मागील पाच दिवसापासून मुंबई मध्ये आलेले भगवं वादळ हे ओसरला आहे. हो हो.., तेच महाराष्ट्रातील मराठ्यांच्या आरक्षण साठीच मुंबईमधील पूर्ण जगाचे लक्ष खेचून घेणार मराठा अंदोलन. ज्यामुळे जणू देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे भगवी होताना बघितली आहे.
सतत पाच दिवस मराठा नेतृत्व Manoj Jarange यांनी उपोषण केले आणि सरकारला आरक्षण देण्याकरता वेठीस धरले होते. तसे बघितले तर त्यांची एक अट अशी होती, कि त्यावर कधीच समाधान निघेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. मात्र राज्यातील Devendra Fadanavis सरकारने युक्ती सोबत बुद्धी लढवली आणि सर्वांना पटेल असा मार्ग शेती काढलाच.
काल दिनांक 03 सप्टेंबर 2025 ला मराठ्यांच्या मागण्या शासनाने गठीत केलेल्या समितीने पूर्ण मान्य तर नाही केल्या परंतु हैद्राबाद गॅझेट सारखा मोठा तोडका काढला. जो घेऊन स्वतः समितीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील घेऊन गेले होते. शेवटी जरांगे पाटलांनी पाणी पिऊन उपोषण सोडलं आणि सर्व मराठे गावाकडे परतले. परंतु हे सर्व होण्याआधी सतेज वर जे घडलं ते खर्च कौतुक आणि आश्चर्य वाटण्यासारकच घडत होत.
Also Read: Manoj Jarange: मनोज जरांगेंना न्यायालयाचा मोठा धक्का, आंदोलकांना मुंबई बाहेर काढण्याचे दिले आदेश
आरक्षणाचा गुलाल उधळला मात्र फडणवीसांना विसरले नाही
आझाद मैदानावर जे काही झालं ते आपण सर्वांनीच टीव्ही आणि मोबाईलवर बघितलं असेल. जे मराठे हैद्राबाद गॅझेटच्या निकषांमध्ये बसतील त्यांना नक्कीच इत्तर मागास प्रवर्गामधू आरक्षण मिळणार असे पूर्ण पाने स्पष्ट झाले आहे. कारण असा जी- आर काढूनच शासनाचे दुवा बनून राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि इत्तर सदस्य आझाद मैदानावरीळ सतेज वर गेले होते.
जर खर्च जे गरीब आणि आरक्षणास पात्र मराठ्यांना आरक्षण मिळत असेल तर जास्त आळकती घेऊन काहीच फायदा नाही. हि बाब Manoj Jarange यांच्या लक्षात आली आणि त्यांनी उपस्थित सर्व मराठा बांधवांच्या सहमतीने उपोषण मग घेत आंदोलन संपवले. तसेच गुलाल मोठ्या प्रमाणात उधळत जल्लोषही केला.
परंतु या दरम्यान त्यांनी राज्याचे उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांसोबत देवेंद्र फडणवीसांचेही आभार मानले. परतून सर्वांच्या भोवया तर तेव्हा उन्चावाल्या जेव्हा त्यांनी फडणवीस साहेबांनीही उपोषण सोडण्याकरता इतर दोन उपमुख्यमंत्र्यांसह उपस्तित राहावे असे मत मांडले. कारण या आधीच काही दिवसात जरंगे हे मुख्यमंत्रीचा सतत एकेरी उल्लेख करत होते. तसे फडणवीसही मनोज जरांगेविषयी जरा नाराज असल्याचे दिसत होते. मात्र आंदोलनाच्या सतेज वरूनच सरकारच आणि मराठ्यांचं वैर नाहीआणि ते आता पूर्णपणे मिटल्याचंसुद्धा घोषित केलं आहे.
जरांगे पाटील देणार का फडणवीसांना साथ?
पुढील काही दिवसांनीच मुंबई महानगर पालिकेची निवडणूक येऊन टेकली असतांना मनोज जरांगेने फडणवीससोबाबतच वैर संपल्याची घोषणा केली. याचा महायुतीच्या सरकारला मराठ्यांची मतांची आवश्यकता हि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधी पडणार आहे.
अर्थातच महायुतीने एका तीराने दोन्ही निशाण साधले आहे. यात जर जरांगे पाटलांनी जर महायुतीला साथ दिली तर महाविकास आघाडीचं राज्यातून सफाया होयला सुद्धा वेळ लागणार नाही असेच संकेत दिसत आहेत. परंतु अजूनसुद्धा जरांगे पाटील देणार का फडणवीसांना साथ? हा गहण प्रश्न तुमच्या आणि आमच्या सोबतच सर्व सामान्य जनतेच्या मनातही अजून कायमच आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.