Divyang E Rickshaw Yojana Maharashtra 2025: या योजनेतून दिव्यांग व्यक्तींना मिळणार लाखोंचं ई-रिक्शा मोफत

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra 2025: भारत सरकार आणि राज्य शासनाने गेल्या काही वर्षात दिव्यांग नागरिकांसाठी अनेक लाभकारी आणि उपयुक्त योजना राबवल्या आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यातील अपंग नागरिकांसाठी मुख्यमंत्री दिव्यांग ई रिक्षा योजना सुरु केली आहे. या योजनेतून लाभार्थी पात्र अपंग नागरिकांना ई रिक्षा मोफत देण्यात येणार आहे.

राज्यातील दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शारीरिक अडथळ्यांमुळे दिव्यांग नागरिकांना नौकरी मिळवणं किंवा स्वतःचा व्यवसाय करणे कठीण होते. Divyang E Rickshaw Yojana मार्फत ज्यांना हक्क आहे अशा नागरिकांना मोफत किंवा कमी दरात ई-रिक्शा मिळू शकते. या रिक्षाच्या सहाय्याने ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि नियमित उत्पन्न कमवू शकतात. ही योजना दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यास मदत करते.

Kanda Chal Anudan Yojana Maharashtra 2025: कांदा चाळीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान, अर्ज सुरु

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra 2025 ची संपूर्ण माहिती मराठी मध्ये जानून घ्या

दिव्यांग नागरिक हे अनेक प्रकारचे काम करण्यासाठी सक्षम नसतात आणि काही दिव्यांग नागरिकांना नौकरी सुद्धा मिळत नाही. परंतु आजच्या जीवनात जीवन जगण्यासाठी पैसे कमावणे अतिशय आवश्यक आहे. राज्यातील गरीब दिव्यांग नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळावी, म्हणून सरकारने “दिव्यांग ई-रिक्शा योजना” सुरू केली आहे.

या ई रिक्षाचा वापर करून नागरिक आपला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु करू शकतात. तुम्ही सुद्धा योजनेचा लाभ घेण्याचे नियोजन करत असाल तर आधी हि माहिती जाणून घ्या. तर आपण जाणून घेऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि पात्रता काय आहे.

दिव्यांग ई रिक्षा योजना का सुरु झाली?

दिव्यांग नागरिकांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करून उपजीविका चालवता यावी, यासाठी राज्य सरकारने “दिव्यांग ई-रिक्शा योजना महाराष्ट्र” सुरू केली आहे. या योजनेतून लाभार्थी नागरिकांना मोफत ई रिक्षा देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे शासनाचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतून मिळणार ई रिक्षा बॅटरी वर चालतो याला पेट्रोलची आवश्यकता नसते त्यामुळे कमी खर्चात चालणार रिक्षा आहे.

योजनेचे फायदे

या योजनेचा माध्यमातून दिव्यांग नागरिकांना मोफत ई रिक्षा दिला जातो. या ई रिक्षाचा मदतीने ते स्वतः काम करून पैसे कमाऊ शकतात आणि त्यांना कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतात. ई रिक्षा बॅटरी वर चालणारी असल्यामुळे त्यांना या रिक्षाला चालवण्यासाठी जास्त खर्च येत नाही आणि पर्यावरणपूरक असून प्रदूषण कमी करण्यासही मदत होते.

दिव्यांग ई रिक्षा योजनेसाठी कोण पात्र आहे?

योजनेचा लाभ योग्य नागरिकांना मिळावा म्हणून शासनाने योजनेसाठी पात्रता घोषित केली आहे. हि योजना महाराष्ट्रात सुरु असल्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे आणि त्याचं अपंगत्व किमान 40% किंवा त्याहून अधिक असावं. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 55 वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जदार नागरिकाने याआधी सरकारी अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

Bandhkam Kamgar Silai Machine Yojana 2025: आता बांधकाम महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन, असा करा अर्ज

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खात्याचे तपशील

या दिव्यांग नागरिकांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही

राज्यातील ज्या नागरिकांनी मागील वर्षी “महाराष्ट्र दिव्यांग ई-रिक्शा योजना” साठी अर्ज केला होता, पण अजूनही त्यांना लाभ मिळालेला नाही, अशा नागरिकांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

अर्ज कसा करायचा?

Divyang E Rickshaw Yojana Maharashtra यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. register.mshfdc.co.in या अधिकृत वेबसाइट वरून ऑनलाईन अर्ज करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला पोर्टल रजिस्टर करावे लागेल त्यानंतर दिव्यांग ई रिक्षा योजना फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील. त्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल. अशा पद्धतींनी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

निष्कर्ष

Maharashtra Divyang E Rickshaw Yojana ही केवळ वाहन देणारी योजना नाही, तर दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठीची एक मोठी मदत आहे. या योजनेमुळे अनेक जण स्वतःचं आयुष्य सुधारू शकतात. अशी योजना समाजात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्ही सुद्धा योजनेसाठी पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या.

FAQ

1) योजनेचा लाभ एकदाच मिळतो का?

होय, या योजनेच्या अटींनुसार एक व्यक्ती फक्त एकदाच “दिव्यांग ई-रिक्शा योजना”चा लाभ घेऊ शकतो. योजनेचा लाभ पुन्हा मिळवण्यासाठी परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अर्ज करताना सर्व कागदपत्रे आणि अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.

2) वाहन चालवण्याचा परवाना नसला तरी चालेल का?

नाही. परवाना आवश्यक आहे. पण शासनाकडून प्रशिक्षण व परवाना मिळवण्यासाठी मदत केली जाते.

3) ही ई-रिक्शा विकता येते का?

नाही, परंतु जर तुम्हाला अनुदानावर मिळालेली ई-रिक्शा असेल तर काही कालावधीपर्यंत विकता येत नाही. शासनाच्या अटी व नियमांनुसारच ती वापरणं आवश्यक असतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *