BMC Bharti 2025: बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये शासकीय नोकरी तेही बिना परीक्षा तुम्हालासुद्धा मिळू शकणार आहे. महाराष्ट्रातील लाखो तरुण/ तरुणी ह्या सरकारी नोकरीच्या शोधात असतात आणि रात्रंदिवस अभ्यासाचा करत असतात. त्यांच्यासाठी आता आपण मोठी खुशखबर घेऊन आलो आहे. बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये 401 जागांची वॅकन्सी निघाली असून या पदांकरता कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही. तसेच दहावी उत्तीर्ण उमेदवार सुद्धा या नोकरीकरिता अर्ज करू शकणार आहे. जर तुमची या नोकरीकरिता निवड झाली तर 18000 पासून ते 200000 पर्यंत वेतन मिळू शकणार आहात. आता BMC Bharti 2025 साठी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे ते पुढे जाणून घेऊया.
BMC Bharti 2025 मधील पद
- कार्यकारी सहायक
- नोंदणी सहायक
- डेटा एंट्री ऑपरेटर
- अधिपरिचारिका
- शास्त्रक्रियागार सहायक
- कक्ष सहायक
- कनिष्ठ सहायक वैद्यकीय अधिकारी
- कनिष्ठ भौतिक उपचार तज्ज्ञ
- तंत्रज्ञ
- समाज विकास अधिकारी
- औषधनिर्माता
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- क्ष-किरण सहायक
- दूरध्वनी चालक
- क्ष- किरण तंत्रज्ञ
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- ऑर्थो तंत्रज्ञ
मिळणारे वेतन
वेगकल्या वेगळ्या पोस्ट नुसार वेतन श्रेणी असणार आहे. पात्र उमेदवाराला 18000 हजार रुपयापासून ते 200000 लाख रुपयांपर्यंतचे आकर्षक वेतन मिळू शकणार आहे. तसेच जे शासकीय कर्मचाऱ्याला इतर सुविधा असतात, जसे महागाई भत्ता, पगार वाढ, वेतन आयोग आणि पेन्शन सारख्या सर्व सुविधा इथे सुद्धा लागू होतील.
वयोमर्यादा
वरील सर्व जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 पेक्षा कमी आणि पेक्षा जास्त 38 असू नये.
निवडीचे निकष आणि कार्यपद्धती
आपण सांगितल्याप्रमाणे हि भरती पूर्णपणे बिना लिखित परीक्षेची होणार आहे. त्यामुळे वरील सर्व पदांसाठी तुम्हाला फक्त एक मुलाखत द्यावी लागेल. मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर तुमचं संबंधित पदासाठी नियुक्ती केली जाईल. हि निवड यादी बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येणार आहे.
BMC Bharti 2025 साठीची शैक्षणिक पात्रता
सर्व पोस्ट साठी पोस्ट नुसार वेगळी वेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे. त्याची संपूर्ण माहिती तुमची अधिकृत साईट वर जाऊन घेऊ शकता. परंतु या पदांसाठी किमान दहावी उत्तीर्ण आसने बंधनकारक आहे आणि ते सुद्धा 100 गुंणाच्या मराठी आणि इंग्रजी विषयांमध्ये.
अर्ज प्रक्रिया
BMC Bharti 2025 करता तुम्हाला अर्ज हे ऑफलाईन पद्धतीनेच करावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्हाला बा.य.ल नायर धर्मा रुग्णालय आणि टो. रा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जाऊन संबंधित पदाकरिता अर्ज करता येईल. हे अर्ज विद्यालयातील महसूल विभागाकडे आवक जावक मध्ये अर्ज सादर करायचा आहे. महत्वाचे म्हणजे उमेदवाराने स्वतः जाऊन अर्ज करावा लागेल. पोस्टाने किंवा इतर कुठल्याहि मार्गाने अर्ज केला असल्यास त्या अर्जाचा वॆचा केला जाणार नाही.
अर्जाची फी
मित्रांनो, BMC Bharti 2025 साथींच्या अर्जाची फी हि 933 रुपये असणार. जे कि संबंधित ठिकाणी अर्ज सदर करते वेळी तुम्हाला भरावी लागेल आणि अर्ज सबमिट झाल्याची पावती घ्यावी लागेल.
निष्कर्ष
रात्रं दिवस सरकारी नोकरीसाठी अभ्यास करत असणाऱ्या आणि एक-एक मार्काने परीक्षेत अपात्र होत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिअसाह्य चांगली संद्धी आहे. कारण बिना परिक्षा फक्त मुलाखतीवर शासकीय नोकरी करण्याची संधी इथे मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून सुवर्ण संधीचं फायदा घ्या, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.