कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्याला 35,500 रुपयाची हेक्टरी मदत घोषित, बघा संपूर्ण माहिती | Ativrushti Nuksan Bharpai Update

Ativrushti Nuksan Bharpai 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai Update 2025: राज्यामध्ये मागील महिन्यामध्ये जो पावसाने हाहाकार माजवला होता ज्यामध्ये राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे पीक पाण्यात वाहून गेले, कोणाचे तर खरडुनच गेले तर कोणाचे राहण्याचे घरे सुद्धा पाण्यात गेलीत. देशात पंजाब , हरियाणासह महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये हा रॊद्र तांडव आपल्याला बघायला मिळाले. ज्यामध्ये मात्र सर्वसाधारन शेतकरी हा पूर्णपणे भरडला गेला.

राज्यसरकारने तात्पुरती मदत म्हणून हेक्टरी 8000 रुपये तर जमा केले परंतु या मदतीने मात्र शेतकरी राज्यामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आणि शासनाचा जागो जागो विरोध होऊ लागला. पंजाबप्रमाणे राज्यात सुद्धा हेक्टरी 50 हजार देण्याची मागणी जोर पकडू लागली आणि आंदोलने, उपोषणे होऊ लागली. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा मनातील दुःखाचा रोष समजून घेऊन केंद्रकारून मोठा पॅकेज मिळवला आणि शेतकऱ्यांना आज ते जाहीर केलेला आहे. त्यामध्ये सर्वसच शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानानुसार मदत मिळणार आहे त्याचे सविस्तर विवरन बघुयात.

Also Read: लाडक्या बहिणींनो पुढील हफ्ते मिळवायचे असेल तर हि प्रक्रिया लवकरात लवकर करा | Ladki Bahin Yojana eKYC Update

Ativrushti Nuksan Bharpai Update 2025। अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 31 हजार 625 कोटींचं पॅकेज घोषित

आज राज्यसरकारने मंत्रिमंडळामध्ये घेतलेला निर्णय प्रसारमाध्यमांसमोर घोषित केला आहे. घोषित करतेवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा उपस्थित होते. राज्यातील मराठवाडासह विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील निवडक तालुक्यांमध्ये हि Ativrushti Nuksan Bharpai 2025दिल जाणार आहे. ते कशाप्रकारे असेल बघुयात.

कोरडवाहू शेतीसाठी 18,500 रुपये नुकसान भरपाई

राज्यातील जे शेतकरी कोरडवाहू शेती करतात आणि त्यांचे अतिवृष्टी मुले पीक मातीमोल झाले आहे. अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने हेक्टरी एकूण 18,500 रुपयाची नुकसान भरपाईची मदत आज घोषित केली आहे. त्यापैकी आठ हजार रुपये आधीच जमा केली असून बाकीचे राहिलेली दहा जहाजाराची मदत हि दिवाळीच्या आदी देणार असल्याची माहिती जिद्द पवार यांनी दिली आहे.

बागायती शेतीसाठी 27,500 रुपये नुकसान भरपाई

राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे उत्तम सिंचनाची व्यवस्था राहते. सिंचनाची व्यवस्था असली कि, त्यांच्या शेतामध्ये उत्पादन सुद्धा अधिक निघत असते. म्हणून अशा बागायती शेतकऱ्यांचे कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यां ना जास्त नुकसान होत असते. यामुळे राज्यसरकारने बागायती शेतीसाठी 27,500 रुपये नुकसान भरपाई देणार असल्याची अधिकृत घोषणा आजच केली आहे.

बहुवार्षिक पिकांसाठी(फळबाग) 32,500 रुपये नुकसान भरपाई

फळबाग हे एकदा का लागवड केली तर तेथून काही वर्षांनंतर त्यांचे उत्पन्न हे सुरूच राहत असते. आणि अशा पिकांचे अतिवृष्टीमुळे बाकी पिकांच्या तुलने खूप जास्त होत. म्हणून यांच्यासाठी सुद्धा राज्यसरकारने Ativrushti Nuksan Bharpai 2025 नुसार 32,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.जे कि दिवाळीच्या आधीच संपूर्ण रक्कम अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात जबरदस्त वाढ! आजचा ताजा सोयाबीन बाजारभाव येथे पहा, Maharashtra Soyabean Market Rate

इतर झालेल्या नुकसानाची भरपाई

राज्यात बऱ्याच ठिकाणी हा धकफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतातील पिकांसोबतच अन्य सुद्धा नुकसान झालेलं आहेत. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही वरून हे नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठे संकट आले होते. मात्र आता या सर्व संकटातून उभारण्यासाठी शासन त्यांच्या बरोबर आहे अशी जाणीव या Ativrushti Nuksan Bharpai 2025 च्या घोषणांनी करून दिली आहे.

ज्या शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच पाण्याने खरडून नेली आहे अशा शेतकऱ्यांना शासन साडेतीन लाखापर्यंत आर्थिक मदत नुकसान हर्पी म्ह्णून करणार आहे. तर त्या शेतकरयांच्या शेतातील विहिरीचे नुकसान झाले असेल त्यांना ते दुरुस्तीकरता प्रति विहीर तीस हजार रुपये मिळणार आहेत.

दुधाळ जनावरनच्या मृत्यासाठीही जाहीर केली मदत

ज्या शेतकऱ्यांचे किंवा पशुपालकांचे दुधाळ जनावरे नदीच्या पुरात वाहून गेलीत किंवा अतिवृष्टीतमुळे मृत्युमुखी पडलीत त्यांना सुद्धा प्रति गाय किंवा प्रति म्हैस 37,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. हि मदतीची मर्यादा आधी तीन जनावरांपर्यंत होती मात्र आता यात सुधार करून जेवढे जनावरे वाहून गेली असतील किंवा मृत्युमुखी पडली असतील त्या सर्वांच्या नुकसानीची मदत मिळणार आहे.

पीक विमाही होणार हेक्टरी 17,000 जमा

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल किंवा ऑनलाईन नोंदणी केली अश्या अशा पात्र असलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 जमा करण्यात येणार आहे. अर्थात जर विचार केला तर कोरडवाहू शेतकऱ्याला एकूण मदत 18,500+17,000= 35,500 रुपयांची आर्थिक मदत हि कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार आहे. तर बघती आणि फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाभाचे गणित तुम्ही करू शकता.

नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक मदत पीक विमा एकूण लाभ
कोरडवाहू शेती 18,500 17,00035,500
बागायती शेती 27,50017,00044,500
फळबाग शेती 32,50017,00051,500

निष्कर्ष

पावसाने जे या वर्षी शेतकऱ्यांचे हाल केले आहेत, ज्यामुळे शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झाला होता. या एवढ्या मोठ्या संकटातून उभारण्यासाठी शासनाने नुकसान भरपाईची आजची घोषणा करून एक मोठा आधार दिला आहे. जर तुम्ही शेतकरी आहेत किंवा शेतकरीपुत्र आहेत तर हि माहिती नक्की इतर बांधवांना शेयर करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 thought on “कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्याला 35,500 रुपयाची हेक्टरी मदत घोषित, बघा संपूर्ण माहिती | Ativrushti Nuksan Bharpai Update”