BSF Recruitment 2025: सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी 1121 जागांची आली जाहिरात

BSF Recruitment 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

BSF Recruitment 2025: सुरक्षा दलातील सर्वात महत्वाचे दल सीमा सुरक्ष दलाला मानले जाते. आज कोट्यवधी विद्यार्थ्यांचे स्वपन हे देशसेवा करण्याचे आहे आणि त्यासाठी ते तेव्हडी मेहनत सुद्धा घेत आहे. जेव्हा पासून इंडियन आर्मी मध्ये अग्नीवर भरती सुरु झाली तेव्हापासून मात्र बरेच सळसळत्या रक्तचे नवयुवक हे नाराज झालेले आपल्याला दिसतात. परंतु जर तुम्हाला देशसेवा करण्यासाठी आणि देशाच्या सरहद्दीवर संरक्षण करण्यासाठी जायचे असेल परंतु अजूनपर्यंत संधी मिळाली नसेल, तर आता हि BSF Recruitment 2025 आलेली आहे. त्यामार्फत तुम्ही तुमचे स्वपन आणि तुमच्या परिवाराचे सुद्धा देशसेवेचे आणि चांगल्या प्रतिष्टेच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकता.

Also Read: BMC Bharti 2025: बृहमुंबई महानगरपालिकेत परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी

सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जागेचे विश्लेषण

BSF जवान अर्थातच हेडकॉन्स्टेबलसाठीच्या जागांसाठी निघालेली हि जाहिरात आहे. या अधिकृत जाहिरातीनुसार एकूण 1121 जागांसाठी हि भरती होणार असून या मध्ये एकूण दोन पदे दिलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि दुसरे पद हे हेड कॉन्स्टेबल ( रेडिओ मेकॅनिक) करता असणार आहे. या पाडण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता

या जाहिरातीनुसार BSF च्या हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) करता अर्ज करणारा उमेदवाराने किमान 60% गुणांसह बारावीची परिक्ष उत्तीर्ण केलेली असावी आणि बारावी मध्ये भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,गणित हे तीन विषय असायला हवे. हि पात्रता नसेल तर उमेदवार आयटीआय (रेडिओ आणि टेलिव्हिजन/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / संगणक ऑपरेटर / प्रोग्रामिंग असिस्टंट/देता सज्जता आणि संगणक सॉप्टवेअर/ इलेकट्रोनिक अभियांत्रिकी/ देटा एन्ट्री ऑपरेटर) या अहर्तेपैकी कुठलाही एका फिल्ड मध्ये बसावा .

तसेचजे दुसरे हेड कॉन्स्टेबल ( रेडिओ मेकॅनिक) चे पद आहे, त्यासाठी सुद्धा उमेदवार हा इयत्ता बारावीमध्ये किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये त्याचे भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,गणित हे तीन विषय असणे बंधनकारक राहील. यामध्ये बसत नसेल तर अर्जदाराचे आयटीआय मध्ये (रेडिओ आणि टेलिव्हिजन/ जनरल इलेकट्रोनिक्स / संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट/डेटा सज्जात आणि संगणक सॉप्टवेअर किंवा इलेकंट्रीशन/ फिटर किंवा माहिती तंत्रज्ञान आणि इलेकट्रोनिक सिस्टम देखभाल/ संगणक हार्डवेअर/ नेटवर्क तंत्रज्ञ किंवा मेकॅट्रॉनिक्स/ देता एन्ट्री ऑपरेटर) यांपकी अहर्ता धारक असावा.

शारीरिक पात्रता

सीमा सुरक्षा दलात (BSF) भरती होण्याकरता पुरुष उमेदवाराची उंची हि किमान 165 सेमी असावी आणि छाती हि किमान 75 सेमी व फुगून छाती 5 सेमी जास्त भरणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवार जर महिला असेल तर त्यांच्यासाठी किमान उंची हि 155 सेमी ठेवण्यात आली आहे.

अर्जाची फी

आर्थिकदृष्ट्या मागास/ खुल्या प्रवर्गातील/ इतर मागास घटकातील अर्जदारास BSF Recruitment 2025 नुसार फक्त 100 रुपयेच फी भरायची आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील अर्जदारास परीक्षा शुल्कात माफीची सवलत देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची तारीख

  • अर्जाची सुरुवात: 24 आगस्ट 2025
  • शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2025

निष्कर्ष

केंद्र सरकारमध्ये राहून देशसेवा करण्याची मोठी संधी आहे. तसेच या नोकरीमध्ये जर जॉइनिंग झाली तर वेतन सुद्धा चांगलेच मिळणार आहे. आज आपण या आर्टिकल च्या माध्यमातून या नव्या भरतीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हेड कॉन्स्टेबल BSF मध्ये बनायचे असेल किंवा मनात काही शंका असेल तर तुम्ही ectt.bsf.gov.in या अधिकृत साईटला नक्की भेट देऊ शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *