ENIGMA Yojana: महाराष्ट्र सरकाने राज्यातील तरुण आणि क्रियाशील उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. ती म्हणजे ENIGMA Yojana होय. ENIGMA म्हणजे Empowering New Idies For Growth, Mentership And Access होते. हे बघून तूम्हाला लक्षात आलेच असेल कि हि योजना नेमकी काय काम करते. हि योजना महाराष्ट्र शासनाने तरुण उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी टायर करून दिलेला एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. जिथे नवीन उद्योग घेऊन येणाऱ्यांना Shark Tank सारखे सरकारी मार्गदर्शन, सरकारी गुंतवणूक व सरकारच नेटवर्किंग सुद्धा मिळणार आहे.
ENIGMA Yojana कुठे आणि केव्हा लागू करण्यात आली आहे?
महाराष्ट्रातील केली साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्हा जळगाव मध्ये पायलट स्वरूपात ENIGMA Yojana सुरु करण्यात आलेली आहे. हि योजना महाराष्ट्र शासनाने 2025 मधेच सुरु केली असून या वर्षीच्या पाहल्या टप्प्यात कमाल 150 युवा उद्योजकांना यामध्ये समाविष्ट करून त्यांना योग्य गुंतवणूक व योग्य मार्गदर्शन देण्याचा उद्देश आहे. या योजनेसाठी आतापर्यंत शंभर पेक्षा जास्त अर्ज आले असून त्यांचे उद्योग कपड्यांचे उत्पादन, टॅक्सी सेवा, बायोडिग्रेडिबल रॅप्स, पोषणयुक्त टिफिन सेवा इतयादी स्वरूपाचे आहे.
विविध नवीन उद्योजकांच्या आयडियाला आणि उद्योगाला वाढवण्यासाठी निधी हा CM MahaFund मधून 500 कोटी इअतका उपलब्ध करून दिला गेला आहे.योजनेच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय किंवा उद्योग हा आनंतरराष्ट्रीय स्तरावर्ती पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे. त्यासाठी 20 लाखाची कर्ज परतफेड स्टार्टअप्स वाल्यांना करावी लागेल तर देशान्तर्गत व्यवसायासाठी 5 लाखाची परतफेड करावी लागणार आहे.
योजनेचे मुख्य वैशिष्टये
नवीन उद्योजकांना त्यांच्या आयडिया सरकारी ENIGMA Yojana च्या मंचावरती मंढाण्याची संधी मिळणार. तसेच शासनानेच नियुक्त केलेल्या अनुभवी मेंटर्सकडून उद्योग वाढवण्यासाठी योग्य मार्गदर्श मिळेल. ज्या नवीन स्टार्टअप्स ना निधीची आवश्यकता असेल ते सुद्धा या मंचावर गुंतवला जाणार आहे. उद्योगाच्या विकासामध्ये स्वतः शासन सहभागी असेल त्यामुळे राज्य स्टार्टअप्स पोलिसी 2025 सुद्धा लागू होईल.
अर्ज कसा करावा?
ENIGMA Yojana हि जळगाव मध्ये सुरु करण्यात आली असून या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जळगाव जिलाधिकारी कार्ययमध्ये जाऊन संपर्क साधावा लागेल. किंवा ऑनलाईन सुद्धा जिल्ह्याचा पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता.
त्यासाठी जळगावी जिल्ह्याच्या अधिकृत वेब साईट वरती जाऊन तेथील सूचना वाचा. तुमचे आयडीआय आणि स्टार्टअप कशा प्रकारे पुढे जाईल, त्याची बाजारात मागणी, संशोधन, बजेट,संपूर्ण आराखडा तयार ठेवा. तसेच अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पत्ता, व्यवसायाची माहिती, व्यवसायातील अनुभवाची माहिती आणि आर्थिक अंदाजपत्र भरावे लागेल.
स्थानिक प्रशासनाचा मार्गदर्शनाखाली तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला मेल किंवा पात्रतेच्या साहाय्याने कळवण्यात येणार आहे.
निष्कर्ष
राज्यातील तरुण पिढीला उद्योजकतेकडे प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्रशासनची हि ENIGMA Yojana आहे. ज्याचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योगामध्ये रामराज्य तुम्ही बनवू शकणार आहात. हि शासकीय गुंतवणुकुईची मोठी संधी असणार आहे, त्यामुळे तुमच्याकडे कुठली आयडिया असेल तरी तयावर गुंतवणूक मिळवून तुमचे स्टार्टअप्स सुरु करू शकता.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहतोय. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या marathisathi.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे.