Berojgari Bhatta Yojana ग्रामीण भागातील कामगारांना रोजगार नाही तर द्यावा लागेल बेरोजगारी भत्ता, बघा योजनेची संपूर्ण माहिती

Berojgari Bhatta Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Berojgari Bhatta Yojana: तुमच्या गावात सुद्धा बेरोजगार तरुण आहेत का? त्यांना रोजगाराची आवश्यकता असून सुद्धा तुमची ग्रामपंचायत रोजगार उपलब्ध करून देत नाही आहे? तर काळजी करू नका. कारण ज्यांना कामाची गरज आहे आणि ग्रामपंचायत रोजगार उपलब्ध करून देत नाही आहे. तर आता शासनानाला बेरोजगारी भत्ता द्यावा लागणार आहे. ते कसा तर चला जाणून घेऊया योजनेची संपूर्ण माहिती.

Also Read: राज्यातील बेरोजगार मुलांना मिळणार रोजगाराची नवीन संधी। एवढा मिळणार पगार: Ladka Bhau Yojana 2025

Berojgari Bhatta Yojana म्हणजे काय?

सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी भत्ता या नावाची कुठलीही योजनाला सुरु नसली तरी मात्र केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पात्र कामगारांना बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर जॉब कार्ड धारकांना 15 दिवसाच्या आत रोजगार निर्मिती करून देणे हि तुमच्या गावातील ग्रामपानाचायतीची जबाबदारी असते. जर ते तुम्हाला ठराविक कालावधीत रोजगार देऊ शकले नाहीत तर तुम्हाला रोजंदारीपणानेच बेरोजगारी भत्ता देणे बंधनकारक असते.

रोजगार हमी योजना काय आहे?

“रोजगार हमी योजना” यामध्ये कामाची हमी देणारी योजना आहे हे स्पष्ट होते. या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील परिवारातील सदस्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी साहयाने हि योजना सुरु केली होती. जेणेकरून गरिबांच्या घरची चूल जळेल आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून वर्षभरातून किमान 100 दिवस रोजगार दिला जातो.

बेरोजगारी भत्ता कसा मिळवायचा?

मित्रांनो तुम्ही गावामध्ये राहता तेथील ग्रामपंचायत मध्ये मध्ये रोज़गार हमी योजनेचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा असतो. त्यानंतर ग्रामपंचायतींमार्फतच जॉब कार्ड दिल जाते. अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत जर ग्रामपंचायतीने रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर तेवढ्या दिवस रोजगार मिळाला नाही तेवढ्या दिवसाच्या रोजगाराच्या रकमेचा बेरोजगारी भत्ता हा अर्जदारांना द्यावा लागतो. यासाठी तुम्ही तुमच्या पंचायत समिती कार्यालयामधी गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार करणे आवश्यक असणार आहे.

निष्कर्ष

मित्रानो तुम्ही जर गरमीने भागाचे रहिवासी असाल आणि तुमच्या कडे रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा Berojgari Bhatta Yojana चा लाभ आपण सांगितल्या प्रमाणे घेता येतो. या विषयी अधीक माहिती हवी असेल तर तुमच्या ग्रामपंचायत सचिवांशी संपर्क करावा, धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *