Aple Sarkar: डिजिटल क्रांती करून राज्यातील जनतेला मोबाईलवरच सर्व सेवा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. सर्व सरकारी योजना आणि अन्य कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांना शहरात जाऊन सेतूच्या चकरा माराव्या लागत होत्या. सोबत स्वतःचे पैसे जात होते ते वेगळेच. परंतु जर सर्व योजनांचा लाभ आणि आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे जे Aple Sarkar पोर्टल वरती काढता येत होते ते राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या मोबाईल मधील What’s App वर काढता येणार. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत घोषणा केली आहे. सरकारच्या या डिजिटल क्रांतीविषयी सविस्तर माहित आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
Read Also: Raj-Uddhav Melava: दसरा मेळाव्यात पुन्हा राज आणि उद्धव येणार एकत्र? मेळाव्यासाठी मिळाली परमिशन.
Aple Sarkar च्या 200 सेवा मिळणार What’s App ला
मित्रांनो, जर तुम्ही शेतूच्या चकरा मारू मारू परेशान झाले आहेत तर शासना लवकरच तुम्हाला खुशखबर देणार. जेव्हा 2014 मध्ये राज्यात भारतीय जनतापार्टीचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच त्याच्या पुढील वर्षीच म्हणजे 2015 ला त्यांनी डिजिटलायझेशन चे धोरण आणलं होते. आत्ता त्यावर आणखी चांगली रणनीती आखून नागरिकांना होणार त्रास कमी करण्यासाठी आणि होणारी आर्थिक लुटमारीला आटोक्यात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.
मित्रांनो, आपल्याला तर माहीतच असेल कि सेतूवर कुठल्याही योजनेसाठी किंवा कागदपत्र काढण्यासाठी सेतुवले सर्वाधिक वापर आपले सरकार याच पोर्टलचा करत असतात. कारण या पोर्टलवर शासनाच्या विविध योजना आणि कागदपत्रे मिळून अशे एकूण 669 कामे होत असतात. त्यांपैकी 200 कामे आता तुमच्या What’s App वरूनच प्रत्येक नागरिकांना करता येणार आहेत. ज्यामुळे नागरिकांचा वेळ, पैसे सर्वच वाचणार आहे.
26 जानेवारीपर्यंत मिळेल प्रत्येकाला लाभ
सध्या या डिजिटलायझेशनच्या क्रांतीला सुरुवात झाली असून चार टप्यांमध्ये याचे काम केलं जाणारा आहेत. पहिला टप्पा हा 26 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहितीसुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली आहे. तसेच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण हि महाराष्ट्र दिन पर्यंत होईल. Aple Sarkar चे हे दुसरे व्हर्जन असल्याने सर्वांना स्वतःची आणि स्वतः भरलेला अर्ज कुठे आहे कागदपत्रे कुठे आहेत याची विश्वसनीय माहिती बघता येणार.तसेच यामधु आणखी एक मोठा फायदा होईल कि, सरकारी कार्यालयात ज्या चकरा माराव्या लागतात त्या बंद होईल आणि सर्व सुविधा ह्या मोबाईलवरून घेता येतील. म्हणून जासी फडणवीसांनी उची घोषणा केली आहे, तेव्हापासून सर्वात नागरिक या सर्व सेवांचा लाभ घरीबसुन घेण्यास उत्सुक आहेत.
एकीकडे नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी आणल्यामुळे मोठे आंदोलन करण्यात आले ज्याने आटा हिंसक वळण घेतले आहे. तर दुसरीकडे मात्र आपल्या भारत देशात विशेषतः महाराष्ट्रात सर्व शासकीय व्यवहार डीजीटल स्वरूपात What’s App वर आणण्याची तयारी सुरु आहे.
निष्कर्ष
आज सोशिअल मीडियावरती ऍक्टिव्ह हे लहानापासून ते मघाटारांपर्यंत सर्वच आहेत. म्हणून याच सोशल मीडिया उपयोग घेत जर सर्व सरकारी कागदपत्रे किंवा योजनांचा लाभ हासुद्धा सोशल मीडियावरून घेतल्यास या मध्ये वावगे काय? उलट सर्व नागरिकांपर्यन्त शासनाच्या अनेको योजना पोहोचण्यास मदतच होणार आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.