Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2025: या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना मिळणार ₹60,000 पर्यंत आर्थिक मदत थेट बँक खात्यात

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यातील उच्च शिक्षण घेणयासाठी इच्छुक विद्यार्थी मित्रांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana सुरु केली आहे. या योजनेतून लाभार्थी पात्र विद्यार्थ्यांना ₹60,000 पर्यंत आर्थिक मदत केली जाते. हि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आहे. चला तर या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ कोणाला मिळणार तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया व अन्य माहिती जाणून घेऊ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून गरीब विद्यार्थ्यांसाठी ₹51,000 मोठी शिष्यवृत्ती मदत | Swadhar Yojana

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana म्हणजे काय?

उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी मित्र तसेच आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक उत्तम योजना सुरू केली आहे. या योजनेतून इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते.

योजनेतून अशा विद्यार्थ्यांना मदत दिली जाते ज्यांना सरकारी किंवा खासगी वसतिगृहात (Hostel) प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या राहण्याचा, जेवणाचा आणि इतर शैक्षणिक खर्चाचा काही भाग सरकारकडून दिला जातो. शहरी भागातील विद्यार्थ्यांना वार्षिक ₹60,000 पर्यंत, आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वार्षिक ₹50,000 पर्यंत आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते.

पात्रता निकष

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा आणि तो OBC, VJNT किंवा SBC या प्रवर्गांपैकी एकात येणारा असावा. विद्यार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, कला, विज्ञान किंवा वाणिज्य अशा मान्यताप्राप्त उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात शिकत असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय किंवा खासगी वसतिगृहात प्रवेश घेतलेला नसावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. याशिवाय, विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असावे आणि त्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.

Aadhar Card Download: फक्त 2 मिनिटात करा मोबाईल वरून तुमचे आधार कार्ड डाउनलोड। हि आहे संपूर्ण प्रोसेस

आर्थिक लाभ

खर्चाचा प्रकारशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठीग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी
निवास (राहण्याचा खर्च)₹2,400 प्रति महिना₹1,500 प्रति महिना
भोजन (जेवणाचा खर्च)₹2,000 प्रति महिना₹1,200 प्रति महिना
निर्वाह भत्ता (इतर खर्च)₹1,200 प्रति महिना₹600 प्रति महिना
वार्षिक एकूण मदत₹60,000 पर्यंत₹50,000 पर्यंत

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • बँक पासबुकची प्रत
  • बोनाफाईड प्रमाणपत्र (कॉलेजकडून)
  • मागील वर्षाचे गुणपत्रक
  • रहिवासी दाखला (Domicile Certificate)
  • शाळा सोडल्याचा दाखला (TC)

अर्ज प्रक्रिया (Online Application Process)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. सर्वप्रथम, अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in ला भेट द्या आणि “New Applicant Registration” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर टाकून नवीन खाते तयार करा. नोंदणी प्रक्रियेसाठी येणारा OTP भरून नोंदणी पूर्ण करा.

त्यानंतर युजरनेम व पासवर्ड वापरून पोर्टलवर लॉगिन करा आणि “Complete Profile” विभागात तुमची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा. बँक खाते आधारशी लिंक केलेले असल्याची खात्री करा, कारण मदत थेट त्या खात्यात जमा केली जाते. नंतर “Schemes – Social Justice and Special Assistance Department” या विभागात जा आणि “Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana” हा पर्याय निवडा.

आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर मिळालेला अर्ज क्रमांक नोंदवून ठेवा, ज्याद्वारे तुम्ही नंतर अर्जाची स्थिती तपासू शकता.

संपर्क आणि हेल्पलाइन

प्रकारमाहिती
अधिकृत वेबसाइटMahadbt Portal
हेल्पलाइन नंबर📞 022-49150800
ईमेल आयडी✉️ info.mahait@mahait.org
मुख्यमंत्री हेल्पलाइन☎️ 1800 120 8040 (टोल फ्री)

निष्कर्ष

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana विद्यार्थ्यांसाठी अतिशय लाभदायक योजना आहे. या योजनेतून मिळणारी आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खूप मदत करते. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करून योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *