आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी Beauty Parlour Anudan Yojana 2025 सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थी पात्र लाडक्या बहिणींना ५० हजार रुपये अनुदान दिल्या जाणार आहे. शहरी भागातील महिलांना सुद्धा लाभ दिल्या जाणार आहे परंतु प्राथमिकता ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या महिलांना दिल्या जाणार आहे.
ब्युटी पार्लर अनुदान योजना महिलांसाठी कमी भांडवलात सुरु होणारा आणि लवकर नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. चला तर मग जाणून घेऊ या योजनेतून लाभार्थी पात्र महिलांना काय लाभ मिळणार आहे आणि अर्ज करण्याची पद्धत तसेच योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे. अशा सर्व महत्वाच्या गोष्टी या लेखमध्ये पुढे उपलब्ध आहे.
Maharashtra Beauty Parlour Anudan Yojana म्हणजे काय?
राज्य सरकार महिलांना सक्षम बनविण्यासाठी नवीन नवीन योजना सुरु करत असतात, मुख्यतः ग्रामीण भागातील महिलांकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील इच्छुक महिलांना ब्युटी पार्लर व्यवसाय करण्यासाठी चांगली संधी आहे. मुख्यमंत्री ब्युटी पार्लर अनुदान योजनेतून ५० हजार रुयांचे अनुदान घेऊन आपले स्वतःचे पार्लर सुरु करू शकता.
ब्युटी पार्लर अनुदान योजनेचा मुख्य उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यातील मुख्यतः ग्रामीण भागातील महिला ज्या ब्युटी पार्लर व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांना अनुदान उपलब्ध करून देणे. या योजनेतून बेरोजगारी कमी होऊन महिलांना रोजगाराच्या संधी मिळतात. तसेच महिलांच्या हातात आर्थिक स्वावलंबन येते आणि त्या आत्मनिर्भर होतात.
अनेक महिलांनी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतले असतात परंतु पैश्याची भांडवल नसल्यामुळे ते त्यांचे स्वतःचे पार्लर सुरु करू शकता नाही त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. परंतु आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. Beauty Parlour Anudan Yojana करीत अर्ज करा आणि तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.
योजनेतील आर्थिक मदत कशी मिळते?
या योजनेखाली महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ५०,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यातील ८५% रक्कम म्हणजेच ४२,५०० रुपये शासन अनुदान म्हणून देते, तर उरलेले १५% म्हणजे ७,५०० रुपये अर्जदाराने स्वतः भरायचे असतात. अशा प्रकारे कमी खर्चात महिलांना स्वतःचा ब्युटी पार्लर किंवा छोटा व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळते.
प्रशिक्षणाची सुविधा
शासन महिलांना फक्त अनुदानच देत नाही तर त्यांना ब्युटी पार्लरचे मोफत किंवा कमी दरात प्रशिक्षणदेखील उपलब्ध करून देते.
- त्वचेची काळजी
- केसांची देखभाल
- मेकअप
- वधू अलंकार मेकअप
- पार्लर मॅनेजमेंट
हे सर्व प्रशिक्षण महिलांना व्यवसाय अधिक यशस्वी करण्यासाठी दिले जाते.
योजनेतून मिळणारे लाभ
ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार कडून ५० हजार रुपयांची मदत मिळते. त्यातील ८५% रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिल्या जाते. गावात राहणाऱ्या महिलांपासून शहरात राहणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. परंतु ग्रामीण भागातील अनुसूचित जमातीच्या महिलांना प्राधान्य दिले जातील. अनुदानाच्या रकमेतून पार्लरसाठी लागणारे साहित्य, खुर्च्या, आरसे, ड्रायर, फेस पॅक मशीन इत्यादी खरेदी करण्यासाठी वापरता येते.
Beauty Parlour Anudan Yojana पात्रता
Beauty Parlour Anudan Yojana करीता राज्य सरकारने काही पात्रता निकष जाहीर केल्या आहे त्यानुसार लाभार्थी पात्र ठरवल्या जाणार आहे. सर्वप्रथम महिला हि महाराष्ट्र राज्याची स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय किमान १८ वर्षांपेक्षा जास्त आणि ५५ वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. अर्जदार महिलेने ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण घेतलेले असावे. या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य दिले जातील.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जाचा फॉर्म
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- बेरोजगारी प्रमाणपत्र
- बँक पासबुकची प्रत
- पासपोर्ट साईज फोटो
- प्रशिक्षण प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा?
आदिवासी विकास विभागाकडून हि योजना राबवण्यात येत असल्यामुळे तुम्हाला अर्ज हा आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइट (nbtribal.in) वर जाऊन करावा लागतो. सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाइट वर गेल्यावर “अर्जदाराची नोंदणी” हा पर्याय निवडाचा आहे. त्यानंतर अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. त्या फॉर्ममध्ये आवश्यक सर्व माहिती नीट भरून शेवटी “Submit Form” या बटणावर क्लिक करा.
एवढे केल्यानंतर तुम्ही वेबसाइट वर पंजीकृत व्हाल आता तुम्हाला “अर्जदाराचे लॉगिन” हा पर्याय निवडाचा आहे आणि तुमचा युसर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. लॉगिन झाल्यावर तुमचे डॅशबोर्ड उघडेल. येथे तुम्हाला “ब्युटी पार्लर अनुदान योजना” हा पर्याय निवडाचा आहे, यानंतर Beauty Parlour Anudan Yojana Form उघडेल फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती नीट भरा.
माहिती भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला पावती मिळेल त्या पावतीची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.
निष्कर्ष
Beauty Parlour Anudan Yojana Maharashtra 2025 ही महिलांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कमी खर्चात आणि शासनाच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा मार्ग या योजनेतून मोकळा होतो. आज अनेक महिला या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी झालेल्या आहेत. जर तुम्ही सुद्धा बेरोजगार आहात, ब्युटी पार्लर सुरु करण्याची इच्छा आहे, तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते.
FAQ
1) या योजनेत किती आर्थिक सहाय्य मिळते?
या योजनेत महिलांना एकूण ५०,००० रुपयांचे सहाय्य मिळते. त्यातील ४२,५०० रुपये शासन देते आणि ७,५०० रुपये अर्जदाराने स्वतः भरावे लागतात.
2) प्रशिक्षण आवश्यक आहे का?
होय, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य मिळते. तरीही प्रशिक्षण नसल्यासही अर्ज करता येतो आणि शासन प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देते.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!