फुलंब्री येथे बुधवारी (ता. १७) ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरीय अभियानाचे’ उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, माजी खासदार रावसाहेब दानवे, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
एक कोटी महिलांना ‘लखपती’ बनविण्याचा सरकारचा निर्धार
राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत एक कोटी महिलांना ‘लखपती’ बनविण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ठेवण्यात आले आहे. यासाठी महिलांना रोजगार, उद्योजकता आणि आर्थिक सबलीकरणाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ग्रामविकास मंत्रींचे आश्वासन
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, जोपर्यंत हे अभियान सुरू आहे, तोपर्यंत ते घरी जाणार नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली, तर ६५ टक्के लोकांचे प्रश्न सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही महिलांना आर्थिक उन्नतीच्या मार्गावर नेण्याचा आमचा निर्धार आहे.
राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना रोल मॉडेल बनवून स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सुविधा आणि आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने त्यांचे कार्य सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी व महिला बचत गटांसाठी योजना
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून जलसंधारणाच्या कामावर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय, महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप या कार्यक्रमात करण्यात आले.
सहकार क्षेत्राला चालना
सरकारच्या अजेंड्यात सहकार क्षेत्राला बळकटी देण्यावर भर आहे. यासाठी गावपातळीवर पतसंस्था उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यामुळे महिला बचत गट आणि लघुउद्योजकांना भांडवल मिळवणे सोपे होईल.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!