E Shram Card 3000 Pension हि योजना केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरु केली आहे. या योजनेत नोंदणी केल्यावर कामगारांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ई-श्रम कार्डधारकांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते. महाराष्ट्रातील हजारो असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.
वयाच्या 60 वर्षांनंतर काम करणे अवघड होते त्यामुळे गरीब कुटुंबातील नागरिकांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागतात. परंतु आता शासनाच्या या निर्णयामुळे सर्व लाभार्थी पात्रांना ३००० रुपये आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी मिळणार आहे.
E Shram Card 3000 Pension काय आहे?
असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार म्हणजे की बांधकाम कामगार, शेतीमजूर, रिक्शा चालवणारे, घरकाम करणारे किंवा छोटे व्यवसाय करणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना वयानुसार दर महिन्याला 55 ते 200 रुपये आपल्या खात्यात जमा करावे लागतात. त्याच रकमेची भर घालून सरकारही त्यांच्या खात्यात पैसे टाकते. अशा प्रकारे 60 वर्षांनंतर कामगाराला दरमहा 3000 रुपयांची आजीवन पेन्शन मिळते. जर कामगाराचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी किंवा पती यांना या पेन्शनपैकी 50 टक्के रक्कम मिळत राहते.
ई-श्रम कार्ड म्हणजे काय?
ई-श्रम कार्ड हे केंद्र सरकारने सुरू केलेले एक ओळखपत्र आहे. या कार्डमध्ये कामगाराची संपूर्ण माहिती जसे नाव, पत्ता, व्यवसाय, वय, कुटुंब, आधार क्रमांक, बँक खाते इत्यादी उपलब्ध असते. हे कार्ड बनवल्यावर कामगार राष्ट्रीय डेटाबेस मध्ये नोंदला जातो आणि त्या कार्ड धारकाला विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो.
E Shram Card 3000 Pension साठी पात्रता
हि योजना केंद्र सरकार कडून राबवण्यात येत असल्यामुळे संपूर्ण भारतात हि योजना सुरु आहे. अर्जदार भारताचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे तसे त्याचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदार असंघटित क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
- बांधकाम मजूर
- रस्त्यावरील विक्रेते
- दिवसेवार मजूर
- घरकामगार
- कृषी मजूर
- रिक्षा चालक
- हातगाडी चालवणारे
- केशकर्तन करणारे
- कपडे धुण्याचे काम करणारे
अर्ज कसा करावा?
अर्जदाराने नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल (eshram.gov.in) वर किंवा जवळच्या CSC केंद्रावर जावे लागते. नोंदणी करताना त्याच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर अर्जदाराला एक खास ई-श्रम कार्ड क्रमांक (UAN) मिळतो. त्यानंतर तो प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM-SYM) पेन्शन योजनेत सामील होऊ शकतो. या योजनेत दर महिन्याचा हप्ता अर्जदाराच्या बँक खात्यातून आपोआप वळता होतो, त्यामुळे वेगळे पैसे भरण्याची कटकट राहत नाही.
योजनेचे फायदे
वयाच्या 60 वर्षांनंतर कामगाराला दरमहा 3000 रुपयांची पेन्शन मिळते. जर अपघातात कामगाराचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचा विमा लाभ मिळतो. कामगार अपंग झाल्यास त्याला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभही मिळतो. त्यामुळे वृद्धापकाळात कामगाराला आर्थिक आधार मिळून तो निर्धास्तपणे जीवन जगू शकतो.
निष्कर्ष
E Shram Card 3000 Pension महाराष्ट्रातील असंघटित कामगारांसाठी मोठा दिलासा आहे. थोडीफार रक्कम दर महिन्याला जमा करून कामगार आपल्या भविष्याची सुरक्षितता करू शकतो. तुम्ही सुद्धा लाभार्थी पात्र असाल तर आजच योजनेसाठी अर्ज करा.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!