- अर्ज करता तुमचे शपथपत्र देणे आवश्यक असेल.
योजनाअंतर्गत कोणते व्यवसाय करता येणार?
1. | शेती व शेतीशी निवडीत व्यवसाय |
2. | मॅनिफॅक्चरिंग संबंधित व्यवसाय |
3. | सेवा उद्योग |
4. | सर्व व्यवसायिक वाहनांसाठी |
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणती कागदपत्र लागतील?
- उद्यम आधार कार्ड
- व्यवसायाचा नोंदणीचा पुरावा
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर
- इतर कागदपत्रे
अण्णासाहेब पाटील योजनांसाठी अर्ज कसा करायचा?
भावी उद्योजक मित्रानो, Annasaheb Patil Yojana मार्फत बिनव्याजी कर्ज घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणे शक्य झाले आहे. त्यासाठी तुम्हाला udyog.mahaswayam.gov.in या अधिकृत वेबसाईट ला जायचे आहे. तेथे तुमचे रजिस्ट्रेशन करून ग्यायचे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला कर्ज योजना निवडून अर्ज करता येऊ शकतो. एक लक्षात ठेवा तुम्हला अर्जासोबत काही कागदपत्रे उपलोड करणे गरजेचे असणार आहे, याची दक्षता घ्यावी.
निष्कर्ष
राज्यातील मराठा बांधवांसह इतर मागास्वर्गीर्य ज्यांच्यासाठी कुठले महामंडळ अस्तित्वात सुद्धा या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा उद्योग सुरु करू शकणार आहेत. महाराष्ट्र सरकारने युवकांना एक नवीन दिशा आणि उम्मीद देण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे तुमचे उद्योजक बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मित्रांना हि माहिती नक्की शेयर करा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.