ई श्रम कार्ड धारकांना वृद्धावस्थेत आर्थिक आधार मिळावा म्हणून सरकारने E Shram Card Pension Yojana 2025 सुरु केली आहे. या योजनेतून लाभार्थी पात्र नागरिकांना ₹3000 रुपये मासिक पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. नवीन अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
E Shram Card Pension Yojana 2025 मुख्य उद्देश
असंघटित क्षेत्रात काम करणारे लाखो कामगारांसाठी केंद्र सरकार कडून हि योजना राबवण्यात येत आहे. दिहाडी मजूर, रिक्षाचालक, घरकाम करणारे कामगार, छोटे दुकानदार, शेतमजूर यांसारख्या असंघटित क्षेत्रातील लाखो नागरिकांना नियमित पगार, पीएफ किंवा पेंशनची सुविधा नसते. वृद्धावस्थेत त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अश्या सर्व समस्या लक्षात घेऊन सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले असून योजनेत नोंदणी केलेल्या मजुरांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेंशन योजना अंतर्गत पेंशन मिळणार आहे.
फक्त ₹50,000 वार्षिक बचत करून मुलीला मिळू शकतात तब्बल ₹23 लाख | Sukanya Samriddhi Yojana
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेची मुख्य वैशिष्ट्ये
- मासिक पेंशन: 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ₹3000 पेंशन.
- सरकारी सहयोग: मजूर जितका हप्ता भरेल, तितकाच हप्ता सरकारकडून जमा केला जाईल.
- पत्नीसाठी सुविधा: लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर जीवनसाथीला पेंशन रकमेच्या 50% मिळणार.
- फ्री नोंदण: ई-श्रम पोर्टलवर नोंदणी पूर्णपणे मोफत.
- ऑनलाइन अर्ज: पेंशन योजनेचे फॉर्म आता ऑनलाइन भरता येतील.
आवश्यक कागदपत्रे
- ई-श्रम कार्ड
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार लिंक मोबाइल नंबर
योजनेचे फायदे
ई श्रम कार्ड धारकांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना वृद्धव्यस्थेत प्रत्येक महिन्याला 3000 रुपये पेन्शन राशी मिळणार आहे. लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला पेंशन रकमेपैकी 50% रक्कम मिळत राहील. नियमित हप्ता भरल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळते. या योजनेची नोंदणी पूर्णपणे मोफत असून अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता
- अर्जदार भारताचा नागरिक असावा.
- वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
- अर्जदार असंघटित क्षेत्रात काम करणारा असावा.
- ई-श्रम कार्ड असणे आवश्यक.
- मासिक उत्पन्न ₹15,000 पेक्षा कमी असावे.
- अर्जदार इतर कोणत्याही पेंशन योजनेचा (EPFO, NPS, ESIC) सदस्य नसावा.
अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन पद्धत
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ई-श्रम पोर्टल वर जावे लागेल.
- तेथे “पेंशन योजना” पर्यायावर क्लिक करा.
- ई-श्रम कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर टाका.
- ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन करा.
- अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- सबमिट केल्यावर नोंदणी पूर्ण होईल.
ऑफलाइन पद्धत
ज्यांना ऑनलाइन अर्ज करणे अवघड वाटत असेल ते CSC सेंटर, लेबर ऑफिस किंवा ई-श्रम सहाय्य केंद्र येथे जाऊन फॉर्म भरू शकतात.
निष्कर्ष
E Shram Card Pension Yojana देशातील लाखो मजूर वर्गातील नागरिकांसाठी दिलासा देणारी योजना आहे. वयाच्या ६० वर्ष नंतर मजुरी करणे शक्य नाही त्यामुळे सरकार तुम्हाला महिन्याला 3000 रुपये अर्थी मदत करते. जर आपण असंघटित क्षेत्रात काम करत असाल आणि आपल्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर आजच या योजनेसाठी अर्ज करा आणि आपल्या वृद्धावस्थेचा आर्थिक आधार सुरक्षित करा.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!