Ativrishti Nuksan Bharpai 2025: मित्रांनो आपण बघतच आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तब्बल 12 ते 14 लाख हेक्टर शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये शेतकऱ्यांची काय चूक, राज्यात अनेक शेतकरी अशे आहेत जे फक्त शेती वर अवलंबून असतात परंतु अश्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी पावसामुळे जर नुकसान झाले तर ते शेतकरी काय करतील? आपले जीवन कशे जगातील? या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) यामधून ८६.२३ कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले आहे.
लाडकी बहीण योजना धक्का! तब्बल ४२ लाख अर्ज रद्द, २६ लाख महिलांना ऑगस्टचा हप्ता थांबणार
Ativrishti Nuksan Bharpai वाटप कसे होणार?
शेतकरी मित्रांनो आता अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप नव्या व पारदर्शी पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने MAHA IT मार्फत एक खास ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. चुकीच्या खात्यात पैसे जायला नको फक्त लाभार्थी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे यासाठी या पोर्टलवर शेतकऱ्यांचे आधार कार्डद्वारे प्रमाणीकरण केले जाईल. नवीन प्रणालीमुळे आता नुकसान भरपाईचे वाटप अधिक वेगवान, अचूक आणि सुरक्षित पद्धतीने होणार आहे.
शेतकऱ्यांनो मदतीसाठी या अटी पूर्ण करा
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झालेला असावा याची काळजी घ्यावी.
- शेतकऱ्यांचे E-KYC पूर्ण असणे बंधनकारक आहे. अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही हे लक्षात घ्यावे.
- नुकसान झालेली शेती शेतकऱ्याच्या नावावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजना घेतली आहे, त्यांना प्राधान्य दिले जाईल.
- नुकसान झालेल्या पिकांमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आणि मका यांचा समावेश आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा
शेतकरी मित्रांनो या संकटाच्या काळात राज्य सरकार तुमच्या पूर्णपणे सोबत आहे. बाधित नागरिकांना शक्य तितक्या लवकर आणि योग्य ती मदत सरकारकडून मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि पंचनामे व मदत प्रक्रियेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय मदत
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सरकारने मदतीचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ज्यांचे पीक नुकसान झाले आहे, त्यांना प्राधान्याने मदत मिळणार आहे.
या जिल्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नांदेड, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून ₹86.23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, ज्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक आधार मिळेल.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!