Electric Tractor Subsidy 2025: महाराष्ट्र राज्यात खास शेतकऱ्यांसाठी शासनाने 30 जून 2025 रोजी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर योजना ची घोषणा केली. या योजने अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये चे अनुदान दिले जाते.
आजचा युगात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करणे सोपी झाले आहे आणि शेती अधिक सुलभ व कमी खर्चात केली जाऊ शकते. पेट्रोल व डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरामुळे शेती करतांना शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर योजनेची सुरुवात केली आहे.
Electric Tractor Subsidy ही योजना शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देऊन त्यांना प्रदूषणमुक्त शेती करण्याचा मार्ग देण्याचा प्रयत्न करते. या लेख चा माध्यमातून आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जसे योजनेचा उद्देश, लाभ, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, अनुदान रक्कम व अधिक माहिती.
Kadba Kutti Machine Yojana 2025: शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी मशीन
Electric Tractor Subsidy 2025 | इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अनुदान काय आहे?
महाराष्ट्र राज्य सरकार ने राज्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक व पर्यावरणपूरक शेतीसाठी सुरू केलेली Maharashtra Electric Tractor Subsidy Yojana आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 1.5 लाख रुपये चे अनुदान दिल्या जाते.
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर डिझेल ऐवजी बॅटरीवर चालतात आणि त्यामुळे डिझेल चा खर्च शून्यावर येतो. या शिवाय इलेक्ट्रिक ट्रॅक्टर प्रदूषणही करत नाहीत, त्यामुळे पर्यावरण पण सुरक्षित राहते.
इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे फायदे
- इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चे काय फायदे आपल्याला मिळू शकते या बाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.
- डिझेल ट्रॅक्टर चा तुलनेत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चालवण्याचा खर्च 70% ते 80% कमी असतो.
- या ट्रॅक्टरमुळे प्रदूषण होत नाही.
- चार्जिंग साठी घरच्या विद्युत चा वापर केला जाऊ शकतो.
- एकदा चार्जे केल्या वर 6 ते 8 तास चालू शकतो.
- शेतीतील दैनंदिन कामासाठी उपयुक्त आहे.
- या ट्रॅक्टर ला महिला किंवा वृद्ध व्यक्ती सुद्धा सहज पणे चालवू शकतात.
- डिझेल ट्रॅक्टर चा तुलनेत या ट्रॅक्टर मध्ये वैशिष्ट्ये पण भरपूर असतात.
Electric Tractor Subsidy चा मुख्य उद्देश
महाराष्ट्र सरकारने हि योजना मुख्यतः शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे. डिझेल ट्रॅक्टर महाग असून ते शेतकऱ्यांना महागात पडत असल्याने शासनाने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वर अनुदान उपलब्ध करून हि योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने मुळे शेतकऱ्यांनाच इंधन खर्च कमी होईल तसेच लहान व माध्यम वर्गीय शेतकऱ्यांना स्वतःचा ट्रॅक्टर घेण्यासाठी मदत होईल.
पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराकडे शेतीचा वैध 7/12 उतारा असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाचा दरम्यान असावेत.
- यापूर्वी अर्जदाराने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर साठी अनुदान घेतले नसावे.
- बँक चे लोण घेण्यासाठी पात्रता असणे आवश्यक आहे.
- लघु व सीमांत शेतकरी तसेच कमी उत्पन्न गटातील (EWS) शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्या जातील.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा किंवा मालकीचे जमीन कागदपत्र
- प्रमाणित उत्पन्न प्रमाणपत्र
- राहिवाशी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो
- शेती उपयोग प्रमाणपत्र (कृषी अधिकारी देतो)
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी मोठी खुशखबर: इलेक्ट्रिक कार वर मिळणार 2 लाख सबसिडी EV Car Subsidy
सहभागी ट्रॅक्टर कंपन्या
सरकारद्वारे अनुदानित यादीत समाविष्ट काही प्रमुख इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपन्या:
- Cellestial eMobility
- Sonalika Tiger Electric
- AutoNxt Automation
- HAV (Hydrogen & Electric Tractor Models)
टीप: खरीदी करताना शासकीय मंजूर कंपनीच निवडा, कारण त्यांनाच अनुदान मिळते.
ई-ट्रॅक्टरचे पहिले नोंदणी
ई-ट्रॅक्टर म्हणजेच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर योजनेची ची घोषणा सरकारने 30 जून 2025 रोजी केली होती आणि ठाणे आर्टीयो मध्ये पहिल्या ई-ट्रॅक्टरचे नोंदणी त्याच दिवशी करण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर ऑटोनेक्स्ट ऑटोमेशन नावाच्या कंपनीने सादर केला आहे. ही एक नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान कंपनी आहे, जी ई-वाहनांच्या निर्मितीत आघाडीवर आहे.
निष्कर्ष
Electric Tractor Subsidy: जसे कि आपल्याला माहितच आहे भविष्य हे इलेक्ट्रिक वाहनांचे असून आता शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर सुद्धा इलेक्ट्रिक उपलब्ध झालेले आहेत. लवकरच सगळ्या शेतकर्यांकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर राहतील. या ट्रॅक्टर मध्ये नागरिकांना भरपूर उपयुक्त फीचर्स पाहायला भेटतील. सरकारचा नवीन योजनेची माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन करा. धन्यवाद!
FAQ
1) माझाकडे डिझेल ट्रॅक्टर आहे, तरीही मी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी अर्ज करू शकतो का?
हो, जर तुम्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी पूर्वी अनुदान घेतले नसेल तर तुम्ही पात्र आहात.
2) इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पूर्ण चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो?
सर्वसाधारणपणे 6 ते 8 तास लागतात.
3) मी बँकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेऊ शकतो का?
हो, अनेक सरकारी बँका यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देतात.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. marathisathi.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!