Canara Bank Securities Bharti 2025: मित्रांनो कॅनरा बँकेने नुकतीच नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडने त्यांच्या विविध केंद्रांवर प्रशिक्षणार्थी (विक्री व विपणन) पदांच्या रिक्त जागांसाठी हि भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संदर्भात सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
तुम्ही सुद्धा नोकरी च्या शोधात आहेत का, बँकमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत का, जर तुमचे उत्तर हो असेल तर हि माहिती एकदा नक्की वाचा. या नोकरी साठी मासिक वेतन सुद्धा चांगले दिले जात आहे.
🔶 Gov Job News: राज्यात 15 सप्टेंबर 2025 पासून सुरु होणार 10 हजार जागांची परीक्षा बिना सरकारी भरती.
🔔Canara Bank Securities Bharti 2025 महत्त्वाची माहिती
- पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (विक्री व विपणन)
- मासिक मानधन : रु. 22,000/- स्टायपेंड + रु. 2000 परिवर्तनीय वेतन
- भरतीचा प्रकार : प्रशिक्षणार्थी म्हणून 1 ते 2 वर्षांसाठी
- नोकरी ठिकाण : ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे
- अर्ज पद्धती : ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील
- अर्जाची अंतिम तारीख : 06 ऑक्टोबर 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता
जनरल मॅनेजर, एचआर विभाग,
कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड,
७ वा मजला, मेकर चेंबर IIII,
नरिमन पॉइंट, मुंबई – 400021
📋 शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक अटी
- कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि कमीतकमी ५०% गुण असणे आवश्यक आहे.
- मार्केटिंग व सेल्सचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार.
- या भरतीसाठी फ्रेशर्ससुद्धा अर्ज करू शकतात.
- संगणक प्रवीणता आवश्यक आहे.
- उमेदवाराचे वय किमान २० ते ३० वर्षे असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये केलेली नियुक्ती कायमची नोकरी नाही, त्यामुळे कंपनीविरुद्ध कोणताही दावा करता येणार नाही.
⚠️ महत्वाच्या सूचना
- अर्जदारांनी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
- भरती संदर्भात गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडची नाही.
- पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.canmoney.in वरून अर्ज सादर करावा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!