सरकारची नवीन योजना इयत्ता १ली ते ७वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रतिवर्षी ₹2,500, Bandhkam Kamgar Children Scholarship

Bandhkam Kamgar Children Scholarship
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhkam Kamgar Children Scholarship 2025: महाराष्ट्र राज्य सरकार बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी अनेक योजना राबवत असतात. त्याचप्रमाणे सरकारने आता त्यांच्या चिमुकल्यांसाठी सुद्धा नवीन योजना सुरु केली आहे. इयत्ता १ली ते ७वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सरकार प्रतिवर्ष ₹2,500 रुपयेही आर्थिक मदत देणार आहे.

महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेचा उद्देश कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरविणे आणि त्यांना शालेय शिक्षणात प्रोत्साहन देणे हा आहे.

राज्यातील मुलींसाठी आनंदाची बातमी या योजनेतून शिक्षणासाठी मिळणार 60,000 रुपयांचे अनुदान : Aadhar Yojana Scholarship

Bandhkam Kamgar Children Scholarship योजनेचा उद्देश

शिक्षण घेण्याचा हक्क सर्वाना आहे परंतु गरीब कुटुंबातील मुलं आर्थिक परिस्तिथीमुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. अशा सर्व गरजू मुलांसाठी शासनाने बांधकाम कामगार मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना 2025 सुरु केली आहे. या योजनेद्वारे बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना शैक्षणिक अनुदान दिले जाते, जेणेकरून शिक्षणातील गळती कमी होईल आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबणार नाही. ही योजना विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देते आणि त्यांची शैक्षणिक प्रगती वाढवते.

शिष्यवृत्तीचा लाभ

  • इयत्ता १ ली ते ७ वी: ₹2,500/- प्रति वर्ष
  • इयत्ता ८ वी ते १० वी: ₹5,000/- प्रति वर्ष

ही रक्कम थेट विद्यार्थ्याच्या किंवा पालकाच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केली जाते.

कोण पात्र आहेत?

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी लागू आहेत. अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा आणि या योजनेचा लाभ फक्त पहिल्या दोन मुलांसाठीच दिला जातो. विद्यार्थ्याने इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित शाळा ही शासकीय, अनुदानित किंवा शासनमान्यताप्राप्त असावी.

राज्यातील युवकांना 10 हजार मासिक स्टायफंडसह सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी: Mukhyamantri Yuva Karya Prashikashan Yojana

आवश्यक कागदपत्रे

  • बांधकाम कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र
  • विद्यार्थ्याचा शाळेचा दाखला
  • गुणपत्रिका किंवा शालेय प्रगती पत्रक
  • आधारकार्ड
  • बँक पासबुकची झेरॉक्स

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ https://iwbms.mahabocw.in या लिंकवर जा. तेथे “शालेय शिक्षणासाठी अनुदान योजना” हा पर्याय निवडा. त्यानंतर आवश्यक माहिती भरून सर्व कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची तपासणी बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत केली जाते. मंजुरी मिळाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

ऑफलाइन अर्जासाठी PDF फॉर्म

जर ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, तर खालील लिंकवरून फॉर्म डाउनलोड करा 👇

निष्कर्ष

Bandhkam Kamgar Children Scholarship योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे. या योजनेमुळे मुलांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. पात्र कामगारांनी लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *