Bhandi Yojana: “ज्या घरातून भांड्यांचा आवाज येत नाही ते कसले घर” अशा प्रकारची एक जुनी मन होती. कारण घर म्हंटले कि त्या घरात भाडे असायलाच हवे. तेव्हाच घराला एकप्रकारे शोभा येते. महिलांच्या जीवनात तर भांड्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. जुन्या काळामध्ये मात्र भांडे मातीची असायची, परंतु ज्या मूलभूत गरज होत्या त्या सर्वच पूर्ण होत होत्या.
आत्ता नवीन नवीन स्टील चे भांडे निघालेत मात्र त्यांचे भाव एवढे कि गरीब परीवाल खिशाला वजनच झेपावे. त्यात जर का कुटुंब कामगारांचे गरीब असेल तर मात्र भांड्याचा विषयीच येत नव्हता. जे भेटलं त्यामध्ये आपला खाण्याचं पिण्याचं बनवलं आणि झालं. ज्यामुळे महिलांना स्वयंपाकाचं मोठा त्रास होत होता.
\वरून जर का पाऊस सुरु असला तर घरातील वस्तू आणि स्वयंपाक बनवण्यासाठी नुसती पळापळ होत होती. म्हणून हीच बाब लक्षात घेत महिलांच्या कठीण अवस्थेचा विचार करून सरकारने Bhandi Yojana राबविण्यास सुरुवात केली आहे. हि भांडी योजना कोणासाठी आहे, कोण पात्र असेल, कागदपत्रे काय लागतील आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढीलप्रमाणे मिळणार.
Bhandi Yojana म्हणजे काय?
राज्यातील खास काही महिलांसाठीच सुरु करण्यात आलेली Bhandi Yojana आहे. जी २०२० पासून फक्त बांधकाम कामगार असलेल्या परिवाराकरता राबविण्यात येत असते. बांधकाम कामगारांचे जीवन हे त्यांच्या हातावर चालत असते. त्यामुळे कुठलाही खर्च त्यांना झेपावत नाही. म्हणून शासनाने त्यांच्या मुलांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सारख्या योजना राबविणे शिक्षासाठी सुद्धा मदत केली आहे. घरातील खर्च कमी होण्यासाठीसुध्द शासन Bhandi Yojana बांधकाम कामगार कल्याण मंडळ मार्फत राबवत आहे.
भांडी योजनेची पात्रता
- नोंदणीकृत बांधकाम कामगार
- इमारत बांधकाम बांधकाम कामगार
- कामगाराने कामाच्या ठिकाणे किमान नव्वद दिवस तरी काम केले असावे.
- १८ ते ६० वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत
- वार्षिक उत्पादन १ लाखापेक्षा कमी असावे.
मिळणार ३० भांड्यांचा संच
ताट-४ ,वाट्या ८, ग्लास ४, झाकणासहित पातेले ३,मोठे चमचे २, दोन लिटरचा जग १, मसाल्याचा डब्बा १, झाकणासहित डब्बे ३, परत १, प्रेशर कुकर १, कढई १, मोठी स्टील टाकी १ इत्यादी एकूण ३० भांड्यांचा संच हा कामगार महिलांना मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवासी दाखला
- कामगार आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
- ९० दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र
भांडी योजनाचा असा करा अर्ज
Bhandi Yojana चा लाभ घेण्याकरता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम iwbms.mahabocw.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे तुमचा आधारकडं आणि मोबाईल नम्बर टाकायचा आहे. नंतर OTP च्या माध्यमातून साइन इन करा आणि होम पेज ला जा.
तिथे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन असा पर्याय दिसेल तिथं तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. लक्षात घ्या रजिस्ट्रेशन नंतर ६ महिन्यांनी तुम्ही भांडी योजनेसाठी अर्ज करू शकता. परंतु जर तुमची आधीच नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली असेल तर तुम्ही या Bhandi Yojana या पर्यायावर क्लिक करू शकता. तुमच्यापुढे एक अर्ज येईल त्यामध्ये तुमच्या विषयी, परिवाराची माहिती जी नोंदवलेली होती तेच भरावी लागेल. नंतर काही कागदपत्र उपलोड करून भांडी योजनांचा अर्ज सबमिट करा.
निष्कर्ष
आर्टिकल मध्ये बघितलेली संपूर्ण माहिती वाचली असेल हीच आशा. कामगार महिलांना भांडी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण सांगितलेली सर्व माहिती हि इंटर्नच्या माध्यमातून मिळवलेली आहे. हि कि एकदम सोप्या भाषेकडे तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.