Bandhkam Kamgar Kanya Vivah Yojana, महाराष्ट्रात बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे मजूर आपल्या उपजीविकेसाठी खूप मेहनत घेतात आणि कष्टमय आयुष्य जगतात. रोजंदारीवर काम करणारे हे कामगार घर चालवण्यासाठी, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि इतर खर्च भागवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात. मात्र, त्यांच्या आयुष्यातील एक मोठा आर्थिक भार म्हणजे मुलीच्या लग्नाचा खर्च असतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार कन्या विवाह योजना सुरु केली आहे.
चला तर मग या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ योजनेसाठी कोण लाभार्थी पात्र आहे, अर्ज पद्धती काय आहे तसेच अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली लागतात अशी संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेख मधून देऊ. त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल.
Sheli Palan Yojana Maharashtra: शेळीपालन व्यवसायासाठी सरकार कडून 50 लाख कर्ज 75% अनुदानावर मिळत आहे
Bandhkam Kamgar Kanya Vivah Yojana म्हणजे काय? (सविस्तर माहिती)
महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मुलीच्या विवाहासाठी या योजनेतून ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते. राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय बांधकाम कामगारांसाठी अतिशय लाभदायक ठरत आहे. या योजनेतून मिळणारी राशी लाभार्थी पात्र नागरिकांच्या थेट खात्यात जमा होते. विवाहाच्या वेळी ही मदत मिळाल्यामुळे कुटुंबाला कर्ज घेण्याची आवश्यकता राहत नाही.
बांधकाम कामगार कन्या विवाह योजनेचा उद्देश
बांधकाम कामगार कन्या विवाह योजनेचा उद्देश म्हणजे बांधकाम मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी थेट आर्थिक सहाय्य पुरवणे आहे. गरीबीतून विवाहात अडथळे येऊ नयेत आणि कुटुंबावर आर्थिक भार पडू नये, यासाठी शासन ही मदत देते. Bandhkam Kamgar Kanya Vivah Yojana या योजनेमुळे कामगार कुटुंबांना दिलासा मिळतो आणि त्यांना सामाजिक सुरक्षिततेची जाणीव होते. मुलींचा विवाह सन्मानाने पार पडावा आणि त्यांच्या पालकांना मदतीचा हात मिळावा, यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते.
योजनेचा लाभ
Bandhkam Kamgar Kanya Vivah Yojana Maharashtra या योजनेत बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी थेट ₹51,000 पर्यंतची आर्थिक मदत देण्यात येते. ही मदत थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची मध्यस्थी राहत नाही. विवाहाच्या वेळी मिळालेली ही रक्कम कुटुंबासाठी मोठा आधार ठरते. त्यामुळे त्यांना कर्ज घेण्याची किंवा जास्त खर्चामुळे ओझं पेलण्याची वेळ येत नाही. परिणामी मुलीचा विवाह कमी खर्चात, पण सन्मानाने व समाधानाने पार पाडता येतो.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे (वडील/आईचे) बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
- बांधकाम कामगार ओळखपत्र
- लाभार्थीचे आधारकार्ड
- विवाह प्रमाणपत्र (नोंदणी कार्यालयाकडून मिळणारे)
- वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र / शालेय दाखला
- बँक पासबुकची प्रत (कामगाराच्या नावावर)
- पासपोर्ट साईज फोटो
- कामगाराचा अधिवास दाखला
योजनेसाठी पात्रता
या योजनेसाठी राज्य शासनाने काही पात्रता व अटी निश्चित केल्या आहे. Bandhkam Kamgar Kanya Vivah Yojana ही फक्त महाराष्ट्रातील बांधकाम मजुरांसाठी आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचे बांधकाम कामगार कल्याण मंडळात किमान एक वर्ष सदस्यत्व असणे गरजेचे आहे. विवाह होणारी मुलगी ही अर्जदाराचीच मुलगी असावी तसेच विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.
या योजनेचा लाभ केवळ एका मुलीच्या विवाहासाठीच मिळतो, म्हणजेच एका कामगाराला एकदाच मदत मिळू शकते. विवाहातील मुलीचे वय किमान १८ वर्षे तर वराचे वय किमान २१ वर्षे असणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदाराकडे बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र किंवा नोंदणी क्रमांक असणेही आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला (mahabocw.in) भेट द्यावी लागेल. तिथे योजना विभागात “कन्या विवाह योजना” हा पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रांची स्कॅन प्रत अपलोड करणे गरजेचे असते. फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जदाराला एक अर्ज क्रमांक दिला जातो. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून अर्जाची पडताळणी केली जाते आणि सर्व काही योग्य असल्यास मदतीची रक्कम थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
निष्कर्ष
Bandhkam Kamgar Kanya Vivah Yojana ही योजना राज्यातील गरजू व गरीब कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. गरीब बांधकाम कामगारांच्या आयुष्यातील एक मोठा प्रश्न म्हणजे मुलीच्या विवाहाचा खर्च असतो. या योजनेमुळे तो प्रश्न काही प्रमाणात सुटतो. तुमच्या परिचयात कोणी बांधकाम कामगार मजदूर असेल तर अशा नागरिकांपर्यंत हि माहिती नक्की पोहचवा. शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
FAQ
1) अर्ज कधी करावा लागतो?
मुलीचा विवाह झाल्यानंतर ६ महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.
2) विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे का?
होय, विवाह कायदेशीररित्या नोंदणीकृत असणे आणि त्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
3) एका कामगाराला किती वेळा हा लाभ मिळतो?
एका कामगाराला केवळ एका मुलीच्या विवाहासाठीच ही मदत मिळते.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!